"मिड-लाइफ क्रायसिस" अर्थात एका लेखकाचे 'मनोगत'
हल्ली भरपूर शिकवण्यातून वेळ मला असतो
'आयुष्याच्या मध्या वरचा घोळ' मला छळतो
वळवळणारा किडा नाही बसू देत शांत
खाज सुटून शिवशिवतात रोज माझे हात
विचार करून डोक्याचा या होतो नुसता भुंगा
शेवटी म्हटलं जालावरती करू थोडा दंगा
लिहायला बसलो आणि लक्षात माझ्या आलं
पुन्हा एकदा जाणवलं आपलं वय झालं
पूर्वीसारखं आता मला जमत नाही काही
म्हणून म्हटलं घिसेपिटेच लिहू काहीबाही
हॉटेलातल्या माणसांना चिमटे काढू आज
नंतरच्या चर्चेने मग नक्की भागेल खाज
कण्हतकुथत 'बनी' गत 'हणम्या' उभा केला
ओढून ताणून कसाबसा लेख पूर्णं केला
काठावर बसून आता मजा बघतील कोणी
विरजण घालता घालता अन काड्या घालतील कोणी
हातोड्याने "केश्या"च्या येव्हढं मला कळलं आहे
कुस्करी होत नाही तोवरच मस्करीत मजा आहे
लेखनविषय:
याद्या
5609
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
व्वा!
है
अपन एक
हेच...
एकदम जॉबर्या केसू, एकदम जॉबर्या!!
हाहाहाहाहा!
मनोगत आवडल
जुगलबंदी
+१
In reply to जुगलबंदी by शुचि
क्या बात है...!
ऑं?
In reply to क्या बात है...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा
In reply to ऑं? by श्रावण मोडक
अर्र
In reply to हा हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाहव्वा! मस
लई भारी
मिड लाईफ
In reply to लई भारी by सन्जोप राव
पटलेल्या ओळी
कण्हतकुथत 'बनी' गत 'हणम्या' उभा केला
हे वाचा
In reply to कण्हतकुथत 'बनी' गत 'हणम्या' उभा केला by सुवर्णमयी
केश्या,
हॅ हॅ हॅ
हॅहॅहॅ
पुन्हा
धन्यवाद!!
चलने दो
आयला!!!
बाकी,