Skip to main content

माझे जगावेगळे छंद-२

लेखक पाऊसवेडी यांनी सोमवार, 07/09/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
एका रविवारी माझ्या साप पकडण्याची सुरुवात होणार हे एकदाचे ठरले आणि मग त्या रविवार पासून दर रविवारी खूप छानआणि खुंपच वेगेळे म्हणजे जे मला वाटत होते त्यापेक्षा वेगेळे अनुभव आले त्यातलेच मी काही मी तुम्हाला सागणार आहे पहिल्याच दिवशी मी गेले होते तेव्हा मला सापाचा स्पर्श कल्पनेतच होता कारण याआधी मी कधीही सापाला हात लावला नव्हता. पहिल्या दिवशी सगळ्याच लोकांनी लीम्बुतीम्बुची (पक्षी:माझी) मनसोक्त मजा केली. हे कोण नवीन ?? साप पकडायला शिकायचंय का??

ओढ

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी सोमवार, 07/09/2009 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
जगणार्‍याला मरणाची ओढ अन मरणार्‍याला जगण्याची ओढ नास्तिक म्हणुन जगलो आयुष्यभर म्हातारपणी आता मला देवघराची ओढ नाही साधले काहीच फिकट जगुन कापसाला आता मात्र वातीची ओढ आयुष्य गेलो मुडद्यासारखे जगत अन माझ्या मुडद्यालाही आता जिवणाची ओढ दु:खेच आली सदैव नशिबी माझ्या सुखांना सुद्धा दु:खाची ओढ सहन नाही होत हे जगणे असले माझ्या मढ्याला मात्र आता सरणाची ओढ आठवणींचा किती हा पसारा, का माझ्या वर्तमानाला भुतकाळाची ओढ भुतकाळातच रुतुन पडलोय वर्तमानाला मात्र भविष्याची ओढ गेल्यावर जगातुन काय उरेल मागे माझ्या मरणाला आता मागे उरण्याची ओढ

A photograph from our steel plant

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 07/09/2009 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
हे मी जो पोलाद कारखाना चालवितो त्यातील विनाखंड ओतकाम (Continuous Casting) करणार्‍या मशीनवरील छायाचित्र आहे. (पाच स्ट्रँड्स असले तरी चित्रात चारच स्ट्रँड्स दिसत आहेत.) अशी आणखी छायाचित्रे पहायला आवडत असेल तर प्रतिक्रिया, पोस्टहापिस किंवा खरडवही द्वारा कळवा. मला उगीच अशा चित्राद्वारे आपल्याला बोअर करायचे नाहीं. पण दुरून पोलाद कारखाने गोंडस दिसतात म्हणून लिहिले आहे. इलेक्ट्रिक आर्क फर्नेस, लेडल फर्नेस, कंटीन्युअस कास्टिंग व हॉट रोलिंग असे विभाग आहेत. सुधीर काळे

जसं असायला हवं तसंच व्हावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 07/09/2009 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
"मी कुणालाही सर्व दुःख विसरून पुढे चला असं सल्ला देत नाही.कुणालाही तुमच्या वागणुकीत आता बदलाव आणा असं सांगत नाही.किंवा तुमच्या लक्षात येत असेल ते दुःख् दूर ठेवा असंही सांगत नाही.कारण दुःखाला त्याचा समय दिला गेला पाहिजे.

पुनरपी सेवेसी....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी सोमवार, 07/09/2009 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरहो, नमस्कार. स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भावाने बंद ठेवावे लागलेले आपले यज्ञकर्म उपहारगृह आज दिनांक ६ सप्टेंबर २००९ रोजी पुन्हा पुर्ववत सुरू करण्यात आले आहे. आपणा सर्वांस नम्र विनंती आहे की आपल्या सोयी नुसार लवकरात लवकर यज्ञकर्मास भेट देऊन चमचमीत पदार्थांची लयलूट करावी. धन्यवाद.

मोहक दरबारी

लेखक अन्वय यांनी रविवार, 06/09/2009 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
मोकळ्या हवेत, अगदी नीरव शांततेत चांदण्यांनी भरलेले आकाश न्याहाळताना दुरावलेल्या प्रेयसीचा आठव यावा. तिच्या सहवासात घालविलेला क्षणन्‌ क्षण पुढ्यात उभा राहावा, असे दरबारी कानडाचे रुप वाटते. हा राग मंद्र आणि मध्यम सप्तकात रमणारा असल्याने यात आतर्तबरोबरच गंभीरताही आहे.

रांगोळी

लेखक जयवी यांनी रविवार, 06/09/2009 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही माझ्या बाप्पा समोरची रांगोळी ! आजकाल साचे मिळत असल्यामुळे रांगोळी काढणं खूपच सोप्पं झालंय.

(शोध)

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 06/09/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - "अजून कच्चाच आहे" यांची शोध ही कविता हे "पझल" आहे का ते जाणकार सांगतीलच. मी मात्र यांना 'पझल सदृष्य' प्रश्न म्हणेन फारतर. मिपावरील "विडंबन पझल" लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. (परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.) ............... सकाळचा चहाचा माझ्यापर्यंत पोचलाच नाहीत चहा संपला की गॅस? माझं मी शोधीत राहीलो शब्दाशब्दांची ठिगळं की ठिगळा-ठिगळांचे शब्द? माझ्या साहित्यासाठी मीच संकेतस्थळ शोधीत राहीलो सडक्या अन्नाचे सुटलेले वास आलेच नाहीत ट्रॅश कॅन रिकामी की सर्दी झाली?
काव्यरस

मी बदलणार नाही

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 06/09/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
कॉंन्क्रिटच्या भल्यामोठ्या इमारती बांधीन त्यावर काचेचे आवरण बसवेन आत भट्टी झाल्यावर येसी बसविन भरमसाठ वीज वापराने लोडशेडींग झाले तरी पण मी बदलणार नाही मोठ्या शहरात राहून प्रगती करेन स्टायलिश सोसायट्यांमधे राहीन ब्रॅडेड वस्तू वापरुन नद्या-नाले घाण करेन तरी पण मी बदलणार नाही सहापदरी रस्ते बांधेन ते लहान गावात आणून सोडेन गावाच्या मागे ५-स्टार औद्योगिक वसाहत बांधेन ट्रॅफिक जाम होऊन लोकांचा वेळ पैसा आणि पेट्रोल वाया गेले तरी पण मी बदलणार नाही माझे विचार तेच इतरांचे असे गृहीत धरेन कशाला खुलासा करायचा प्रश्न विचारुन माझेच विचार पुढे रेटून काहीच साध्य झाले नाही तरी पण मी बदलणार नाही मला घाई आहे

विकृत बुद्धिवादाची इस्त्री

लेखक युयुत्सु यांनी रविवार, 06/09/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
मला असं वाटतं की ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उड्वत बसण्यापेक्षा ज्योतिष उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपयुक्ततता सिद्ध होण्यास शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही, फक्त अनुभव पुरेसा आहे. मागे एकदा आय आय टी मधल्या प्राध्यापक जोगांनी लोकसत्तेमधल्या एका लेखाचा संदर्भ दिला होता. लेखकाचे नाव आठवत नाही, पण त्यातील शेवटचे वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे. ते असे, "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही". ज्यांना या विधानातील विदारक सत्य पटेल, त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्ततता पटेल.