डेटाबेसमध्ये काहीतरी गडबड

धनंजय's picture
धनंजय in काथ्याकूट
10 Jun 2010 - 9:28 pm
गाभा: 

संकेतस्थळाच्या डेटाबेसमध्ये काहीतरी गडबड झालेली दिसते. माझ्याच कित्येक लेखांच्या ठिकाणी जायचा प्रयत्न करता "प्रवेश प्रतिबंधित" असा संदेश येत आहे.

(अन्य सदस्यांचेही गेल्या महिन्यातले लेख दिसत नाहीत.)

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

10 Jun 2010 - 9:29 pm | नाटक्या

काहीतरी गडबड वाटते आहे...

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

राजेश घासकडवी's picture

10 Jun 2010 - 9:31 pm | राजेश घासकडवी

मलाही गेला अर्धा तास असाच अनुभव येतो आहे. माझे लेखन वर क्लिक केल्यावर रिकामं पान येतं.
तसंच छंदशास्त्र मध्ये वेगवेगळे लेख दिसत आहेत.

चतुरंग's picture

10 Jun 2010 - 9:32 pm | चतुरंग

माझ्या जुन्या लेखनाचे अगदी शेवटच्या पानापर्यंत.
मला तरी काही समस्या आली नाही.
कदाचित काही तात्पुरता प्रश्न असावा.

चतुरंग

पक्या's picture

10 Jun 2010 - 9:33 pm | पक्या

बहुतेक फुटबॉल साठीचा नविन विभाग बनवताना तर काही गडबड झाली नसेल?
जय महाराष्ट्र , जय मराठी !

II विकास II's picture

10 Jun 2010 - 9:34 pm | II विकास II

मला पण तसेच वाटते आहे.

नीलकांत दिसत आहे, कदाचित त्याने काम चालु केले असेल.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

शुचि's picture

10 Jun 2010 - 9:34 pm | शुचि

माझे सगळे लेख उडलेयत. बरय =))

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पंगा's picture

10 Jun 2010 - 9:40 pm | पंगा

कोणाला तरी डिलीट बटनाबरोबर डिलीट कमांडचाही शोध लागलेला दिसतोय. थेट डेटाबेसमध्ये जाऊन उडवाउडवी! मज्जा!

सध्या बहुधा व्हेअर क्लॉज़शी चाळे चालले असावेत.

हात रे काऊ!

(काऊला हिंटः डिलीट कमांडला व्हेअर क्लॉज़ नसला तरी चालू शकतो.)

- पंडित गागाभट्ट.

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 9:43 pm | प्रियाली

मला तरी काही वावगं दिसत नाही. आल इज वेल!

नीलकांत's picture

10 Jun 2010 - 10:42 pm | नीलकांत

नवीन साहित्य प्रकार बनवतांना अधिकार देताना गोंधळ झाला होता. आता मात्र सर्व ठिक आहे. कुणाला याबाबत काही अडचण असेल तर याच धाग्यावर चर्चा पुढे चालू ठेवावी.

- नीलकांत

धनंजय's picture

10 Jun 2010 - 10:50 pm | धनंजय

आता पूर्ववत!

विनायक प्रभू's picture

10 Jun 2010 - 11:46 pm | विनायक प्रभू

त्या निमित्ताने सह्जकाकांची दुसरी बाजु बघायला मिळाली.

टारझन's picture

12 Jun 2010 - 12:14 pm | टारझन

श्श्श्स्श्श्शी !!! सहजरावांना शुभेच्छा :)

शिल्पा ब's picture

11 Jun 2010 - 11:18 pm | शिल्पा ब

मला विसोबा खेचर यांनी टाकलेला मिपाच्या मुखपृष्ठाविषयीचा धागा दिसत नाही आणि मी आताच त्यावर एक प्रतिक्रिया टाकली होती...धागा उडवला आहे का माझ्या संगणकात काही बिघाड आलाय?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पक्या's picture

11 Jun 2010 - 11:39 pm | पक्या

हो ना, मलाही दिसत नाहिये तो धागा.. उडवला कि काय? तसे असे असेल तर असे काय होते त्यात उडवण्यासारखे?
जय महाराष्ट्र , जय मराठी !

मदनबाण's picture

12 Jun 2010 - 9:09 am | मदनबाण

डेटाबेस मधे अजुन गोंधळ चालु आहे काय ? मिपाचे मुखपॄष्ठ का बदलण्यात आले आहे ?
ते फिफावाले मुखपॄष्ठ स्वर्गवासी झाले काय ?

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

मदनबाण's picture

12 Jun 2010 - 9:57 am | मदनबाण

स्वर्गवासी झालेले फिफावाले मुखपॄष्ठ परत लावण्यात यावे...
इथे एक स्वतंत्र विभाग जर या गोष्टीसाठी बनवण्यात आला आहे, जो लोकाग्रहास्तव बनवण्याचे नमुद करण्यात आले आहे त्याच लोकाग्रहास्त फुटबॉलचे मुखपॄष्ट परत लावले जावे.

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

शिल्पा ब's picture

12 Jun 2010 - 10:16 am | शिल्पा ब

+१
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रमोद देव's picture

12 Jun 2010 - 10:29 am | प्रमोद देव

+२

jaypal's picture

12 Jun 2010 - 10:35 am | jaypal

त्या फिफाच्या मु .पृ. ला का बर लाथ घातली ? तेच मु .पृ. परत येउ द्या ही संपादकांना आग्रही विनंती.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विसोबा खेचर's picture

12 Jun 2010 - 10:45 am | विसोबा खेचर

त्याच लोकाग्रहास्त फुटबॉलचे मुखपॄष्ट परत लावले जावे.

काल एका धाग्याद्वारे मीदेखील लोकाग्रहाचाच मान राखून कायमचा बाजूला झालो होतो..परंतु नीलकांतनेच विनंती केली (मला पाठवलेल्या खाजगी पत्रात मात्र नीलकांतचीही तशीच इच्छा आणि मंजुरी आहे, हे मात्र इथे अवश्य नमूद करतो..) व त्यानेच माझे पूर्वीचे मुखपृष्ठ पूर्ववत लावले..

आता हे संस्थळ माझे राहिलेले नाही आणि माझ्याकडे त्याचे कोणतेही कंट्रोल्स नाहीत....

अर्थात, लोकाग्रह गृहीत धरता मुखपृष्ठासंदर्भातला जो काही अंतीम निर्णय असेल तो नीलकांतचा आणि तो आणू पाहणार्‍या/त्याने आणलेल्या लोकशाहीचाच असेल..

फक्त या संदर्भात माझ्या मर्यादा/अधिकार एकदा कायमस्वरुपी स्पष्ट व्हाव्यात इतकेच! बाकी, संकेतस्थळांवरील लोकशाही-लोकाग्रह हा प्रकार मला व्यक्तिश: पटत नसला तरी या प्रकाराचा मला आदर आहेच, आणि सार्‍या संबंधितांना हा प्रकार लखलाभ होवो, अश्याही मी शुभेच्छा देतो..

एक गोष्ट मात्र नक्की, की माझी कलाकृती मला न विचारता/न कळवता उडवण्यात आलेली मला कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही..

अन्यथा, संगीतादी कलाविषयांवर काही आस्वादात्मक अभिव्यक्तिकरता फक्त मिपाच उपलब्ध आहे असे नाही, माझा ब्लॉग आणि अन्य संस्थळेही उपलब्ध आहेतच..

कळावे,

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
संस्थापक, मिसळपाव डॉट कॉम.

नीलकांत's picture

12 Jun 2010 - 7:43 pm | नीलकांत

मिपाचे मुखपृष्ठ ही तात्यांच्या कल्पनेतील रचना आहे. वेळोवेळी अप्रतिम मुखपृष्ठे लिहून तात्यांनी त्याची ही कल्पना किती आकर्षक आहे हे सिध्द करून दाखवले आहे.

मिपाचे मुखपृष्ठ तात्यांनी लिहावे अशी माझी वैयक्तिक विनंती त्यांनी मान्य केलेली आहे.

काहि आवश्यक किंवा अपवादात्मक वेळेस मी तात्याच्या मुखपृष्ठाचा एखाद दिवस चोरतो आणि हवे ते लिहीतो. जसे काल फुटबॉलच्या विश्वचषकाच्या उद्घाटनाच्या दिवशी केले होते.

ते का बदलले आणि पुन्हा पुर्वीचे का आणले हा खरं तर काही विशेष मुद्दा आहे असं मला वाटत नाही.

या पुढे सुध्दा तात्यांनी मुखपृष्ठावर अश्याच प्रकारे वैविध्यपुर्ण लेखन करावे. ही तात्यांना जाहीर विनंती.

- नीलकांत

विसोबा खेचर's picture

12 Jun 2010 - 8:55 pm | विसोबा खेचर

स्पष्ट खुलाश्याबद्दल अनेक धन्यवाद..

तात्या.

प्रमोद देव's picture

12 Jun 2010 - 10:53 am | प्रमोद देव

माझं माझं, काबाड ओझं! ;)
स्वत:भोवती किती दिवे ओवाळून घ्यायचे ते. :D

विसोबा खेचर's picture

12 Jun 2010 - 11:14 am | विसोबा खेचर

स्वत:भोवती किती दिवे ओवाळून घ्यायचे ते.

हा प्रतिसाद मला उद्देशून आहे असे मी समजतो..

दिवे ओवाळून घेतलेले नाहीत.. फक्त खुलासा केला आहे!

तात्या.

मदनबाण's picture

12 Jun 2010 - 11:26 am | मदनबाण

एक गोष्ट मात्र नक्की, की माझी कलाकृती मला न विचारता/न कळवता उडवण्यात आलेली मला कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही..
चांगला विनोद आहे. आता हे संस्थळ तुमचे राहिले नाही आणि त्याचे कोणतेच कंट्रोल तुमच्याकडे नसल्यावर ही अपेक्षा म्हणजे विनोद आहे.
अन्यथा, संगीतादी कलाविषयांवर काही आस्वादात्मक अभिव्यक्तिकरता फक्त मिपाच उपलब्ध आहे असे नाही, माझा ब्लॉग आणि अन्य संस्थळेही उपलब्ध आहेतच..
हो का... नविन माहिती बद्धल धन्यवाद...

मदनबाण.....

A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard

विसोबा खेचर's picture

12 Jun 2010 - 11:32 am | विसोबा खेचर

चांगला विनोद आहे. आता हे संस्थळ तुमचे राहिले नाही आणि त्याचे कोणतेच कंट्रोल तुमच्याकडे नसल्यावर ही अपेक्षा म्हणजे विनोद आहे.

'तुम्हीच मुखपृष्ठ लिहीत जा..' असे खुद्द नीलकांतनेच आग्रहाने सांगितले होते आणि ते उडवले गेले म्हणून तशी अपेक्षा केली होती. ह्यात मला तरी विनोदी असे काही वाटत नाही..असो, तरीही आपल्या मताचा मी आदर करतो..

हो का... नविन माहिती बद्धल धन्यवाद...

माय प्लेझर!

तात्या.

मदनबाण's picture

12 Jun 2010 - 12:09 pm | मदनबाण

ते उडवले गेले म्हणून तशी अपेक्षा केली होती.
उडवले गेले ? काल फुटबॉल विश्वचषक २०१० चे उद्घाटन होते म्हणून फुटबॉलचे मुखपॄष्ठ लावण्यात आले होते.

मदनबाण.....

A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard

विसोबा खेचर's picture

12 Jun 2010 - 3:00 pm | विसोबा खेचर

उडवले गेले ? काल फुटबॉल विश्वचषक २०१० चे उद्घाटन होते म्हणून फुटबॉलचे मुखपॄष्ठ लावण्यात आले होते.

त्याबद्दलही काहीच म्हणणे नाही, फुटबॉलचे मुखपॄष्ठ लावण्यात नक्कीच काही वावगे नाही..

मुद्दा इतकाच की जी जिम्मेदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती/आली आहे, त्यात माझ्या अपरोक्ष अचानक काही बदल केला गेल्यास मला अवघ्या एका ओळीने तसे कळवले गेले पाहिजे ही किमान अपेक्षा! (माझी परवानगी मागायला पाहिजे असेही नाही. आणि परवानगी मागण्याचा/देण्याचा प्रश्नही येत नाही कारण सगळे अधिकार नीलकांतला व त्याच्या व्यवस्थापनाला दिले गेले आहेत..)

फुटबॉलचे मुखपॄष्ठ लावण्यात जसे काही वावगे नाही तसेच वरील किमान अपेक्षाही वावगी नाही असे वाटते..

असो,

माझ्यापुरता हा विषय संपला आहे. बाणसाहेब, आपल्याशी चर्चा करून आनंद वाटला.

तात्या.

टारझन's picture

12 Jun 2010 - 3:21 pm | टारझन

त्यात माझ्या अपरोक्ष अचानक काही बदल केला गेल्यास मला अवघ्या एका ओळीने तसे कळवले गेले पाहिजे ही किमान अपेक्षा!

येथे बिपीन कार्यकर्यांची आणि मोडकांची प्रतिक्रीया काय येईल ह्याचा विचार करतोय :) माझ्या धाग्यावर होती तीच असेल काय ? ;)

श्रावण मोडक's picture

14 Jun 2010 - 9:41 am | श्रावण मोडक

माझी प्रतिक्रिया तीच असेल. संपादकांनी 'फाजील' लोकशाही आणू नये हे माझे मत आहे. त्यानुसार जे बदल नीलकांतने केले त्याचे खुलासे करण्याची गरज नाही. मग तो खुलासा विसोबांना द्यावयाचा असो वा श्रावण मोडकांना. या खुल्या व्यासपीठावरील संपादनात काही जबाबदाऱ्या अशा असतात की ज्या लोकशाही मार्गाने सुटू शकत नाही. त्यासाठी पोलिसी खाक्याच ठेवावा लागतो. प्रसंगी दंडुका चालवून आणि त्यातूनही जमत नसेल तर कोपच्यात घेऊन काही गोष्टी कराव्या लागतात.
मुखपृष्ठावरील बदलाबाबत विसोबा खेचर यांची किमान एका ओळीने कळवले जावे ही अपेक्षा हा संकेतस्थळाचा नव्हे तर त्यांचा वैयक्तीक आणि पार्श्वभूमीवर व्यनि किंवा खरडीतून चालणारा मामला आहे. असाच मामला मी किंवा इतर कोणीही सदस्य आणि संपादक यांच्यात चालू शकेल. पण तो जाहीर आणला जाऊ नये. संपादकीय धोरण जाहीर न करताही पुरेसे समजू शकेल इतके हे संस्थळ आता जुने आहे.
संकेतस्थळाची मालकी, नियंत्रण, तिचे हस्तांतरण हा त्या संबंधित व्यक्तींतील वैयक्तिक मामला आहे. तो संकेतस्थळावर आणायचा की नाही हा त्यांचा प्रश्न. संस्थळाचे नियंत्रण हस्तांतरीत केले ही जपमाळ विसोबांनी त्वरित बंद करावी ही, एकाच संस्थळाचे दोन सदस्य यांच्यात असणाऱ्या नात्यातून केलेली, विनंती. कारण अशा जपमाळेमुळे काहीही साध्य होत नाही, उलट अकारण टोलेबाजीची संधी मिळते आणि त्यातून संस्थळावर अवांतरच अधिक चालते ही प्रतिमा तयार होते. एकाच संस्थळाचे सदस्य या नात्याने ही विनंती केली असल्याने तिच्यासह त्या अनुषंगाने व्यक्त केलेल्या मतांना ते फाट्यावर मारू शकतातच.

नितिन थत्ते's picture

12 Jun 2010 - 11:40 am | नितिन थत्ते

मिपा व्यवस्थापनाने अशी चिखलफेक थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे वाटते.

कोणीहि (म्हणजे देवकाका नव्हे इतर कोणीही उठावे आणि तात्यांना सुनवावे हे योग्य वाटत नाही.

प्रियालींच्या ठेव या धाग्यावर बर्‍याच जणांनी कथेतील आजारी व्यक्ती पूर्वी कशीही वागली असली तरी मुलांनी त्यांच्याशी असे वागू नये असे विचार व्यक्त केले होते त्याची आठवण झाली. :)

नितिन थत्ते

आनंदयात्री's picture

12 Jun 2010 - 11:48 am | आनंदयात्री

नितिन थत्त्यांशी सहमत आहे.

पक्या's picture

12 Jun 2010 - 11:05 pm | पक्या

+१
थत्त्यांशी सहमत आहे इथे.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

वेताळ's picture

12 Jun 2010 - 11:53 am | वेताळ

काही गोष्टी अती होता आहेत असे वाटते.

वेताळ

टारझन's picture

12 Jun 2010 - 12:05 pm | टारझन

चला , लिखाण उडवल्या गेल्याचा राग येणारा मी एकटाच नाही तर ;)

बाकी प्रमोदबाणांचा रोख अचानक यु टर्ण मारुन कसा काय वर्षावायला लागला ? =))

मदनबाण's picture

12 Jun 2010 - 12:10 pm | मदनबाण

बाकी प्रमोदबाणांचा रोख अचानक यु टर्ण मारुन कसा काय वर्षावायला लागला ?
सरळ मार्गी रस्ता संपला की यु टर्ण मारावा लागतो... ;)
बाकी तुझी जिज्ञासा पाहुन डोळे अंमळ पाणावले. ;)

मदनबाण.....

A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard

टारझन's picture

12 Jun 2010 - 4:14 pm | टारझन

सरळ मार्गी रस्ता संपला की यु टर्ण मारावा लागतो...

ह्यात चुक संपणार्‍या रस्तांवर जाणार्‍यांची आहे ..

बाकी तुझी जिज्ञासा पाहुन डोळे अंमळ पाणावले.

हृदयाला भिडले हे वाक्य ... मला जिज्ञासा आहे , ह्याची जाणिव करुन दिल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे ;)

- मटणबार
A truly tasty mutton does not need any spices or anything over it , all we need is , just cook it and have it .
Tarzan Cheffred

पंगा's picture

12 Jun 2010 - 7:27 pm | पंगा

A truly tasty mutton does not need any spices or anything over it , all we need is , just cook it and have it .
Tarzan Cheffred

क्या बात है! मनापासून दाद द्यावीशी वाटली.

- पंडित गागाभट्ट.

पांथस्थ's picture

12 Jun 2010 - 10:01 pm | पांथस्थ

A truly tasty mutton does not need any spices or anything over it , all we need is , just cook it and have it .
Tarzan Cheffred

टार्‍या उत्स्फुर्त विडंबणात तुझा हात कोणी पकडु शकत नाही. झक्कास!

- पांथस्थ
माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश...
मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

पंगा's picture

13 Jun 2010 - 10:37 am | पंगा

हे विडंबन आहे हे लक्षातच आले नाही. ओरिजिनल वाक्य समजून दाद दिली. विडंबन आहे हे नंतर लक्षात आले.

असो. ओरिजिनल वाक्य म्हणून खपवायला (निदान माझी तरी) हरकत नाही.

- पंडित गागाभट्ट.

कवटी's picture

12 Jun 2010 - 4:07 pm | कवटी

बाकी प्रमोदबाणांचा रोख अचानक यु टर्ण मारुन कसा काय वर्षावायला लागला ?
=)) =)) =)) =))
टारबा आपले समदे घोडे विन मधे....
मी पण हाच विचार करत होतो.

कवटी
_____________________________
माझ्या कारकीर्दीला सहा वर्षं पूर्ण झाली.... कोणत्याही न्यूज चॅनलवर त्याबद्दल दाखवलं नाही....असूया वाटली.....पण तुम्हाला दोन हजार सहा वर्षांनी कळेल की मीच बरोबर होतो

नावातकायआहे's picture

12 Jun 2010 - 3:31 pm | नावातकायआहे

नितिन थत्त्यांशी पुर्णपणे सहमत.