Skip to main content

अनंताचा खेळ..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 21/12/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
गेला रूसुनिया | कातर सांजेला | तेजाचा तो गोळा | लालबुंद || कललेली सांज | चढणारी रात | सोडुनिया साथ | रवी गेला || कुशित तमाच्या | नक्षत्रे सहस्र | नांदती एकत्र | चांदवर्खी || शशीबिंब नभी | लोभस देखणे | धरेचे लाजणे | पाहून ते || चंदेरी ही रात | सावळा शृंगार | क्षितिजाच्या पार | रवी पाही || वितळला राग | सोडी अहंकारा | मागतो किनारा | नभाकडे || भिजली पहाट | त्याच्या आसवांत | झाली वाटाघाट | चंद्रासवे || चांद परतूनी | रवीबिंब आले | क्षितिज रंगले | केशरात || रोजचाच घोळ | नाही ताळमेळ | अनंताचा खेळ | चालू राही || - प्राजु

म्हसवे - सर्वात मोठा वटवृक्ष

लेखक दशानन यांनी सोमवार, 21/12/2009 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी घरी निघावे म्हणून निघालो होतो. पाचवडच्या थोडे आधी एका हॉटेल मध्ये ब्रेकफास्टसाठी थांबलो. पुणे ते घर २६२ किमी चा प्रवास. त्यामुळे खूप वेळ हातात आहे असे वाटत होते. फोन चाळताना पुनेरींचा नंबर दिसला. एक कॉल केला व त्यांना येथे आसपास पाहण्यासारखं काही आहे का ते विचारलं. तर त्यांनी मला म्हसवे गावाचं नाव सांगितले पाचवडहून उजव्या हाताला वळलो. चांगले दहा एक किलोमीटर पुढे गेलो तरी काही वडाच्या जंगलाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. शेवटी एकाला थांबवला आणि त्याविषयी विचारले. तर तो म्हणाला उलट आला आहात. सरळ परत पाचवडला जा, तेथून डाव्या बाजूने सरळ जाऊन पहिला उजवा कट मारा.

रेडी टु कुक (खास भटक्यांसाठी)

लेखक jaypal यांनी सोमवार, 21/12/2009 13:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील भटक्या(ट्रेकर) अणि विमुक्त जनतेसाठी खास "रेडी टु कुक" रेसीपी. बहुसंख्य भटक्यांच त्यांच्या भटकंती दरम्यान जेवण म्हणजे दालखिचडी.

ए४ आकाराची कहाणी

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 21/12/2009 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
ए४ आकाराचा कागद आपल्या साऱ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे. हा आयाताकृती, उभट कागद २९७ x २१० मिलीमीटर आकाराचा असतो. पण तसा तो का असतो? याचा आपण कधीच विचार करत नाही. एवढ्या अडनेडी आकारास इतक्या विस्तृत प्रमाणात स्वीकृती कशी काय लाभलेली आहे? त्याचा इंचातल्या जुन्या मापनपद्धतीशी काही अर्थाअर्थी संबंध आहे काय? थोडक्यात म्हणजे या ए४ आकाराचा जन्म कसा झाला असावा? हा प्रश्न भल्या भल्यांची उत्सुकता चाळवू शकतो. मला कळलेल्या, ए४ आकाराच्या कागदाची कहाणी मी इथे सांगणार आहे. उभट आकार वाचण्यास सोपा असतो. म्हणूनच वर्तमान पत्रांतही स्तंभलेखनच लोकप्रिय होते.

kids expressions - बाल मुद्रा

लेखक मॅन्ड्रेक यांनी रविवार, 20/12/2009 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , गावाला गेलो असताना घरातल्या मुलांची काही expressions टिपली आहेत.

भारतीय महिला भारतीय पुरुषांसारखे वागायला लागल्या तर काय होईल?

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 20/12/2009 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय महिला भारतीय पुरुषांसारखे वागायला लागल्या तर काय होईल? उदा- भारतीय पुरुषांना जर मोजे धुवायला सांगितले तर जेव्हढे पाणी साधे मोजे धुवायला वापरतील तेव्हढे पाणी जर भारतीय महिला वापरायला लागल्या तर पुण्यासारख्या ठिकाणी धुण्याच्या पाण्यासाठी आणखी ३ धरणे बांधावी लागतील. वरील उदाहरणाप्रमाणे आणखी उदाहरणे मिपाकर उत्साहाने सांगतील अशी अपेक्षा. :-) ह्या चर्चेचा हेतू प्रामाणिक आहे; पुरुषवर्गावर चिकलफेक अथवा त्यांना खिजवण्याचा अजिबात हेतू नाही.

एकाकी वाट

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 20/12/2009 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकाकी वाट वाट चालतो चालतो दूर पळते क्षितीज चांदण्या विझलेल्या, नेत्री थबकली नीज बोचे अचानक खोल तुझ्या मायेचा पाखर पिसाटले पळतांना लागे तीच ती ठोकर भुक उफ़ाळून शोधे तुझी झुणका भाकर पण सारतो पोटात दाम मोजून जहर कुठे वाटेत गळाली एका उदराची नाती चेचून तोडली भिंती विटांच्या आघाती झुले बाजुला पारंब्या, आपापले गीत गाती पालेमुळे गुंतलेली, येई कुणीही ना हाती त्यांच्या झावळी मिटल्या माझे बोडके आकाश फ़ुका बागेत सावली, शोधे जीव कासावीस वाट निष्पर्ण एकाकी त्रयत्स्थांची गर्दी दाटे दूर खुणावती फ़ुले, इथे धूळ आणि काटे जन्मोजन्मीचा हात, सोबती जोवरी साथ अडवुन नेत्रीची नीज, अथक चालतो वाट ****************
काव्यरस

"रिश्ते में तो ..."

लेखक मीनल यांनी शनिवार, 19/12/2009 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
श्री आर बालकृष्णन बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला `पा` हा चित्रपट नुकताच प्रकाशित झाला आहे. या चित्रपटाची कथा इंटरनेट वर तसेच टीव्ही वरच्या जहिरातीतूनही सांगितली गेली आहे. कथा तशी वेगळी असली तरी दुर्बळ आहे. त्यामुळे उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट नाही आणि कथेत खूप बदल घडवणारे प्रसंगही नाहीत. मध्यंतरा आधीच चित्रपटाचा शेवट काय असेल ह्याचा अंदाज बांधता येतो. कॉमेडी ,सस्पेन्स, थ्रीलर, ऍक्शन वगैरे प्रकारांच्या जवळूनही जाणारा ही सिनेमा नाही.

स्पर्धा

लेखक नि३ यांनी शनिवार, 19/12/2009 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या ऑफीस मधे ख्रिसमस निमीत्त रोज काही ना काही स्पर्धा होत असते. तर आज एक अशी स्पर्धा होती कि ,तुम्हाला दोन ओळी दिल्या जाईल त्यावरुन तुम्हाला कविता लिहायची आहे.बक्षीस अर्थातच जी कवीता जास्त मिनींगफुल असेल त्याला मिळणारच.... तर सुरवात आहे , मनात होते बरेच काही, मनात सारे राहुन गेले, ---------- - मिपाकरहो ,क्रुपया आपण यात मला मदत कराल अशी अपेक्षा करतो आणी माझे दोन शब्द संपवीतो. जय हिंद , जय महाराष्ट्र. नि३.