भरली वांगी
साहित्य : ६ छोटी वांगी , १ वाटी भाजलेले शेंगदाणे, ६ लसुण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, कांदा लसुण चटणी २ चमचे, मीठ चवीप्रमाणे, फ़ोडणीसाठी तेल आणि फ़ोडणीचे साहित्य...
कृती : प्रथम वांग्याची देठे थोडी काढुन टाकावीत.. म्हणजे साधारण वांग्याला वर अर्धा इंच देठ ठेवले तरी चालतील. वांग्याला खालील बाजुने (+) अशा आकारात चिरा द्याव्यात आणि वांगी पाण्यात बुडवुन ठेवावीत. मिक्सर मधे शेंगदाणे,लसुण, थोडी कोथिंबीर,चटणी, मीठ घालुन जरा जाडसर काढावे. आता पाण्यातुन वांगी बाहेर काढुन घ्यावीत. मिक्सर मधुन काढलेला मसाला वांग्यामधे भरावा.
मिसळपाव
कृती : एका छोट्या बाउल मधे चिरलेला पालक घेउन त्यात फ़ेटलेले दही घालावे. बुंदी घालावी, जिरे पुड
मीठ साखरपुड घालुन एकत्र करवे आणि खायला घ्यावे...
हा पदार्थ जेवायला बसयाच्या थोडा वेळ आधीच तयार करावा नाहीतर बुंदी खुप मऊ होते.
साहित्य-
१. ५ ते ६ कप केक (कोणताही तयार केक चालेल मी कप केक वापरला)
२. आर्धा लिटर दुधाचे कस्टर्ड करुन घ्या
३. अननस, द्राक्ष, पपई, किवी, स्ट्रौबेरी, पिच चे तुकडे (तुम्हाला आवडणारी फळे त्यांचे तुकडे करुन वापरा अन्यथा हवाबंद ड्ब्यातही फळांचे तुकडे सिरपमधे मिळतात तेही वापरु शकता)
४. टुटी फ्रुटी
५.