Skip to main content

स्रीसंत, सॉरी श्रीसंत तात्याबा महाराजांची नंदनला पत्रे..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 21/11/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा छोटेखानी लेख तुझे आहे तुजपाशी मधल्या काकाजी देवासकरांना सादर समर्पित! :) पत्र क्रमांक - १ बेटा नंदन, अनेक आशीर्वाद!
तात्या, मला भारतीय स्त्री-सौंदर्याबाबत काही मौलिक गोष्टी सांगा!
सांगतो हां! नंद्या, बाबारे -या जगात भारतीय स्त्री-सौंदर्य हेच खरे.

[घोडा]

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 20/11/2009 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाई भी बन गया भावूक आणि उसको लग्या की कविता लिखे. नेहमी प्रमाणे मुळ कवियित्रीची माफी मागून- हरेक बंदेको मैने थमा दिया घोडा तब्बीच महेसूस किया मैने चैन थोडा फिल्लीममे देका होयंगाच तुमने ऐसा झमेला बचपनसे मैने छोडा घर सीदा आया मुंबैला न थी पैरोमे चप्पल, जेबभी था फटेला गल्लीके भाईने मेरेकू बुलाया तभी मैने भी सोचा नही एक मिनटभी भाई बोला, "आजसे तेरा नाम हतौडी!" भाईने बहोत मारा, वैसाच जीना भी सिकाया बडा हुवा जैसे, सुपारी लेके लोगोंको टपकाया पताही न चला मै सैतान कब बन गया क्यों मुझे मेरा रास्ता यहातक लाया? न मैने सोचा था, अपनेआप हो गया न कोई मंजिल थी, फिर भी चलता गया!
काव्यरस

शिवसेनेचा 'आयबीएन लोकमत'वर हल्‍ला

लेखक मड्डम यांनी शुक्रवार, 20/11/2009 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई शिवसेनेवर कार्यक्रमातून व बातम्यांमधून टीका केली जात असल्‍याच्‍या आरोपावरून शिवसेनेच्‍या काही कार्यकर्त्‍यांनी 'आयबीएन-लोकमत' या मराठी वृत्तवाहिनीच्‍या कार्यालयावर जोरदार हल्‍ला करून या वाहिनीच्‍या कर्मचा-यांना व संपादक निखिल वागळे यांना जोरदार मारहाण केल्‍याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. 'आयबीएन-लोकमत' या वाहिनीच्‍या आजचा सवाल या कार्यक्रमात संपादक निखिल वागळे हे शिवसेनेवर वारंवार टीका करत असतात असा आरोप करून सुमारे 40 ते 50 शिवसैनिकांचा जमाव या वाहिनीच्‍या मुंबई कार्यालयावर चालून आला.

एक शून्य बाजीराव

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 20/11/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
१०९ वाचने आणि एकही प्रतिसाद नाही. त्यानंतर आलेल्या वाटेल त्या लिखाणावर वाटेल तो धिंगाणा चाललेला पाहीला, आणि म्हटले "आपला एक शून्य बाजीराव झाला." काय चुकले? कोणाच्या कंपूत जाता येईल? जाणकारांनी माहीती द्यावी. कंपूत प्रवेश करण्यासाठी काय करावे लागते?

ताजे होउन जा (फुल बाग)

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 20/11/2009 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
श्रध्दाजीं सारखी सुंदर रचना मला नाही करता येत पण जे सुंदर आहे ते नजरेतुन सहसा सुटत नाही. मग काय कॅमेरा सरसवायचा आणि सुरु.

शनिवारचा उतारा: ((संभवित) तह)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 20/11/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
तर आमचा हा संभवितपणा (आमचा यावर अजिबात जीव नाही!) व्यक्त करण्यासाठी आम्ही या कुबड्या वापरल्या. लेखणी दाबून आपुली खरडी उडवत जाऊया, विचार दाबूनी लेखन 'तिकडे' आपण पाडीत जाऊया॥ सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया, एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥ कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥ शांत राहूनी अंमळ थोडे नवे मार्ग शोधूया, हिंसा-शस्त्रे नाय कामाची उपहास थोडा लिहू या॥ थकलो तरी प्रयत्न व्यर्थ उपडा घडा पाहू या, मौजेस मित्रा अंत ना रे, सदर आपण चालवू या॥
काव्यरस

पाऊलखुणा..

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 20/11/2009 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणेच मावळतीकडे तोंड करून तो समुद्रकिना-यावरुन चालत होता. त्याच्या मनात कसला तरी कल्लोळ चालू असतानाच त्याची नजर खाली वाळूकडे गेली. त्या सोनेरी वाळूत त्याच्याच पावलांच्या बाजूने काही नाजूक पाऊलं उमटली होती...त्याच्यासारखीच पुढे जात असलेली. त्या पावलांचा मागोवा घेत तो एका खडकाजवळ पोहचला. ती तिथेच बसली होती. गालावर एक हात ठेवून बसलेली आणि तिच्या केसांची एक चुकार बट हळूच तिच्या गालांना स्पर्श करत होती. त्या खडकावर बसून जसं काही ती त्या सूर्याशी हितगूज करत होती...तिच्याकडे निरखून पाहताना त्याला जाणवले की तिचे डोळे खूप सुंदर आहेत.