खांब-२
"Are you going to psyche me"? If it is so, you will be fourth.
अशीच एक शाळा. असाच एक कार्यक्रम.
कार्यक्रम झाल्यावर मुख्याध्यापिका जरा भावुक झाल्या सारख्या वाटल्या.
अजुनही जाणिवा बोथट न झालेल्या. शिक्षक पिढी घडवतो या गैरसमजात वावरणार्या.
"सर , पालकांसाठी पण एक कार्यक्रम कराल. आजकाल पालक होणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे"
तसे शिक्षक होणे सुद्धा.
"हो तेही बरोबर आहे म्हणा. जमत नसेल तर पेशा सोडायचा चॉइस असतो. पालकत्व सोडता येत नाही"
हम्म.
"तुम्हाला थोडा वेळ आहे का"? जरा एक कॉम्प्लिकेटेड केस आहे.
मिसळपाव