मी बदलणार नाही
कॉंन्क्रिटच्या भल्यामोठ्या इमारती बांधीन
त्यावर काचेचे आवरण बसवेन
आत भट्टी झाल्यावर येसी बसविन
भरमसाठ वीज वापराने लोडशेडींग झाले
तरी पण मी बदलणार नाही
मोठ्या शहरात राहून प्रगती करेन
स्टायलिश सोसायट्यांमधे राहीन
ब्रॅडेड वस्तू वापरुन
नद्या-नाले घाण करेन
तरी पण मी बदलणार नाही
सहापदरी रस्ते बांधेन
ते लहान गावात आणून सोडेन
गावाच्या मागे ५-स्टार औद्योगिक वसाहत बांधेन
ट्रॅफिक जाम होऊन लोकांचा वेळ पैसा आणि पेट्रोल वाया गेले
तरी पण मी बदलणार नाही
माझे विचार तेच इतरांचे असे गृहीत धरेन
कशाला खुलासा करायचा प्रश्न विचारुन
माझेच विचार पुढे रेटून
काहीच साध्य झाले नाही
तरी पण मी बदलणार नाही
मला घाई आहे मी पुढे जाणार
दणदणीत हॉर्न वाजवून तुमच्या गाड्या ओलांडणार
कितीही दामटली तरी ५ मिनिटांचीही बचत होत नाही
माहिती आहे पुढच्याच सिग्नलला तुमची भेट होणार
तरी पण मी बदलणार नाही
माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही
त्यामुळे मला कळूनही
मी बदलणार नाही
मी बदलणार नाही
मी बदलणार नाही
(आयुष्यात पहिल्यांदाच काव्य प्रसवले आहे. सांभाळून घ्या)
अशा काव्याचा रस कोणता?
लेखनविषय:
याद्या
2367
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
>>आयुष्यात
ट्रॅफिक
व्वा
अरे वा !
मॅन, तुमचा
In reply to अरे वा ! by अवलिया
:)
In reply to मॅन, तुमचा by अमृतांजन
हे भारतात
http://www.imd.gov.in/ http:/
In reply to हे भारतात by अमृतांजन
दुवे
In reply to http://www.imd.gov.in/ http:/ by अवलिया
विज्ञानाच
In reply to दुवे by अमृतांजन
छान कविता...
आवडली.. !
छान.