Skip to main content

मराठी ब्लॉगर्सचा रविवारी पुण्यात स्नेहमेळावा

लेखक कशिद यांनी गुरुवार, 14/01/2010 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी ब्लॉगर्सचा रविवारी पुण्यात स्नेहमेळावा सकाळ वृत्तसेवा Thursday, January 14, 2010 AT 08:54 PM (IST) Tags: blog, marathi, bloggers मराठीत नियमित लिहिणाऱया ब्लॉगर्सचा अनौपचारिक स्नेहमेळावा येत्या रविवारी (ता. १७ जानेवारी) पुण्यात होणार आहे. संध्याकाळी चार वाजता सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात हा मेळावा होईल. एकमेकांचा परिचय करून घेणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. मराठी ब्लॉगर्सनी एकत्रितपणे काही कार्यक्रम घेण्यासंदर्भातील रुपरेषाही मेळाव्यात ठरविता येणार आहे. आपापल्या ब्लॉग्ज् ची माहिती आणि इतर बाबींवरही मेळाव्यात चर्चा होईल.

[उन घे]

लेखक अमृतांजन यांनी गुरुवार, 14/01/2010 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्या तरल भावना, नाहीच आम्ही कधी पाहिल्या ज्या लिहिल्या आम्ही, विडंबितच डायरेक्ट झाल्या- ह्या तरल कवितेला मुजरा व हे त्याचे रुप- ती- शिजली कोबी सारी, पाणी ते टाकून दे जीवघेणा दर्प सारा, बंद नाक करुन घे... जेव नाही तर मुस्काडीत मारीन तुझिया घरचे खावे, तूच बोले, मुकाट्याने खाऊन घे.. उसळ नको तर हवे काय रे तुला गिळायला स्वैपाकाला आईला, तुझ्या बोलावून घे.. नेहमीचंच झालंय हे तुझे मी तरी काय करु? रात्रीचे शिळे न्याहरीला, खायची तयारी करुन घे.. तो- हात जोडूनी म्हणतो, असले हे बोलणे नको तुझे ते खाणारा नवरा नवा करुन घे.. तुझा तो तोरा, रोज ती, लाखोली मला क
काव्यरस

क- कवितेचा

लेखक बाबुराव यांनी गुरुवार, 14/01/2010 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमी येतो मिसळपाववर आन, चाळा म्हणून क्लिक करतो, लेख,कविता, आन पाककृतीवर. आवडलेल्या वळींवर फिरत राहतो कितीतरी येळ, आलटून-पालटून शांतपणे. आन बांधाबांध करतो मनातल्या प्रतिसादाची. असह्य कोंडमारा होऊन टाकता आला नाय प्रतिसाद तर, लॉगऑफ करुन, पाहत बसतो मॉनिटर कितीतरीवेळ अस्वस्थपणे.

(छंद दे)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 14/01/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूची सुरेख कविता 'छंद दे' वाचली आणि आमची संक्रांत आलीच!
काव्यरस

"Who killed Karkare?" by former IG, Maharashtra, S M Mushrif

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 14/01/2010 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा सभासदांनो, मी जेंव्हा "To the last bullet" या पुस्लिहिलेदोन लेख लिहिले तेंव्हा एका सभासदाने "Who killed Karakare या पुस्तकावरही लिहिणार का?" असा प्रश्न मला केला होता. मी कालच तेही पुस्तक मागवले, पण अनुक्रमणिका वाचल्यावर (खाली पहा) माझे असे मत झाले कीं हे पुस्तक हेमंत करकरे यांच्या हौतात्म्याबद्दल फारसे सांगत नाहीय् व इतर गोष्टींची चर्चाच जास्त आहे. या गोष्टीही वाचायला हव्यातच व म्हणून हे पुस्तक वाचणारही आहे, पण वाचण्याची priority कमी झाली. इतर कुणी हे पुस्तक वाचले आहे कां?

तळेगावचे सतीश शेट्टी

लेखक विकास यांनी गुरुवार, 14/01/2010 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
तळेगाव दाभाडे येथील सतीश शेट्टी हे नाव मला आज टाईम्स आणि नंतर सकाळ बघे पर्यंत माहीत नव्हते. मात्र त्यांच्या हत्येची बातमी वाचून त्यांच्याबद्दल वाईट वाटले, झालेल्या प्रसंगाबद्दल एकीकडे चीड आली आणि दुसरीकडे आपण पूर्ण रानटी होत आहोत का असे वाटून अस्वस्थता आली. सतीश शेट्टी, वय वर्षे ३९ ह्यांना एपिलप्सीसारखा आजार असूनही भ्रष्टाचाराविरुद्ध काम करत होते.

सूर्यग्रहणाचे दुष्परिणाम नको असतील तर हे वाचाच

लेखक नरेश_ यांनी बुधवार, 13/01/2010 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
सहस्त्रकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण येत्या शुक्रवारी म्हणजे दि. १५.१.२०१० रोजी येत आहे. सदियों के बाद म्हणजे पंधरा हजार चारशे अट्ठावन्न वर्षांनी हा दुर्मिळ अन खतरनाक योग येत आहे! प्रगाढपंडितांच्या मतानुसार, या वर्षीच्या सूर्यग्रहणावर अमावस्येची काळीकभिन्न छाया असणार आहे ;) संपूर्ण जगभरात याचे भयानक परिणाम ( पूर्वलक्ष्यी प्रभावाने) दिसून येणार आहेत.पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर अनुक्रमे पूर व अवर्षण, झालंच तर स्वाइन फ्लू, महागाई, भ्रष्टाचार, चलनवाढीचा वाढता दर, साखरेचे चढते भाव इ.इ.

शुभ्र काही जीवघेणे

लेखक जयवी यांनी बुधवार, 13/01/2010 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
अंबरीष मिश्र ह्यांचं “शुभ्र काही जीवघेणे” हे पुस्तक नुकतंच वाचलं. पुस्तकाचं नाव वाचूनच आत काहीतरी झालं. पुस्तक नक्कीच काहीतरी खास असणार असं वाटलं. अंबरीष मिश्र ह्या लेखकानं मराठीत इतक्या सुंदर नावाचं पुस्तक लिहावं…म्हणजे थोडं आश्चर्यच वाटलं. थोड्याशा कुतूहलानेच पुस्तक वाचायला घेतलं आणि लेखकाची पुरती फॅन झाले. काही मनस्वी कलाकारांबद्दल ह्या लेखकाने असं काही लिहिलंय ना……. की त्या कलावंताच्या प्रेमात पडावं की लेखकाच्या…… ह्याच संभ्रमात पडायला होतं. लिखाण असं काही काळजात घुसतं ना…..!!