लेखकनिखिल देशपांडेयांनी सोमवार, 04/05/2009 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकरच भद्रा मारुती दर्शनाला निघालो. गाडी चालवताना फोन वाजला, बघितल तर घरमालकांचा फोन.
घरमालकः- निखिल कुठे आहात??? मुंबई मधे आहात का???
मी:- नाही हो, सध्या मी घरी आलेलो आहे.
घरमालकः- तुमच्याशी थोडे बोलायचे होते.
मी:- सध्या गाडी चालवत आहे, तुम्हाला साधारण तासभरात फोन करतो.
घरमालकः- ठीक आहे पण आठवणीने फोन करा
माझ्या डोक्यात पहिला विचार आला आज तर दोन तारीख आहे ह्यांना लवकर घरभाडे पाहिजे असणार ह्या वेळेस. तसेच सगळे काम आटपुन एक तासाच्या आत घरी पोहचतच होतो तेव्हा परत त्यांचा फोने आला.
लेखकगोगट्यांचा समीरयांनी सोमवार, 04/05/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
विचार करतो तुला सांगाव कसं?
माझं मन तुला कळावं कसं?
सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही,
Romantic मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही,
हा विचार तर चालुच राहिल ,
पण मला तु आवडतेस आणि हा विचार बदलत नाही!
लेखकअजय भागवतयांनी सोमवार, 04/05/2009 05:09 या दिवशी प्रकाशित केले.
सुधारणा १: धनंजयने दिलेल्या प्रतिसादानंतर लेख विस्तारीत केला आहे. धनंजयच्या प्रतिसादाने खूप विचार करायला भाग पाडले.
त्यामुळे वाचकांनी धनंजयचा पहिला प्रतिसाद जो "एक चांगला विषय पण लेख नीट समजला नाही. येथे वाद म्हणजे "आर्ग्युमेंट" म्हणायचे आहे की "लॉजिक" म्हणायचे आहे?
लेखकनेटकिडायांनी रविवार, 03/05/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
मी न्यू यॉर्क राज्यातल्या बफैलो शहरात राहतो. इथे बहुतेक अमेरिकन लोकांमध्ये स्वाईन फ्लू बद्दल भिती जाणवली. आमच्या क्लायंट ने कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर १० दिवसांची बंदी घातली आहे. त्या मानाने भारतीय लोकांमध्ये तेवढी भीती वा उत्सुकता जाणवली नाही.
भारतात या रोगाबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत?
लेखकभोचकयांनी रविवार, 03/05/2009 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात वक्ते आणि संत साहित्यासह संस्कृत साहित्याचेही गाढे अभ्यासक राम शेवाळकर यांच्या निधनाची बातमी कळाली नि गलबलून गेलो. शेवाळकर नाशिकला नित्य यायचे. नाशिकच्या देशदूत या वृत्तपत्रातर्फे सारडा व्याख्यानमाला होते. त्यात शेवाळकरांचे व्याख्यान ठरलेले असायचे. एकदा या व्याख्यानमालेत त्यांचे ज्ञानेश्वरीवरच्या एका अध्यायावरचे ओजस्वी निरूपण ऐकले नि प्रचंड प्रभावीत झालो. हा माणूस 'ग्रेट' आहे, एवढे जाणवले.
लेखकनिखिल देशपांडेयांनी रविवार, 03/05/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
(हा एक अतिशय फालतु लेख आहे त्या मुळे वाचणार्यांनी स्वः जवाबदारीवर वाचावा.)
मित्रांनो ही कथा आहे एका गादीची. मला वारसाहक्काने मिळालेल्या गादिची. गेल्या काही वर्षापासुन ह्या गादिवर हक्क सांगणार्या लोंकामधुन आता फक्त माझा ह्या गादीवर हक्क आहे ह्याचा आनंद काहीतरी वेगळा आहे. ह्याच गादीसाठी आमच्या घराण्यात अनेक वेळा भांडण तंटे झाले. तर अशीही आमची गादी. काय रे कोण म्हणतोय पानाची गादी म्हणुन.
लेखकमराठमोळायांनी रविवार, 03/05/2009 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : उदय सप्रे यांची मोठी कविता
मुसळधार पावसामधे दारु पिऊन
चिखलात कधी लोळलांय का?
मद्याबरोबर चखणा म्हणुन
लसुण कधी तळलाय का?
वाटेवरच्या मुलीची कधी छेड काढावी
असा किडा वळवळलाय का?
तिची छेड सोसवेना म्हणून
तिचा धिपाड्ड भाऊ खवळलांय का?
थरथरणार्या आवाजात ईंटरविव्यु मधे
अचानक धीर कधी गळलाय का?
भरभरुन उत्तरे दिली तरी ,त्यातून
नेमका तुमचाच अर्ज फेटाळलाय का?
दिवसभर अरबट चरबट खाउन
पोटात अचानक डुचमळलय का?
आणी तेव्हाच नेमके घरापसुन दुर
म्हणुन तुम्ही कळवळलाय का?
तारुण्याच्या उंबरठ्यावरची कूस
अकाली म्हातारपणाकडे करून वळलाय का?
' बालपण ते तारुण्य ' ह