माय.........
लेखनविषय:
प्रिय मिपाप्रेमी
मात्रुदिना निमित्त ही एक छोटीशी कविता............
माय,
माय आतला पदर
चार पुडदाच्या पोळीतला
भाजलेल्या खोबर्याचा तुकडा
गावाच्या होळीतला...
तव्यावरची भाकर भाजण्यासाठी
माय झाली चुलीतलं सरपण
जळत राहिली सतत
घराला यावं घरपण...
चुलीवर शिजून-शिजून
मऊ झालेल पूरण
आत्मशांतिसाठी पोळीचा तुकडा
आगीत जळावा तसं
माईला आलेलं मरण..................
वाचने
2214
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
तव्यावरची भाकर भाजण्यासाठी
माय झाली चुलीतलं सरपण
जळत राहिली सतत
घराला यावं घरपण...
शब्द न् शब्द काळजाला भिडणारा! कविता नाही, मायच्या आयुष्याचं चित्र आहे!
खूपच खास!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com
पुर्ण कविता आवडली. खुप छान वर्णन आहे मातेच.
.............
चार पुडदाच्या पोळीतला
ह्याचा अर्थ काय?
चुचु
In reply to चार by पर्नल नेने मराठे
पुडदाच्या पोळीतला म्हणजे पोळीतला मधला थर
In reply to पुडदाच्या by उमेश__
'अरसिकेषु कवित्व निवेदनम् शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख' हेच आठवले..
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
In reply to हा प्रश्न वाचून... by नाटक्या
याचा अर्थ काय???
अछा......
चुचु
!!!