लग्नाच्या "बाजार'गप्पा!
लग्न हा "बाजार' म्हटला जातो. मनांचं मीलन बिलन खूपच दूर राहिलं. अनेकदा फक्त महत्त्वाचा असतो व्यवहार! "देहभान' नाटकात मुक्ता बर्वे म्हणते ना..."बुद्धिमत्ता वगैरे सगळं झूट आहे. शेवटी मुलग्याचा पगार आणि मुलीचं रूप, यावरच सगळं ठरतं!' आमच्याही "लग्नावळी'च्या अनुभवातले हे काही किस्से...अर्थातच, क्रमशः!
(किस्से क्रमशः लिहिले नाहीत, तर तो "मिपा'वर फाऊल धरतात!)
---
"हॅलो'
""हां. बोला.''
""मी XYZ बोलतोय. तुमच्या मुलीची माहिती वाचली होती एका लग्नसंस्थेत.''
""बरं.''
""माहिती आवडली होती, म्हणून भेटायचं होतं.''
""बरं. कोणत्या संस्थेत?''
""दडूादूीदज या.''
""बरं. आपण काय करता?''
""मी XYZ शिकलोय. XYZ ध्ये नोकरी करतो.''
""अच्छा.''
""नाव काय आपलं?''
""XYZ''
""अच्छा अच्छा! पण XYZ (आडनाव) म्हणजे तुम्ही कऱ्हाडे ना?''
""हो!''
""मग आम्हाला नकोय कऱ्हाडे स्थळ. आम्हाला मुलगा "कोकणस्थ'च हवाय.''
""हो क्का? पण तुमच्या मुलीने तिच्या अर्जातील अपेक्षांमध्ये तसं काही लिहिलं नाहीये!''
""असं? बरं बरं!''
""तिनं लिहिलंय...मुलगा मनमिळाऊ, मला समजून घेणारा, मला "करिअर' करू देणारा असावा.''
""हो. मग?''
""खरं म्हणजे असं लिहायला हवं होतं..."मनमिळाऊ, मला समजून घेणारा, मला "करिअर' करू देणारा असा "कोकणस्थ' मुलगा हवा!''
(खास लोकाग्रहास्तव) क्रमशः
वर्गीकरण
हा..हा..हा.
हा ! हा ! हा !
In reply to हा ! हा ! हा ! by नाना बेरके
YZ ??
In reply to हा ! हा ! हा ! by नाना बेरके
हा हा हा...
एक नंबर!
मीस कॉल
लग्न हा
In reply to लग्न हा by सखाराम_गटणे™
बोळा
In reply to लग्न हा by सखाराम_गटणे™
हम्म्म्म्म
"देहभान'
छोटेखानी लेख आवडला.
आ. अभिजीत्रॉव
जरा मोठा लेख
कोमन