प्रेरणा : उदय सप्रे यांची मोठी कविता
मुसळधार पावसामधे दारु पिऊन
चिखलात कधी लोळलांय का?
मद्याबरोबर चखणा म्हणुन
लसुण कधी तळलाय का?
वाटेवरच्या मुलीची कधी छेड काढावी
असा किडा वळवळलाय का?
तिची छेड सोसवेना म्हणून
तिचा धिपाड्ड भाऊ खवळलांय का?
थरथरणार्या आवाजात ईंटरविव्यु मधे
अचानक धीर कधी गळलाय का?
भरभरुन उत्तरे दिली तरी ,त्यातून
नेमका तुमचाच अर्ज फेटाळलाय का?
दिवसभर अरबट चरबट खाउन
पोटात अचानक डुचमळलय का?
आणी तेव्हाच नेमके घरापसुन दुर
म्हणुन तुम्ही कळवळलाय का?
तारुण्याच्या उंबरठ्यावरची कूस
अकाली म्हातारपणाकडे करून वळलाय का?
' बालपण ते तारुण्य ' हा काळ
आयतं बसुन खाण्यात फुगलाय का?
ऐन पावसात छत्री घरी विसरुन
स्वत:लाच शिव्या देत कधी चाललाय का?
आणी त्यातच तुमच्या पांढर्या शर्टवर
गाड्यांनी चिखल उडवलाय का?
रस्त्यांच्या कडेची उघडी खळखळती गटारे
मनाचे बांध फोडून कधी त्यात डुंबलाय का?
समोरच्यानं उठुन श्रीमुखात भडकवावी
ईतके तुम्ही कधी बरळलाय का?
प्रत्येक दिवस एक नवा अनुभव देतो
एखाद्या अनुभवाने कधी चळलाय का?
आपल्याच अंतरात असतो एक गाढव
उमजुन कधी गाढवपणा केलाय का?
'पुन्हा म्हणून मुर्खपणा करणार नाही 'हा शब्द
स्वतःच्याच मनाशी तरी पाळलाय का?
माणुस हणजे शेम नसून प्रेम म्हणजे माणुस
अनुभव आल्यावर तरी अर्थ हा कळलाय का?
आपला,
मराठमोळा
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1977
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
विषय : दिलेला नाही.
शब्दच नाहीत ...
एकदम भन्नट रे गड्या .....
सप्रे साहेब
In reply to एकदम भन्नट रे गड्या ..... by उदय सप्रे
हा हा
जम्या
धमाल आली ..