Skip to main content

(शोध)

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 06/09/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - "अजून कच्चाच आहे" यांची शोध ही कविता हे "पझल" आहे का ते जाणकार सांगतीलच. मी मात्र यांना 'पझल सदृष्य' प्रश्न म्हणेन फारतर. मिपावरील "विडंबन पझल" लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. (परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.) ............... सकाळचा चहाचा माझ्यापर्यंत पोचलाच नाहीत चहा संपला की गॅस? माझं मी शोधीत राहीलो शब्दाशब्दांची ठिगळं की ठिगळा-ठिगळांचे शब्द? माझ्या साहित्यासाठी मीच संकेतस्थळ शोधीत राहीलो सडक्या अन्नाचे सुटलेले वास आलेच नाहीत ट्रॅश कॅन रिकामी की सर्दी झाली? ते मी शोधीत राहीलो कानी पडलेल्या शब्दांचे अर्थ उमगलेच नाहीत त्यांचे षडयंत्र रचण्याचे मी डाव शोधीत राहीलो मेर्लोतच्या नशेने ग्लास भरून घेतलेच नाहीत खावया टोर्टियाचिप्स मी वाव शोधीत राहीलो गुंत्यात कोंड्याचे कण तेंव्हा केस विंचरलेच नाहीत (यमक जुळवायला मी ओळ शोधीत राहीलो)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1437
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कविता

कायच्याबाय रे! झकासच !! प्रशांता, आहेस मनोहर खरा !!! ................. अजून कच्चाच आहे. (पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?) (कसल्या पट्ट्या पाहाताय राव? हे तुमची नाडी सोडून र्‍हायले बगा)