Skip to main content

विकांताची करमणूक .

विकांताची करमणूक .

लेखक रामदास
Published on शनीवार, 17/07/2010
फार फार दिवसांपूर्वी लिहीलेली ही विनोदी कविता आहे. वाचा. हसा.विसरा. या क्याटेगरीतली. जुने जालसंदर्भ शक्य तितके पुसून टाकले आहेत . अजूनही काही सापडले तर ते हसण्यावारी न्यावेत ही विनंती. अर्ज-ए-पेश है रफीक जुमाणीची प्रेमकविता. ********************************************************************************************* मी हलवीत बसतो गल्ल्यामधली पाव-अधेली नाणी कशी कळावी तुला प्रेमळे दिलकी आणिबाणी. "हल्का कथ्था छोडबे कुत्ते" सांगू नको गर्जूणी मी पिंक दिलाचा ग्यासूद्दीन तू खिडकीत्ली पदमीणी. मी फुटका फानूस कविमनाचा तू माझी रोशणी इकरार करू मी कसा प्यारचा थुंकून येतो गुळणी. बचूभाईची कसम घालतो प्रेमी रफीक जुमाणी मी पतलीगलीचा बादशहा तू डॅन्स बारची राणी.
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 5520
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

फारच चावट ब्वॊ! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

उच्च!!! =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

छ्या... तुम्ही सगळे संदर्भ पुसण्याचा प्रयत्न केलात खरा; पण ते संदर्भच असे चिवट की या रचनेला ते आपल्या चौकटीतच घेऊन बसले आहेत. जाता जाईनात. मग फक्त =)) =)) =))

बाकी, खी खी खी आहेच. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मी वाचत बसतो जालामधली 'जेसी-पीसी' कहाणी कशी कळावी तुला लेखका दिलकी आणिबाणी. 'शिंपिण घरटे' कधी वेगळी 'गडबोल्याची कहाणी' कधी 'दुपारी कवितावाचन' अन 'शॄंगारिक गाणी' मी एक बावळा अधिरमनाचा 'गाण्याची शिकवणी' इकरार करू मी कसा, वाचली 'इब्लिसचाचा कहाणी'. 'कोरांटीच्या सुमनांची' मी कसम घालतो झणी मी पतलीगलीचा विडंबक तू जातिवंत लेखणी! चतुरंग

In reply to by भडकमकर मास्तर

अहाहा...मी पतलीगलीचा विडंबक तू जातिवंत लेखणी! लै लै बेस्ट

मूळ धाग्यातील आणि रंगाशेठचे विडंबन दोन्ही झ्याक....... - पिंगू