?
तू एक स्वप्न आहेस की सत्य? हा तुझा आभास का तुझी जाणीव करून देणारा अलगद स्पर्श?
मनाला काहीच उमजत नाही ... आणि शरीरालाही.
सगळे विसरून वर्तमानात जगायचे, तरी घुसमट होते. मनाच्या कोपर्यात, खोल कुठेतरी एक साद ऐकू येत आहे. आवाज ओळखीचा वाटतोय पण आज तर माझाच आवाज मीच विसरले आहे! तुझ्या सादाला प्रतिसाद द्यायला टाळतेय...
का? कारण तू सत्य का तुझा मृत्यू सत्य? ...
शरीर म्हणते तू आज जगात नाहीयेस, मन म्हणते तू मला सोडुन कुठे ही दूर नाही... फक्त माझ्यासाठी... मृत्यू नंतरही माझ्याजवळ.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव