Skip to main content

माय.........

लेखक उमेश__ यांनी रविवार, 10/05/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाप्रेमी मात्रुदिना निमित्त ही एक छोटीशी कविता............ माय, माय आतला पदर चार पुडदाच्या पोळीतला भाजलेल्या खोबर्याचा तुकडा गावाच्या होळीतला... तव्यावरची भाकर भाजण्यासाठी माय झाली चुलीतलं सरपण जळत राहिली सतत घराला यावं घरपण... चुलीवर शिजून-शिजून मऊ झालेल पूरण आत्मशांतिसाठी पोळीचा तुकडा आगीत जळावा तसं माईला आलेलं मरण..................

आई

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 10/05/2009 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
सामंत काकांचा हा लेख वाचला आणी ही कविता सुचली.
Taxonomy upgrade extras

आठवण

लेखक स्वप्नयोगी यांनी रविवार, 10/05/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
येणारा दिवस कधीच तुझ्या आठवणीशिवाय जात नाही दिवस जरी गेला तरी तुझी आठवण जात नाही. पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.

एका शिक्षकाची कैफियत-आजच्या म.टा तील लेख.

लेखक अमोल खरे यांनी रविवार, 10/05/2009 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज म.टा वर हा लेख वाचला. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4504512.cms एका शिक्षकाची कैफियत यात मांडली आहे. घरी अडचण असुनही ह्या शिक्षकाला जबरदस्तीने निवडणुकीच्या कामाला जुंपले गेले. भरीस भर म्हणून जेथे त्याची ड्युटी होती तेथे काहिही सोयी सुविधा नव्हत्या. हा लेख वाचा म्हणजे तुम्हाला जास्त कल्पना येईल. मनात विचार आला कि शिक्षक काही बोलु शकत नाहित म्हणून त्यांना वाट्टेल ते काम द्यावे, त्यांचे पगार थकवावेत हा काय प्रकार ?

वर्णन

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 10/05/2009 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
वर्णन (चालः तमाशातले सवाल जबाब) अटकर बांधा गोरा गोरा खांदा ss पदर उडतोय वार्‍यावर चवळीची तू शेंग शेलाटी लवलव लवलव करती गss ग ग ग गss (माझ्या रामा तू रं ss) गोरा रंग तुझा दुधेरी ss केस काळे मखमाली हासणं तूझं मंजूळ मोठं जणू गुलाब फुलले गाली ग ग ग गss दात तुझे मोती असती ss नाक असे अणुकूचीदार भुवयी ठळक तिरकामठी नजरेचे मारती शर ग ग ग गss पाहणं तुझ चोरून चोरून ss राग तुझा लटका ग लाजलीस हे सांगाया फुका मारसी मुरका ग ग ग गss लगबग लगबग तुझं चालणं ss काम करतीया घाईत जिंकुन घेई मनास माझ्या होशी गळ्यातली ताईत ग ग ग गss
Taxonomy upgrade extras

मातृदिन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 10/05/2009 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
"अगं, आई! कमलमूखी तू सुंदर असता रूप विधात्याचे कसे वेगळे?" ह्याचं उत्तर जाणण्यासाठी, आईला "आई"च का म्हणतात हे जाणण्यासाठी, ज्यांची आई हयात आहे त्या सौभाग्यांसाठी, ज्यांची आई हयात नाही त्या माझ्यासारख्या अभाग्यांसाठी, "बाळा! तुला लागलं कारे?" हा आईचा प्रश्न जाणण्यासाठी आईची व्यथा जाणण्यासाठी, आईचे डोळे नेहमीच ओले का असतात हे समजण्यासाठी, चिमुकली तनुली आईला काय सांगते हे समजण्यासाठी, प्रत्येक व्यक्तिच्या पोटावरची खूण कां आहे? ते जाणण्यासाठी, "आई..!

अमेरिकन मंदी- उद्धव कांबळे ह्यांचे लेख

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 10/05/2009 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकन मंदी ह्याविषयावर श्री. उद्धव कांबळे ह्यांचे दोन लेख लोकसत्तेत प्रकाशित झाले आहेत. हे दोन्ही लेख अभ्यासपूर्ण असून संग्रहणीय आहेत- सध्या मिपावर श्री. क्लिंटन हे जागतीकीकरणावर उत्तम लेख देत आहेत. त्याला पुरक असाच हा विषय असल्यामुळे हे संदर्भ येथे द्यावेसे वाटले.

(जुलाब)

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 10/05/2009 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा स्वप्नयोगी यांचा गुलाब जुलाबाच्या वेळी पोटावरली लव जोरात थरथरली ते पाहुन माझी छाती मुळव्याधाच्या आठवणींनी हबकली

गुलाब

लेखक स्वप्नयोगी यांनी शनिवार, 09/05/2009 22:02 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाबाच्या पाकळीवरचं दंव हलकेचं थरथरलं ते पाहुन माझं मन तुझ्या आठवणींनी बहरलं