Skip to main content

पालेभाजी - अंबाडी

लेखक जागु यांनी शनिवार, 17/07/2010 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य: १ जुडी अंबाडीची पाने धुवुन चिरुन पाव वाटी तांदळाची कणी पाव वाटी तुरडाळ १ गड्डा लसुण ठेचुन ३-४ लाल मिरच्या राई, जिर, हिंग, हळद मिरचीपुड १ चमचा चविपुरते मिठ थोडा गुळ तेल पाककृती: कुकरमध्ये तेलावर लसणाची फोडणी देउन त्यात लाल मिरची, राई, जिर, हिंग, हळद घालुन त्यावर कणी, तुरडाळ व चिरलेली भाजी घालावी मग गरजेपेक्षा थोडे जास्त पाणी घालावे. त्यात मिरची पुड, मिठ, गुळ घालावा. आणि कुकरला २ ते ३ शिट्ट्या द्यायच्या. झाली तयार अंबाडीची आमटी आंबोळी यांच्या मागणीवरुन.

गीत : सूर आज माझे का अबोल झाले

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/07/2010 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
सूर आज माझे का अबोल झाले
आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले सूर आज माझे का अबोल झाले ||धृ|| माझ्या हृदयीच्या छेडूनी सप्त तारा आरोह अवरोहा संगे चाले मन भरारा असलेच कितीक राग नित्य नवे ऐकले ||१|| झंकारूनी स्वरांना घेवूनी रोज ताना ओठी माझ्या येई फुलोनी नवा तराणा कसले आता गाणे कसले नवे तराणे ||२|| मैफलीत माझ्या कधी मालकंस आला वसंतापरी मला तो मल्हार भेटूनी गेला मी रागदारी गाता शेवटी भैरवीच झाले ||३|| आसवांच्या पुरात डोळे पुरे न्हाले सूर आज माझे क
काव्यरस

वारी

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 17/07/2010 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
आले माहेरी माहेरी माझ्या विठाईच्या दारी फारा दिसांनी ग झाली माझी पंढरीची वारी वाट बदलली तरी काही ओळखीच्या खुणा नव्या रानराईतही निशिगंध फुले जुना खुल्या आकाशी चांदणं रात चंद्राने भिजली नभमाईच्या केसात चंद्रशब्दांच्याही ओळी काही भेटल्या ग सया सया आठ-आठवाच्या वारी सरली गुजात जुन्या हास-आसवाच्या नवे सौंगडी भेटले, जिवाभावाचे मैतर नव्या आठवांची घेते घेते भरून घागर आता पाय स्पर्शू किती घेऊ आशीर्वाद किती किती मातीचे ओघळ ओघळवू मी या हाती माझी पंढरीची वाट वाट सूर्याची पूर्वीची आता पश्चिमेची ओढ ओढ लागली प्रियाची गेलं माहेर माहेर झाला वळसा वळसा चंद्रभागेच्या पाण्यात माझा बुडला कळसा
काव्यरस

पालेभाजी - करडई

लेखक जागु यांनी शनिवार, 17/07/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारे साहित्य : करडईची पाने निवडून, धुवुन चिरुन ३-४ लसुण पाकळ्या १ मोठा कांदा चिरुन कोणती डाळ भिजवुन (चणाडाळ, मुगडाळ, तुरडाळ) मिरची १ किंवा २ थोड ओल खोबर करवडून हिंग, हळद चवीपुरत मिठ किंचीत साखर तेल पाककृती: तेलात लसणाच्या पाकळ्यांची फोडणी देउन त्यावर मिरची व कांदा घालावा, हिंग, हळद घालुन डाळ व करडई घालावी. ड नंतर परतुन थोडावेळ भाजी शिजु द्यावी. मग मिठ, साखर, खोबर घालुन परतुन गॅस बंद करावा. जाणकारांनी अधिक माहीती द्यावी मी भाजीवालीकडून भाजी घेतली. आणि तिलाच रेसिपी विचारली.

कर्नाळा....एक आठवण....

लेखक किल्लेदार यांनी शनिवार, 17/07/2010 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही भटकंती जरा जुनी आहे पण जास्त आठवणीत राहीलेली.... सकाळीच पाण्याची बाटली आणि केकचा पुडा घेऊन वाशी-अलिबाग एस-टी धरली आणि कर्नाळ्याचा पायथा गाठला.गणेशचतुर्थीचा दिवस आणि त्यातही मिड-वीक असल्यामुळे कोणीही नव्हते. कधीही पाऊस पडेल असे अन्धारून आले होते. कर्नाळ्याचा पायथा आणि एकंदर परीसरच गच्च झाडीने झाकलेला आहे. हे जंगल नवख्या माणसाला दचकवेल असे भयाकारी नक्कीच आहे. पण तसे घाबरण्याचे काही कारण नाही. इथे वन्य प्राणि मला तरी कधी दिसले नाहीत. कर्नाळा पक्शी अभयारण्य आहे. या वेळी माझ्याकडे माझा जुना Canon A400 होता. १-२ भट्क्यांपलीकडे दिवसभरात कोणीही दिसले नाही.

पेप्पर चिकन

लेखक गणपा यांनी शनिवार, 17/07/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला. ८-१० लसुण पाकळ्या ठेचलेल्या/बारीक चिरलेल्या. ४-५ मिरच्या उभ्या चिरलेल्या. १/२ लिंबु. २-३ चमचे काळीमीरी पुड.

विकांताची करमणूक .

लेखक रामदास यांनी शनिवार, 17/07/2010 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार दिवसांपूर्वी लिहीलेली ही विनोदी कविता आहे. वाचा. हसा.विसरा.
काव्यरस

निगरगट्ट आठवांचा चिखल..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 17/07/2010 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस आला की मन आठवांनी ओलंचिंब होतं. तसं पाहिलं तर हरेकाच्या मनामध्ये आठवांचा पाऊस हमेशा बरसत असतोच... अवकाळी बरसणाऱ्या काही आठवणी असतात तर काही भुरभुरत्या सरींसारख्या अंगावर सुखद शिडकावा करणाऱ्या. झिम्मड पावसागत काही फेर धरणाऱ्या तर काही झडीच्या धारांप्रमाणे नकोनकोशा. काही स्मृती श्रावण सरींसारख्या ऊन पाऊस खेळणाऱ्या तर काही उगाचच मनाच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या. काही आठवांची इंद्रधनुष्ये असतात तर काही स्मृती काळ्याशार ढगांमधून दाटून येत असतात. जितके पावसाचे प्रकार तितकी स्मृतिंची ही वलये... शांत जलाशयाच्या पृष्ठभागी थेंबाथेंबाने उमटणाऱ्‍या अगणित तरंगांसारखी... झाडाला वेढणाऱ्या वेलींसारखी...

कळतं पण वळत नाही

लेखक शुचि यांनी शनिवार, 17/07/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी नवर्‍याचा वाढदिवस झाला. नणंद तिच्या मुलीस घेऊन आली होती. तिची मुलगी आणि माझी मुलगी जवळजवळ सारख्या वयाच्या. पूर्ण दिवस गप्पा, खेळ, मनोरंजन, खाणंपीणं यात गेला.

आज अचानक तुझी आठवण का यावी

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी शुक्रवार, 16/07/2010 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक तुझी आठवण का यावी आज पापणी ओली माझी का व्हावी फार काळ या गोष्टीला झाला नाही युगे लोटली असतील पण का वाटावी जुन्या वहीची तीच दुमडलेली पाने अकस्मात वार्‍याने येउन उघडावी बरेच काही घडले ह्या मधल्या काळी तुला कहाणी कुठून आता सांगावी शब्द उतरण्या पानावरती घाबरले भीती इतकी अर्थांची का वाटावी? तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा फक्त तुला ही धडपड माझी समजावी हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी पुन्हा तोच पाऊस पडावा पूर्वीचा पुन्हा तीच मी नाव कागदी सोडावी पहाट होणे अशक्य आहे थांबवणे तरी वाटते रात्र जरा ही लांबावी मनात आहे काय काय दडले माझ्या आज उडी डोहात मनाच