Skip to main content

नातं...

लेखक दशानन यांनी मंगळवार, 28/07/2009 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
दादा, दे ना, ते माझे पैसे आहेत ना... ! देत नाही, माझापण हिस्सा आहे ह्यात... समजले, अर्धे घे. ठीक, अर्धे तरी दे. ठीक आहे हे घे... ! आमच्या घरी रक्षाबंधन व भाऊबीज च्या दिवशीचा नेहमीचा संवाद माझा व माझ्या ताईचा. बाबा नाही तर आई ओवाळणी साठी कधी पाच तर कधी दहा रुपये माझ्या हाती ठेवायची व डोळे वटारुन दम द्यायची की ताईलाच सर्व पैसे दे नाही तर बघ. पण मी पण हुशार आई समोर ओवाळणी घालत असे ताटात व ताई ने हातात पैसे घेतले व आई किचन मध्ये गेली कि लगेच ताईच्या हातातून पैसे काढून घेत असे व सरळ गच्चीवर.. मग ताई माझ्या वर रागवायची दंगा करायची पण अर्धे पैसे घेऊन गप्प बसायची..

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

एक टरकावणारा अनुभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 28/07/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
२२ फेब्रुवारी १९९९! याच दिवशी गँगस्टर-नेता अरुण गवळी त्याच्या कुटुंबिय आणि सहकार्‍यांसह सहा कार, काही जीप आणि एका बसमधुन दगडी चाळीतुन बाहेर पडले आणि मंचर जवळच्या वडगांव पाचपीर गावी गेला. त्याला मुंबईतुन तडीपार केले होते. वडगांव पाचपीर हे पुणे जिल्ह्यातले एक छोटेसे गांव. तिथे असलेल्या पाच पीर ही त्या गावाची एकमेव ओळख अन क्राईमशी संबंधित लोकांना ते माहीती झालेले ते अरुण गवळीची सासुरवाडी म्हणुन. गवळीचे सासरे शेख लाल मुजावर नन्हुभाई हे पाच पीरांच्या दर्ग्याचे मुजावर असल्याने बर्‍याच लोकांच्या आदरास पात्र तर त्यांची मुले वगैरेही बर्‍यापैकी मास्-बेस बाळगुन.

मग ओबामा निराळे कसे?

लेखक सुधीर काळे यांनी मंगळवार, 28/07/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "मिसळ-पाव"वरील, त्यातही अमेरिकास्थित, मित्र-मैत्रिणींनो, कृपया खालील लिंक उघडून माझा ई-सकाळच्या वेब एडिशनवर कालच प्रसिद्ध झालेला ले़ख वाचावा व माझ्या मतांशी सहमती असल्यास 'व्हाईट हाऊस', १६०० पेनसिल्वेनिया अ‍ॅव्हेन्यू, वॉशिंग्टन डी. सी.

टोळ्ळंभट्ट

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/07/2009 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाइल हॉल मधे ठेवला होता. तरी सुद्धा सकाळी साडेपाच ला जाग आली. बायॉलॉजिकल अलार्म. नाईट लॅम्प च्या मंद प्रकाशातुन बाहेर निघालो तर आरशातुन एक हाक अयकु आली. "ओ मास्तर, कुठे चालले? आज काही शेड्युल नाही ना. गप्प झोपा की." बर बर. निसर्गाची हाक पुर्ण करतो. " हो, नंतर चहा मागाल बायकोकडे" नाही. " उद्यापासुन हेवी असेल ना शेड्युल. संधी मिळाली आहे तर गपगुमान झोपा की.

त्सुनामी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 28/07/2009 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
उद्दंड जाहल्या लाटा तांडव करीती वारे स्तब्ध चंद्रमा नभात हरवुन गेले तारे... बेभान जाहली गाज सागरा जावु कसा रे सारे किनारे संपले कसा आवरु पिसारे... मिठीत घेण्या धरणी करशी किती पसारे डोळ्यात दाटले पाणी सांगु वेदना कशा रे पांघरशी स्वप्न निळे स्वप्नांचे धुंद मनोरे स्नेह तुझा ओसरला रे बघ खुंटले फुलोरे विशाल
काव्यरस

तोय / डाळींतोय - तूर डाळीचा एक सोपा, साधा आणि स्वादिष्ट प्रकार

लेखक सुनील यांनी मंगळवार, 28/07/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा तूर डाळीचा हा सोपा, साधा आणि स्वादिष्ट प्रकार कोंकण किनारपटीवर, विशेषतः गोवा-कारवारकडे वरचेवर केला जातो. ही पातळच केली जात असल्यामुळे तूर डाळ कमी असली तरी चालते! साहित्य - तूर डाळ तूप मोहरी हिंग सुक्या मिरच्या मीठ कढीपत्ता (वैकल्पिक) कृती - १) तूर डाळ शिजवून घ्यावी. पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच ठेवावे (तोय म्हणजे पाणी!) २) तुपावर हिंग, मोहरी आणि सुक्या मिरच्यांची फोडणी करून डाळीला द्यावी. ३) चवीप्रमाणे मीठ घालावे. टीपा - १) फोडणी ही तुपावरच करावी.

तुर डाळ

लेखक पर्नल नेने मराठे यांनी मंगळवार, 28/07/2009 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
तुर डाळ १०० रुपये किलो झाली आहे असे वाचले. :S आम्ही कोब्रानी आमटी भात तरी खायचा कसा :-? चुचु