Skip to main content

फसवणूकी पासून सावधान

लेखक स्वाती२ यांनी मंगळवार, 17/11/2009 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
जस जशी अमेरिकेतील अर्थव्यवस्था बिकट झाली तसे फसवणूकीचे प्रकारही वाढायला लागले. त्यात सणासुदीचा/खरेदीचा हंगाम म्हणजे अधिकच भर पडते. सध्या आमच्या भागात दोन प्रकारचे फसवणूकीचे प्रकार सुरु आहेत. पोलिसांनी या बाबत अ‍ॅलर्ट दिलेय. अमेरिकेच्या इतर भागातही असे घडू शकते म्हणून मिपाकरांना सावधानीचा इशारा. १. फोन वरील व्यक्ती तुम्हाला $५०० चे वालमार्टचे गिफ्ट कार्ड नविन मार्केटिंग स्किम म्हणून पाठवत असल्याचे सांगते. नाव, पत्ता पडताळून पाहाते. नंतर ३-४ डॉलर रक्कम हँडलिंग फी म्हणुन पडेल असे सांगून क्रेडिट कार्डच्या नंबराची मागणी होते.

ईस्ट कोस्ट

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 17/11/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी, सध्या मी आद्य विठोबा देशी डॅनबरी, कनेटीकट या गावी आहे. फेब २०१० पर्यन्त वास्तव्य आहे. आता सुट्टीचा मोसम चालू होईल..प्राजुतै पण जवळच राहते ईकडे...अजूनही बरेचशे मिपाकर राहतात/ राहत असावेत. तर ईस्ट कोस्ट ला एखादा मिपा कट्टा करावा काय , आभार प्रदर्शन(थँक्सगिवींग) नंतरच्या पुढच्या विकांती....??? अथवा त्यानंतर जेंव्हा सगळ्यांना सोयीचे असेल तेंवा.....काय म्हणणे आहे यावर??? (कट्टाप्रेमी) प्रभो

नवी नावे जुनी नावे

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 17/11/2009 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मराठी लोकांबाबतचे निरीक्षण. आपण आपल्या वडिलांच्या, आईच्या, आजोबांच्या वा आज्यांच्या नावांकडे बघितले तर लक्षात येईल की त्यांची नावे हौसेने कुणी ठेवत नाही. अलीकडच्या ३०-४० वर्षात नव्यानव्या नावांची फॅशन येत आहे. मिलिंद, पराग, अतुल, प्रमोद, संदीप, राजेश, राहुल, वैशाली ही नावे एकेकाळी नवी समजली जात असतील. आज अथर्व, ऋग्वेद, शुभम (हे काय विचित्र नाव बुवा?), मिताली, गंधाली, शेफाली (की शेफारली), अंकिता, अनिका, करीना असली काहीतरी नावे ऐकू येतात. अजूनही काही असतील.

भटकंती हरीशचंद्र गडाची

लेखक jaypal यांनी मंगळवार, 17/11/2009 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खुप दिवस झाले "एखादा ट्रेक हवा यार " असे म्हणत अनेक दिवसांत , अनेक कप चहा रिचवत अनेक अवांतर गप्पा झाल्या पण फुलों की घाटी नंतर ट्रेक असा झालाच नाही. एके रात्री (भरत परमारचा) १० वाजता फोन आला १२ व १३ सप्टेंबर ला हरिशचंद्रगड ट्रेक ठरला आहे, "तुझं काय ते लवकर कळव." अशी विचारणा झाली. शनिवार-रविवार असल्याने नकाराचा प्रश्नच नव्हता तात्काळ "होकार" कळवुन मोकळा झलो. हरिशचंद्रगडाची स्वप्नं बघता बघता १२ सप्टेंबरचा शनिवार एकदाचा उजाडला. सकाळी ६.३० वाजता टेंभिनाक्यावर (ठाणे) सर्वजण जमलो आणि क्वालीसने पुढचा प्रवास सुरु झाला. एकुण सव्वा ७ जणांचा ग्रुप. वयोगट ६ (हो हो केवळ ६) ते ६० वर्षे.

एक अजनबी पाकिस्तानी नागरिकाशी झालेली चर्चा!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 16/11/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक १०० टक्के सत्य घटना आहे. मागे मी एकदा मलेश्यातील क्वाला लुंपूर या शहरी गेलो होतो. संध्याकाळी काम संपवून जरा दिवसा-उजेडी हॉटेलवर परत आलो. हॉटेल शेजारीच एक पार्क होता म्हणून एक चक्कर मारायला तिथं गेलो. का कुणास ठाऊक, पण पार्कमध्ये कोणी चिटपाखरूही नव्हतं. एक-दोन फेरफटके मारल्यावर हिंदुस्तानी चेहेर्‍याचा एक पंचविशीतला तरुण कांहींसा "खोया-खोयासा" चेहरा करून एका बाकड्यावर बसलेला दिसला. आधी आपल्या देशाचा असावा म्हणून मी त्याला "हॅलो" केले. तो थोडासा बुजलेला दिसत होता. कांहींसा बिचकत-बिचकत अवघडतच तो उभा राहिला व "आप कहाँसे हैं?" असे त्याने मला विचारले. मी म्हटलं "मै हिंदुस्तानी हूँ|".

कातरवेळ

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 16/11/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

मेल्या, तुला रे काय कळतंय त्या माडी चुकलो नाडीग्रंथातलं?

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/11/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
श्री हैयो व अन्य नाडी ग्रंथ प्रेमी मित्र हो, आपणास धनंजयांचे व्यक्तिमत्व त्यांच्या माहितीपुर्ण व सखोल प्रतिसादांमुळे फारच आदरणीय व जवळचे वाटते तसेच मलाही वाटते. त्यांनी त्यांच्या स्याद्वाद लेखातील एका प्रतिसादाला उद्देशून तुमच्याशी (श्री हैयोंशी) खरडवहीतून प्रतिसाद दिल्याचे आपण कळवल्याने मला त्यातील मजकुराला थोडी दखल देणे गरजेचे वाटले म्हणून...
खरे पाहता दोहोबाजूंच्या वितर्काचे जे मूळ, त्या प्रमाणांचे ओझे दोन्हीही बाजूस अधिकाधिक तुल्यबल होणे सहजशक्य असल्यास प्रात्यक्षिक करणे हे सुचविले जाते.

नार्सिसस....

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 16/11/2009 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
"जिनियस माणसं कधी-कधी माथे फिरल्यासारखी वागतात त्याचं कारण काय असेल?" प्रा. बिरुटे, अवलियाला विचारत होते. प्रो. देसाई सुटीवर असल्यामुळे प्रा.बिरुटे अवलियांना घेऊन तळ्याकाठी बसले. एकेक भाजलेला शेंगदाणा टाइमपास म्हणून खातांना असा अचानक प्रश्न विचारल्याने अवलिया नेहमीप्रमाणे भांबावल्या सारखा झाला. "अवलियासेठ तुला सांगतो. मराठी माणसं एकत्र आली म्हणजे फ्लॅट घेतला का ? पोरीच्या लग्नाचं जमलं का ? कार्यालयातले बॉस काय म्हणताहेत ? काय म्हणतं राजकारण ? असे काही सामान्य प्रश्न विचारतात. " "हो तर ! जगरहाटीत अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मागे हात धुवून लागलेले असतात.

जाणता अजाणता......

लेखक किलबिल यांनी सोमवार, 16/11/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
धाडधाड जिना उतरुन जुई जेवणाच्या टेबलजवळ आली. नेहमीप्रमाणे खर्रsssss आवाज करत खुर्ची ओढून घेऊन बसली.समोरच्या प्लेटमधला शिरा खाणार तेवढ्यात आई म्हणाली,"सागरचा फोन आला होता." जुईला ठसका लागता लागता राहिला. "काय म्हणत होता?" "तू काल त्यांच्या घरी जाणार होतीस का? का आली नाहीस म्हणून विचारत होता." "हं... नाही जमलं. अनुच्या घरी गेलो होतो सगळ्या. उशीर झाला." "अगं मग एक फोन करायचास त्याला. वाट बघत होता म्हणे.." "हं..... अजुन काही म्हणाला का?" "नाही. पण तुला फोन करायला सांगितलंय त्याने." "ठीक आहे करेन नंतर. निघु मी?" आईच्या उत्तराची वाटही न बघता जुई पळाली.. तिला तो विषयच नको होता... सागर...समीर...