Skip to main content

मंदिराच्या बाजूला मशीद

लेखक बाबुराव यांनी शुक्रवार, 19/02/2010 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
''मुस्लीम बांधवांनी हिंदुच्या भावनांचा आदर करुन अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर भव्य राममंदिर उभारण्यासाठी मोठ्या मनाने सहकार्य करावे, आम्ही बाजूला बाबरी मशीद बांधून देऊ.” भाजपाचे नवे अध्यक्ष नितीन गडकरी. [बातमी ] भाजपाला मुस्लीम बांधवांच्या मताची आठवण झालेली दिसून राह्यली. त्यायच्या मतावर सत्तेचं सपन पडाया लागून राह्यलं. हा आता असं केलं तर बंधूभाव वाढीला लागन का ? आन ही गोठ मुस्लीम बांधवाला आन हिंदू बांधवाला मान्य होईन का, काय म्हणता ?

कार्तिकी,मिलिंद व पोटदुखी.........

लेखक वेताळ यांनी शुक्रवार, 19/02/2010 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
कार्तिकी सारख्या एका सुमार गायिकेला लिटिल चॅम्प करुन झी टीव्हीने अगोदरच वाद निर्माण केला आहे. थोर संगीताचार्याच्या मते हा निव्वळ मुर्खपणा होता. :T आता तर मिलिंद इंगळेनी तिला आपल्या चित्रपटात गायिका करुन कहरच केला आहे.????? :P http://72.78.249.125/esakal/20091227/5117311988583675148.htm त्यामुळे काही लोकाना पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता बळावली आहे. त्यानी इनो घ्यावा ही विनंती.

जिजाऊ दाखवा.....

लेखक उदय सप्रे यांनी शुक्रवार, 19/02/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रेम नमस्कार आणि सुप्रभात ! हिंदु(स्थान) हॄदयसम्राट प्रौढप्रताप पुरंदर गोब्राह्मणप्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांची आज ३८० वी जयंती ! या थोर सेनानीस मानाचा त्रिवार मुजरा करून एक लेख इथे देत आहे त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती ! विज्ञापना, जाणिजे.....लेखनालंकार..... जिजाऊ दाखवा..... 'रायगडावरील होळीच्या माळावरून जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना आज इतक्या वर्षांनी पण आम्हांस असं अस्वस्थ का वाटावं?' असा वेडा प्रश्न आज आम्हाला स्वतःला ३८० वर्षांनी पण पडलाय ! अं , काय म्हणालात? ३८० वर्षे कुणी जिवंत असेल का?

आमच्या शाळेवर काढलेली लघू चित्रफित

लेखक शनआत्तार यांनी गुरुवार, 18/02/2010 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार आमच्या शालेत चालणा-या संगश्ज्शिक्षणावर शिक्श शिक्षणावर एक चित्रफित तयार करण्यात आली आनि आणि जगातील ब-याच शहरात दाखवीन्यात आली त्याची लिकं या ठिकाणी देत आहे अवश्य वाचा http://manishchand.blogspot.com/2009/07/documentary-review-on-ict-harve…

(जगताना)

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 18/02/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
जगताना... शर्ट म्हणून जगताना खूप खोचावं लागतं स्वत:च्या फाटक्या बनियनला नीट झाकावं लागतं ताठ कॉलरनं जगताना घामाने भिजावं लागतं आणि इस्त्रीच्या वाफेखाली स्वतःला झोकाव॑ लागत॑ वॉशिंग मशिनच्या गोलात खूप घुमावं लागतं ड्रायरच्या गरम जाळात वाळवून घ्यावं लागतं चिखलाचा सामना करताना पांढरेपण जपावं लागतं चुरगळण्याच्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं टर टर फाटताना थोडं तुटावं लागतं कपाटातल्या घडीसाठी खूप वेळ पळावं लागतं
काव्यरस

मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास!!!

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 18/02/2010 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच वाचनात आले की महिलांचा वापर विघातक कारवायांसाठी होवू शकतो आणि त्या स्कार्फ बांधत असल्याने समस्या आणखी जटील होते, ओळख पटवणे कठीण होते. मागेही एकदा पुणे पोलिस आयुक्तांनी मुलीनी चेहेराभर स्कार्फ़ बांधण्यासाठी विरोध दर्शवला होता. मुलींचे प्रदुषणा पासून, उन्हापासून संरक्षण व्हावे आणि चेहेरा खराब होवू नये हा जरी उद्देश्य त्यामागचा असला तरी त्याचा वापर आपली ओळख लपवण्यासाठी, आपण कुणाबरोबर फिरतो आहे हे कुणालाही समजू नये अशा अयोग्य गोष्टींसाठीसुद्धा काही मुलींकडून केला जातो, हे सुद्धा तितकेच खरे आहे.

हुंकार वेदनांचे ...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 18/02/2010 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे किती भाजलय रे ? कुठे गेला होतास चटके खायला ? बेअक्कल! २/२ महिने घराबाहेर राहुन तुमच्यासाठी झिजायचे आणी घरी आले की हे भोगायचे.." बाबा माझ्या हाताला मलम लावता लावता बोलत होते. मी केवीलवाण्या चेहर्‍याने ऐकत होतो. आईने बंबाच्या गरम राखेत हात कोंबला हे सांगायची भिती वाटली.... हो भितीच. मला सगळ्याची भितीच वाटते. आईची, घराच्या भिंतींची, शाळेची, शाळेतल्या मुलांची.... ******************************** आज बाबा आणी शाळेचे पत्र एकत्रच घरी आले. 'एकदा समक्ष येउन भेटा' शाळेतुन पत्र आले होते. "अहो तुमचा मुलगा पहिल्या पाचातला वगैरे नाही, पण हुषार आहे हो.

"मिड-लाइफ क्रायसिस" अर्थात एका लेखकाचे 'मनोगत'

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 18/02/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली भरपूर शिकवण्यातून वेळ मला असतो 'आयुष्याच्या मध्या वरचा घोळ' मला छळतो वळवळणारा किडा नाही बसू देत शांत खाज सुटून शिवशिवतात रोज माझे हात विचार करून डोक्याचा या होतो नुसता भुंगा शेवटी म्हटलं जालावरती करू थोडा दंगा लिहायला बसलो आणि लक्षात माझ्या आलं पुन्हा एकदा जाणवलं आपलं वय झालं पूर्वीसारखं आता मला जमत नाही काही म्हणून म्हटलं घिसेपिटेच लिहू काहीबाही हॉटेलातल्या माणसांना चिमटे काढू आज नंतरच्या चर्चेने मग नक्की भागेल खाज कण्हतकुथत 'बनी' गत 'हणम्या' उभा केला ओढून ताणून कसाबसा लेख पूर्णं केला काठावर बसून आता मजा बघतील कोणी विरजण घालता घालता अन काड्या घालतील कोणी हातोड्याने "केश्या"च्या येव