धर्मक्षेत्रे भिक्षाक्षेत्रे........ २
पहिल्या भागाच्या प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद...
श्री क्षेत्र अक्कलकोट.
भक्त निवासात ब्यागा टाकुन आम्हि मंदिराकडे निघालो. दुकानांच्या गर्दितुन सरळ वाटेने मुख्य मंदिरात आलो. डोळे भरुन स्वामींचे दर्शन घेतले. दर्शन होईतो रात्रीच्या आरतीची वेळ झाली होती म्हणुन मंदिराच्या आवारात बसलो. मुख्य मंदिराच्याच बाहेर वटव्रूक्ष आहे. ती स्वामींची देहविसर्जनाची जागा. तिथे पादुकास्थापुन त्यावर एक घुमटी बांधली आहे. त्यावर डोके टेकवता येते. इथे पण स्टीलची तटबंदी आहेच. आरतीची वेळ झाल्यामुळे सेवकवर्गाची धावपळ सुरु झाली. मंदिराच्या आवारात एका बाजुला पुरुष आणी दुसर्या बाजुला स्त्रीयां. सर्वांना खाली बसण्याचा आदेश आला. सर्व दरवाजे आणी स्टील्च्या तटबंद्या बंद झाल्या. मला मात्र वटव्रूक्षाच्या बाजुलाच जागा मिळाली जेथुन मुख्य मुर्तींचे दर्शन होत होते. सगळे जण शांत होऊन आरती सुरु होऊन आरती सुरु होण्याची वाट बघु लागले. अचानक एक सेवेकरी एका भक्तावर खेकसला..... "आता दर्शन नाहि. आरती संपल्यावर घ्या. " त्या बिचार्या भक्ताला त्या पादुकांवर डोके टेकायचे होते, पण काय करणार बिचारा... गपचुप एका बाजुला जाऊन बसला.
बराच वेळ झाला तरी आरती सुरु होईना. तितक्यात एक घोळ्का मंदिरात शिरला. त्यात अग्रभागी एक सफेद कपड्यात असलेला इसम होता. बहुतेक राजकारणी किंवा मंदिर समिती पे॑कि असावा. त्यामागोमाग एक सुटाबुटातील व्यक्ती सोबत एक बाईसाहेब, एक छोटा मुलगा आणि चार पाच मंडळी. थोडक्यात कोणी बडी आसामी असावी. मग काय सांगता. सर्व दरवाजे धडाधड ऊघडले गेले. मंडळी आत गेली. दर्शन करुन बाहेर आली. बाहेरच्या त्या घुमटी भोवतीची स्टीलची तटबंदी पण ऊघडली गेली आणी त्या सर्वांनी तिथे डोके पण टेकवले. मला मात्र त्या मघाशच्या माणसाची आठवण झाली आणी स्वामी चरित्रातला प्रसंग आठवला.... एकदा अक्लकोटचे राजे स्वामींच्या दर्शना साठी आले. येताना सगळा सरंजाम घेऊन हत्तीवर बसुन आले. आल्या बरोबर स्वामींच्या चरणाशी लागले. स्वामींनी राजांचा मुकुट उडऊन टाकला राजांच्या एक थोतरीत मारली आणी म्हणाले 'राजा असशील तर आपल्या घरी माझ्या समोर नाहि'. त्या दिवसा पासुन राजा स्वामींसमोर येताना सगळा सरंजाम दुर ठेऊन यायचा..
असो.....
श्री क्षेत्र तुळ्जापुर.
अक्कलकोटहुन आमचा मुक्काम हलला तो सोलापुर मार्गे तुळ्जापुरला. दिवस होता नवरात्रीची दुसरी माळ म्हणजे अश्विन शुध्द व्दितिया. भरपुर गर्दि अपेक्षीत ठेऊनच आम्हि तिथे गेलो होतो. देऊळाची सुंदर तटबंदि आणि प्रत्येक महाद्वाराला दिलेली थोर योध्द्यांची नावे. धातुसंशोधक यंत्रातुन आत जाऊन मुख्य मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करते झालो. एक मोठा घोळ्का ऊभा होता. रांग कुठुन सुरु होते असे विचारले तर हिच रांग म्हणुन ऊत्तर मिळाले. थोड्याच वेळात धक्काबुक्की, घुसाघुशी सारखे नेहमीचे रांगेतले नियम पाळायला लोकांची सुरुवात झाली. त्या मुळे तिथे असलेला पोलिस पिसाळ्ला. त्याने सगळ्यांना बडवायला सुरुवात केली. बायका, लहान मुले, म्हातारी माणसे सग्ळ्यांना त्याचा प्रसाद मिळाला. ह्या सगळ्याला कंटाळुन आम्ही त्या गदारोळातुन बाहेर पडलो आणि एका एल सी डी वर देवीचे थेट दर्शन होते तिथेच जाऊन नमस्कार केला. तेव्हडयात बाजुला ऊभा असणारा एक पुजारी सद्रुश्य माणुस आमच्या कडे आला आणि म्हणाला ३५० रु द्या थेट आत देऊळात नेऊन दर्शन देतो. हेच होते तेथील गे॑र व्यव्स्थेचे कारण. कळसाला आणी त्या माणसाला नमस्कार करुन खिन्न मनाने पंढरपुरच्या प्रवासाला निघालो.
याद्या
4221
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
वा
अशा
+१ सहमत
In reply to अशा by फ्रॅक्चर बंड्या
अस्वच्छता...
वरील सर्व
आपण जेव्हा
कुठे शोधसी रामेशवर अन कुठे शोधसी काशी
अक्कलकोट,