Skip to main content

प्रिय विनील,

लेखक श्रावण मोडक यांनी बुधवार, 23/02/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
ओरिसातील मलकनगिरीचे जिल्हाधिकारी आर. विनील कृष्णा यांचे, त्यांच्यासमवेत असणारे अभियंता पवित्र माझी यांच्यासह, माओवाद्यांनी अपहरण केले. विनील यांचे मलकनगिरीतील काम असे आहे, की त्यांच्या सुटकेसाठी माओवाद्यांचा प्रभाव असूनही आदिवासीच रस्त्यावर आले आहेत. फक्त आदिवासीच नव्हे, तर सर्वदूर समाजही. नेमकं काय घडतं आहे तिथं? सुरक्षा न घेता विनील जंगलात गेले, हा आता मुद्दा होऊ पाहतोय. खरंच त्यांचं चुकलं? ओरिसातच आयएएस अधिकारी असणारे सचिन जाधव यांनी विनिलला उद्देशून लिहिलेलं हे खुलं पत्र.

मैत्रिणींच्या tips हव्या आहेत.

लेखक Pearl यांनी बुधवार, 23/02/2011 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
माझी १ मैत्रिण गेली ३/४ वर्षे SFO ला रहात आहे. तिला थोडे दिवसांपूर्वि मुलगा झाला.(C-section) It is her first baby. तिची आई भारतातून गेली आहे महिन्याभरापूर्वि तिला मदत म्हणून. New Born Mother साठी हा सगळा अनुभव खूप वेगळा असतो आणि आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणणारा असतो. त्या प्रसंगी अनुभवी लोकांच्या सल्ल्याची खूप गरज असते. अनुभवाचा खूप फायदा होतो. भारतातले अनुभव आणि US मधले अनुभव खूप वेगळे असणार. (कारण तिथे स्वयंपाक, घरकाम, बाळाची आंघोळ यासाठी कामाची बाई मिळणे अवघड आणि महाग आहे.

तुला कसली रे एवढी घाई ?

लेखक विश्वेश यांनी बुधवार, 23/02/2011 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी नेहमीप्रमाणे घाई घाई ने आवरले आणि निघालो तेव्हा बायकोने विचारले ... तुला कसली रे एवढी घाई ? निघण्याची घाई, मला जगण्याची घाई ... आयुष्याची पाने मला उलटायची घाई हसायची घाई, मला रडायची घाई ... चार पावले चालताच मला पडायची घाई खायची घाई, मला पिण्याची घाई ... कोणी काही देवो, मला घेण्याची घाई जिंकायची घाई, मला हरायची घाई ... कुठे जातो माहित नाही, पण धावायची घाई भेटीची घाई, मला गाठीची घाई ... ऐन तारुण्यातच मला साठीची घाई सवयीची घाई, मला सवयीची घाई ... मरणाची घाई ... मला सरणाची घाई ... मला सरणाची घाई ...

व्य॑गचित्र - बहुजन समाजाची आजची स्थिती

लेखक प्रदिप आवाड यांनी बुधवार, 23/02/2011 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा..... स॑गणक लाइट गेल्याने ब॑द पड्ला होता अन नेमक॑ व्य॑गचित्र डकवायचे रहीले होते.... हे घ्या परत..... प्रदिप आवाड

माझे आजुसचा नंगोट

लेखक आगरी बाणा यांनी बुधवार, 23/02/2011 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: ही आगरी भाषेतील हास्य कविता आहे. या कविते मधून हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही काहीना या कवितेत चावटपणा दिसून येऊ शकतो............!!!! माझे आजुसचा नंगोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट चार बाय चारचा हाय टेरिकोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || १ || दिसाला चोंकोन न्यासाला तीरकोन पूरशी सरलकोट न मंगारशी बगला त भुईकोट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || २ || आजुसचे नंगोटयाव चिमन्या पोपट पुन जर का गाठ सुटली त बाला धंदाच चोपट ऐंसा माजे आजुसचा नंगोट || ३ || -आगरी बाणा. आगरी बोली-आगरी बाणा.
काव्यरस

एक अनुभव

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 23/02/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
सातारच्या रोटरी क्लबच्या साप्ताहीक मिटींग्ज दर शुक्रवारी संध्याकाळी कन्या शाळेत होतात. शाळेच्या अंगणात धोन्डो केशव कर्वेंचा प्लास्टरचा पूर्णाकृती पुतळा . एकदा मिटींगला थोडा लवकरच गेलो होतो. मी एकटाच होतो बाकीचे मेंबर यायचे होते. का कोण जाणे कर्व्यांचा पुतळा जवळून पहावा असे मला वाटले. पुतळा करणाराने तो फार सुंदर रीतीन एकेला आहे. चेहेर्‍यावरच्या रेषा न रेषा व्यवस्थित रेखाटल्या आहेत. कर्वेंचे धारदार नाक. किंचीत करारी डोळे , गोल चष्म्याची फ्रेम .

बालगीते

लेखक वपाडाव यांनी बुधवार, 23/02/2011 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी लहान म्हणजे अगदीच शिशुमंदीरात शिकत असताना जुन्याश्या कॅसेट प्लेयरवर (टेप रेकॉर्डर) बाल गीते ऐकत असे. उत्तरा केळकर यांच्या स्वरधारा ह्या अल्बममधील गाणी होती ती. शाळेतुन घरी आलो की उचकपाचक करायला सुरुवात व्हायची. आईला ही घरघर पसंत नसे. ती मग टेप रेकॉर्डर चालु करुन देई. मग पुढचा अर्धा-एक तास हा बाल गीते ऐकण्याचा कार्यक्रम चालायचा. मी ही गाणी तब्बल तीन-चार वर्षे तरी ऐकली असावीत . त्यानंतर माझ्या लहान बहिणीने सुद्धा ऐकली. पण काळाच्या ओघात जसं CDचं चलन वाढलं, हे कुठेतरी मागे पडलं. माझ्या संग्रही ती कॅसेट आता नाहीये.

पुणेरी टोला..दगड्फेक..माझा अनुभव्..

लेखक दीपकशेठ यांनी बुधवार, 23/02/2011 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे म्हट्ले कि पुणेरी टोला आलाच.. असाच एक कालचा अनूभव... मी कर्वे पुतळ्याजवळ सदर्‍याला नवीन गून्डया लावण्यासाठी गेलो होतो.. तो शिम्पी म्हनला कि उद्या येउन घेउन जा.. यावर मी त्या शिम्पी ला विचारले "काहो उद्या दुकान चालू आहे का?? रविवार आहे ना म्हनून.." तर तो म्हणतो "का रे बाळा उद्या काय दगड्फेक आहे का? दगड्फेक असेल तर मग बन्द राहाणार दुकान.. कस आहे ना.. दगड्फेक असली ना तर्र मला ही जाव लागत दगड्फेक करायाला.. काय ना आमच्यात ना स्पर्धा लागते.. कोण काय फोड्णार.. डोक्, डोळा.. म्हणून जर दगड्फेक नसेल ना तर चालू आहे दूकान.." आस्सा ह्या पुणेरी टोला मी अनुभवलेला...

पुन्हा एकदा वर्जेश सोळंकी

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 23/02/2011 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
फार मागे वर्जेश सोळंकी या कवितेची थोडी ओळख करून द्यावी म्हणून एक धागा काढला होता : दुवा धाग्यात बर्‍याच टपला मिळाल्या. निर्व्याज विडंबनांपासून सव्याज उपहासापर्यंत सर्व दक्षिणा प्राप्त झाल्या. भरून पावलो :-) परवा याच कवीचा नवा संग्रह वाचायला मिळाला. त्याही कविता अतिशय आवडल्या. नव्या कवितांची इथल्या वाचकाना ओळख व्हावी (आणि विरोधकाना उपहासाचे नवे रान मिळावे ;-) ) या सद्हेतूने या दोन कविता देत आहे. आपल्या भल्याबुर्‍या प्रतिक्रिया जमल्यास द्याव्या.