लेखकचन्द्रशेखर गोखलेयांनी मंगळवार, 24/02/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला इश्वर दिसतो आहे ,
पंख पसरलेल्या पक्षासारखा मुक्त..
तळ्यातल्या सुंदर कमळाप्रमाणे अलिप्त...
आम्रवनात कुंजन करणा-या कोकीळे प्रमाणे आनंदी
अन अथांग आकाशा प्रमाणे......... अनादी......
मला कळून चुकल आहे कि,
जीवन हाच एकमेव इश्वर आहे..
म्हणुनच,....
लेखकभोचकयांनी मंगळवार, 24/02/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
इंदुरातील मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ म्हणून ख्यात असलेल्या सानंद या संस्थेतर्फे सोमवारी (ता.२३) लिटिल चॅम्प्सचा सुंदर कार्यक्रम इंदुरमध्ये झाला. महाराष्ट्रातील मोजक्या शहरात कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच या चॅम्प्सना इंदुरात आणले होते.
सानंद या संस्थेने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर काळे आणि सचिव जयंत भिसे ही दोन माणसे 'सांस्कृतिक' दृष्ट्या झपाटलेली आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूपच कष्ट घेतल्याचे जाणवत होते. या कार्यक्रमात या लिटिल चॅम्प्सने यापूर्वीच सादर केलेली गाणी सादर केली. पण लोकांना त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांना डोळ्यात साठवून घ्यायचे होते.
लेखककवटीयांनी मंगळवार, 24/02/2009 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात मिपावरुन उडणार्या आयडींचे प्रमाण वाढलेले दिसते. गटणे, सोम, शनि व आता सर्किट.... (काही नावे नजर चुकीने राहीली असतील तर चु.भु.दे.घे.)
पण हे असे आयडी मिपावरुन का उडतात हा महत्वाचा प्रश्न आहे. जर संरपंच किंवा संपादक मंडळ आयडी काही कारणास्तव उडवत असतील तर त्याचे कारण आमजनतेला कळले तर बरे होइल असे वाटते.
लेखकभोचकयांनी मंगळवार, 24/02/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांसाठी एक खुशखबर. वेबदुनियाच्या एका नव्या वेबसाईटवर मराठी ऑपरेटींग, डाटा कर्नव्हर्टर, डिक्शनरी अशा विविध सोयी उपलब्ध केल्या आहेत. तुम्ही कोणत्याही फॉंटमध्ये लिहिले तरी ते युनिकोड करण्याची सोपी सोय आहे. शिवाय थेट मराठीमध्येच लिहिण्यासाठी फोनेटिकसह इन्स्क्रिप्ट फॉंट उपलब्ध आहे. इतरही अनेक सुविधा आहेत. खालील युआरएलवर टिचकी मारून पहा. तुमच्या उपयोगी काय आहे ते.
http://utilities.webdunia.com/