आज भाईंचा दहावा स्मृतीदिन.. मला कळायला लागले तेव्हापासुन मी त्यांचे लेखन वाचतोय.. प्रत्येकवेळेला अवर्णनीय आनंद तर मिळालाच पण त्याहुनही एक मौल्यवान ठेवा मिळाला, तो म्हणजे.. आयुष्याकडे बघण्याचा एक उमदा, जागृत, संवेदनशील तरीही सजग दृष्टिकोन..
दहा वर्ष झाली.. पण खरच भाई गेलेत का? ' माझ्यापुरते भाई आहेतच, ते अजुनही एखाद्या निर्णायक 'अर्जुन'क्षणी आतून साद घालतात.... जाब चिचारतात....