Skip to main content

अल्लाजान..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 12/06/2010 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला सारे अल्लाजान असं म्हणायचे. कोण होता तो? एका घरवालीचा हरकाम्या. कुणाचा? रौशनी नावाच्या एका घरवालीचा हरकाम्या.. रौशनीआपा आणि तिच्या साऱ्या वेश्या मुली यांचा हरकाम्या. अजून एक हरकाम्या होता मन्सूर. आणि हा अल्लाजान. रौशनीआपाचा वेश्याव्यवसाय चालायचा फोरासरोडला. तिथे हरकाम्या होता अल्लाजान.. आणि काय ओळख होती या अल्लाजानची? स्त्री? नाही. पुरुष? नाही! अल्लाजान तृतीयपंथी होता. उभट, किंचित दाढीचे खुंट वाढलेला काळसर बायकी चेहरा.. हावभावही बायकी.. अंगात सदैव कुठलातरी मळका पंजाबी ड्रेस घालायचा.. डोक्याचं साफ टकलं त्यामुळे एक कुठली तरी मळकट ओढणी नेहमी डोक्यावर ओढलेली असायची!

एका शाळेत दोन दोन गणवेश

लेखक शैलेश हिंदळेकर यांनी शनिवार, 12/06/2010 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
आता शाळा सुरु होतील. माझ्या मुलाने या वर्षी दहावीची परी़क्षा दिली. पण मागच्या वर्षीचाच अनुभव सांगतो. पालक सभेला मी विचारलं की शाळा नेहमीचा एक गणवेश आणि खेळ ( स्पोर्ट्स) करिता एक गणवेश वापरायची सक्ती करते. यामागचा उद्देश काय. तर उत्तर मिळालं की मुलं खेळाच्या तासाला उन्हात ग्राऊंडवर जातात, त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, म्हणून सफेद गणवेश ठेवला आहे. पण मूळ साध्या गणवेशात सफेद शर्ट आहे आणि हा गणवेशही उन्हात जाण्यासाठी चालू शकतो.

(नको तेच झाले)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 12/06/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रान्ति यांची ही कविता आकारबंधासाठी प्रेरणा ठरली. पण खरा दोष आहे इतर अनेक कवितांचा ज्यांनी व्यसनमुक्तीच्या मार्गावरून पदच्युत केलं... पुन्हा काव्य आले; असेही, तसेही नको तेच झाले; असेही, तसेही जरा सोडतो मी; विडंबन नशेला पुन्हा ग्लास आले; असेही, तसेही किती जाऊ द्यावे?
काव्यरस

शनी, अवलिया, निखील आणी मकी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 12/06/2010 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता काही वेळापुर्वीच एक गंमतीशीर योगायोग लक्षात आला. आज शनी, अवलिया, निखील देशपांडे आणी मस्त कलंदर ह्या सर्वांचा वाढदिवस आहेत. *देव पण काय काय दिवस दाखवणार आहे अजुन काय महिती ?* असो.. तर ह्या सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पाऊस

लेखक अनिरुध्द यांनी शनिवार, 12/06/2010 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
(ही कवीता आधीही प्रकाशित झालेली आहे. परंतु पाऊस चालू झाला आणि ही कवीता पुन्हा टाकायचा मोह झाला.
काव्यरस

मिपा मुखपृष्ट

लेखक गणपा यांनी शनिवार, 12/06/2010 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
आताच धनंजय रावांच्या या धाग्यात काही मिपा मित्रांनी मिपाच मुखपृष्ट (फिफा विश्वचषका संबंधित) बदलल्या बद्दल खंत आणि नाराजीचा सुर लावलेला दिसला. जरी फुटबॉल चा विश्वचषक चालु असला तरी सध्या ती एकच गोष्ट महत्वाची आहे असे मला वाटत नाही . तेव्हा जर अधे मध्ये एखादा खास दिवस असला (जसे आज आपल्या सर्वांच्या लाडल्या व्यक्तिमत्वाची पुण्यतिथी आहे) तर त्या दिवसाची आठवण म्हणुन जर मिपाच्या मुख पृष्ट बदलल तर त्यात काही वावग आहे अस मला तरी वाटत नाही. हि स्पर्धा अजुन १५-२० दिवस तरी चालणार आहे.

भाईंचा आज दहावा स्मृतीदिन.. त्या 'पुल'कीत करणार्‍या दीपस्तंभास लक्ष प्रणाम

लेखक अर्धवट यांनी शनिवार, 12/06/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज भाईंचा दहावा स्मृतीदिन.. मला कळायला लागले तेव्हापासुन मी त्यांचे लेखन वाचतोय.. प्रत्येकवेळेला अवर्णनीय आनंद तर मिळालाच पण त्याहुनही एक मौल्यवान ठेवा मिळाला, तो म्हणजे.. आयुष्याकडे बघण्याचा एक उमदा, जागृत, संवेदनशील तरीही सजग दृष्टिकोन.. दहा वर्ष झाली.. पण खरच भाई गेलेत का? ' माझ्यापुरते भाई आहेतच, ते अजुनही एखाद्या निर्णायक 'अर्जुन'क्षणी आतून साद घालतात.... जाब चिचारतात....

पावसाची कविता

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 12/06/2010 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
मोगर्‍याचं पान सांगेल भिजताना आलेली मजा टपटपणार्‍या थेंबांतून पसरणारा गारवा, मग अनामिक थरथर ताजी उब उगत असताना निथळणारा प्रत्येक थेंब अंतस्थ हालचालींना साद देतोय शिरशिरणारा गारवा हलकेच घालतोय फुंकर ओलेत्या उबेवर फुलेच वेडावून गेलीयेत.. आता....सुगंध कोण थांबवणार ?