माझी गाथा .....!
लपवणे ते झाले सुरू, माझेच माझी यातना
राम न उरला काही, आरंभीच संपली कथा !
नसे अभंग नामयाचा, नच विरहिणी मीरेची
साकळली वेदना सारी, मी रचितो माझी गाथा !
विसरल्या सार्या श्रुती, अश्रुत भिजल्या आर्या
जखमा सार्या ओल्या, मी घोकतो जुन्याच संथा !
ना स्मरे मंत्र आता, ना आठवते मज हरिनाम
वेदनांचे हे वेद माझे, विसरल्या त्या जून प्रथा !
हे भोग मम प्राक्तनीचे, नकोत पळवाटा नव्या
संपते जिथे दु:ख जुने, जन्मा येते नवी व्यथा !
विशाल.
मिसळपाव
आज आपण दिवस कसा घालवणार ते (सांगण्यासारखे असेल ;) तर) सांगा.
आणि बैलपोळ्याला बैलाला सजवतात तर आपण काही खास नट्टापट्टा केला असेल तर ते सुद्धा सांगावे :)
--लिखाळोबा