Skip to main content

उत्सव ...!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/01/2010 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
*********************************************** मेघांचे उत्सव रिमझिमणारे जलदांचे अन गूढ चिंतन समीर बावरा निरंतर गातो आषाढातील जलदाच्या वेणा... निळे सावळे घन थरथरणारे दव-बिंदूचे अन हळवे स्पंदन विहग स्वरांचे सुखे मिरवती शुभ्र क्षणांचा सुरेल मेणा... गीत अधरीचे ते हुळहुळणारे थिजलेल्या अन मौनाचे मंथन मेघही वळले होवून आतूर अन जलधारांची अक्षयवीणा... ते मुग्ध इशारे प्रतिबिंबांचे रुजलो अन होवून हिरवे पाते लंघून सार्‍या सीमा शब्दांच्या एकटा कोरतो मौनाच्या लेण्या... *****************************************************
काव्यरस

ओझी

लेखक क्रान्ति यांनी शुक्रवार, 08/01/2010 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आहे तीच जड झाली, नका लादू रे आणखी खुळ्या अपेक्षांची ओझी किती पेलावी सारखी? रोज अंतहीन चालणारी जीवघेणी स्पर्धा उरी फुटेतो धावून इवलासा जीव अर्धा तोही राही कुठे आता?
काव्यरस

२६/११ ला मुंबईवर लादल्या गेलेल्या रक्तलांछित हल्ल्यांपासून आपण काय शिकले पाहिजे?

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 07/01/2010 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानी अतिरेक्यांनी २६/११ ला मुंबईवर केलेल्या रक्तलांछित हल्ल्याचे वर्णन पहातांना, वाचतांना व ऐकतांना असं वाटलं होतं कीं इतक्या लोकांना, पोलिसांना व शेवटी लष्करालाही २-२॥ दिवस तंगवून सोडणारं हे पथक ३०-४० लोकांचं तरी असावं. मग कळलं कीं फक्त दहाच पाकिस्तानी अतिरेक्यांनी इथं येऊन हा अनर्थ केला व असा प्रचंड धुमाकूळ इथं यशस्वीपणे घातला.

नववर्ष

लेखक सुबक ठेंगणी यांनी गुरुवार, 07/01/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
धुवाधार पावसाचे, तायफूच्या वादळवा-याचे, पानांच्या लाजण्याचे आणि रंगीत पाचोळ्याचे दिवस हा हा म्हणता सरत जातात. हळूहळू गाडीच्या काचांवरच्या फ़्रॉस्टमधून, कंच धुक्यातून, ता-यांनी गच्च भरलेल्या बिलोरी आकाशातून हिवाळयाची चाहूल लागते. डिसेंबरच्या अगदी सुरुवाती सुरुवातीला विंचरलेल्या काळ्याभोर शेतांच्या भांगातला भुरभुर बर्फ़ सकाळच्या अल्लड उन्हात लखकन चमकताना दिसायला लागतो. आणि मग एक दिवस नीरव शांततेत कुणीतरी सहज व्हायोलिनचे एकाकी सूर छेडावेत तसा बर्फ़ पडायला लागतो. ओस पडलेल्या रस्त्यांवरून क्वचित एखादी गाडी वाट मळवत निघून जाते. मग फक्त बर्फ़ाच्या शुभ्र म्हाता-या हवेत भिरभिरत रहातात.

भरती-ओहोटी आणि चंद्र-सुर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती

लेखक अमृतांजन यांनी गुरुवार, 07/01/2010 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
भरती-ओहोटी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तिचा संबंध खालील चित्रांमधे दाखवला आहे. समुद्राचे पाणी त्या शक्तिमुळे अक्षरशः वर खेचले जाते व चंद्राच्या पृथ्वी प्रदक्षिणेमुळे पृथ्वीच्या अशा भागावर भरती येते जेथे चंद्र सगळ्यात जवळ असेल. रोजच भरती-ओहोटीचे चक्र त्यामुळे चालू राहते. अमावस्या आणि पोर्णिमेला येणारी भरती-ओहोटी जास्त जाणवते कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तिबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्तीही मिळते व पाणी जास्त उचलले जाते. चित्र क्र. १ चित्र क्र.

तुमच्‍या संगणकावर ऑफलाईन क्रिकेट स्‍कोर अपडेट

लेखक मड्डम यांनी गुरुवार, 07/01/2010 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारत-बांग्लादेश-श्रीलंका यांच्‍यातील तिरंगी मालिका सुरू झाली आहे. श्रीलंकेविरोधातील कार्बोन कप मालिका जिंकल्‍यानंतर अति उत्‍साहाने मैदानावर उतरलेल्‍या भारतीय संघाला नवीन वर्षाच्‍या पहिल्‍याच सामन्‍यात लंकेच्‍या नवख्‍या संघाकडून पराभव पत्करावा लागला. त्‍यामुळे मालिकेपूर्वी विजयाचा पक्का दावेदार समजल्‍या जाणा-या टीम इंडियाकडून अपेक्षाभंग होतो की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. सामना डे-नाईट असल्‍याने ऑफीसमध्‍ये कामात व्‍यस्‍त असताना सामना टीव्‍हीवर पाहणे शक्य नसते.

गोलमाल है भाई सब गोलमाल है..

लेखक रामदास यांनी गुरुवार, 07/01/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारीख :२००३ सालच्या फेब्रुवारी महिन्याची. स्थळ :ठाण्याजवळची एक नविन सोसायटी. दुसर्‍या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये चार माणसं .तीन पुरुष .एक स्त्री. एका पुरुषाला बेडरुममध्ये पलंगावर बांधून ठेवलेलं आहे. त्याच्या तोंडात बोळा कोंबून ठेवला आहे. स्त्री बहुधा नर्स असावी.पण पूर्णशिक्षीत नसावी. पलंगावर बांधून ठेवलेल्या माणसाच्या लक्षात आलं आहे की हे त्याचे शेवटचे काही श्वास आहेत. एकदा निकराचा प्रयत्न करून तो स्वत:ला सोडवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. त्या बाईच्या हातात एक सिरींज .त्यात पोटॅशियम क्लोराईड.