भरली वांगी
साहित्य : ६ छोटी वांगी , १ वाटी भाजलेले शेंगदाणे, ६ लसुण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, कांदा लसुण चटणी २ चमचे, मीठ चवीप्रमाणे, फ़ोडणीसाठी तेल आणि फ़ोडणीचे साहित्य...
कृती : प्रथम वांग्याची देठे थोडी काढुन टाकावीत.. म्हणजे साधारण वांग्याला वर अर्धा इंच देठ ठेवले तरी चालतील. वांग्याला खालील बाजुने (+) अशा आकारात चिरा द्याव्यात आणि वांगी पाण्यात बुडवुन ठेवावीत. मिक्सर मधे शेंगदाणे,लसुण, थोडी कोथिंबीर,चटणी, मीठ घालुन जरा जाडसर काढावे. आता पाण्यातुन वांगी बाहेर काढुन घ्यावीत. मिक्सर मधुन काढलेला मसाला वांग्यामधे भरावा. जाड बुडाच्या कढईमधे फ़ोडणी साठी तेल घालुन त्यात मोहरी,जिरे,हिंग,हळद घालुन वांगी परतुन घ्यावीत आणि २ वेळा वाफ़ देउन घ्यावी. मग थोडे पाणी घालुन वर ताट ठेवुन शिजायला ठेवावीत. ही वांगी अपल्याला जशी हवी त्या पद्धतीने शिजवुन घ्यावीत. कारण कुणाला जास्त शिजलेली आवडतात तर कुणाला साधारण कमी शिजलेली. वांगी शिजल्यावर त्यावर चिरलेली कोथिंबीर घालुन भाकरी बरोबर खायला घ्यावी.
टीप : याबरोबर सायीचे दही असेल तर खुप छान लागते....
वांग्याला जर रस नको असेल तर एकदा फ़ोडणीत वाफ़वलेली वांगी काढुन जसे आपन मोदक चाळणीवर वाफ़वुन घेतो त्याप्रमाणे वाफ़वुन घ्यावीत... अशा भाजीला तेल जास्त सुटत नाही आणि फ़ोडणी मधे पण तेल वाचते.

वाचने
11175
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
गतप्राण
झक्कास
दुपार
सोबत गरमा गरम
मस्त
छान
वांगो
मस्तच
माझाही आवडता पदार्थ,,,,
चचलो!!!
चटकदार !! सू
बहोत अच्छे!
मस्त! भरली
मस्त
वा!!!!!!!!
वा वा