मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अनंताचा खेळ..

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गेला रूसुनिया | कातर सांजेला | तेजाचा तो गोळा | लालबुंद || कललेली सांज | चढणारी रात | सोडुनिया साथ | रवी गेला || कुशित तमाच्या | नक्षत्रे सहस्र | नांदती एकत्र | चांदवर्खी || शशीबिंब नभी | लोभस देखणे | धरेचे लाजणे | पाहून ते || चंदेरी ही रात | सावळा शृंगार | क्षितिजाच्या पार | रवी पाही || वितळला राग | सोडी अहंकारा | मागतो किनारा | नभाकडे || भिजली पहाट | त्याच्या आसवांत | झाली वाटाघाट | चंद्रासवे || चांद परतूनी | रवीबिंब आले | क्षितिज रंगले | केशरात || रोजचाच घोळ | नाही ताळमेळ | अनंताचा खेळ | चालू राही || - प्राजु

वाचने 5979 वाचनखूण प्रतिक्रिया 20

jaypal Mon, 12/21/2009 - 22:19
प्राजुजी नेहमी प्रमाणेच छान झालीय कविता. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

दशानन Mon, 12/21/2009 - 23:23
प्राजु, नेहमी प्रमाणेच सुरेख कविता आवडली. :) आजकाल शांत झाला आहात तुम्ही का बरे ? ***** राज जैन, सध्या नर्‍हे, पुणे येथे मुक्काम

रेवती Tue, 12/22/2009 - 00:03
चांगली कविता! डोळ्यासमोर संध्याकाळ आली. बाकी आम्ही छंदाच्या फंदात पडत नाही म्हणून काय झालं? कविता आवडली. रेवती

पाषाणभेद Tue, 12/22/2009 - 07:21
ज ब र द स्त अभंग रचना. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

प्राजु गुरुवार, 12/24/2009 - 22:45
आदिती, स्नेहाराणी, प्रा. डॉ. मनापासून आभार. - प्राजक्ता http://www.praaju.com/

हर्षद आनंदी Fri, 12/25/2009 - 07:30
मस्त वर्णन आहे चंदेरी ही रात | सावळा शृंगार | क्षितिजाच्या पार | रवी पाही || वितळला राग | सोडी अहंकारा | मागतो किनारा | नभाकडे || भिजली पहाट | त्याच्या आसवांत | झाली वाटाघाट | चंद्रासवे || ईथे कविता वादातीत उंची गाठते.. दवबिंदुंना आसवाचे रुप देण्याची कल्पना उच्चच !!! आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

प्राजु Fri, 12/25/2009 - 20:28
सौरभ, हर्षद आनंदी आपले मनापासून आभार. - प्राजक्ता http://www.praaju.com/