Skip to main content

येडा आप्पा सरकार चा अजब आदेश

लेखक अँग्री बर्ड यांनी मंगळवार, 01/03/2011 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
११ मार्च ते १४ मार्च पर्यंत लग्नकार्ये बेळगावमध्ये करू नयेत हो.हिंदी फिल्म मध्ये जसा मुलीचा बाप यायचा मध्ये तसे कर्नाटक सरकार येईल अडवायला ! .

मज काय भाळी उमगेना ...

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 01/03/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ... नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ... जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ... फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ... फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ...
काव्यरस

मज काय भाळी उमगेना ...

लेखक विश्वेश यांनी मंगळवार, 01/03/2011 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
रात काळी, झोप जाळी, काय भाळी उमगेना ... नभ दाटले, भर सकाळी, काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... विरली वाणी, सरली गाणी, सुकली रातराणी उमगेना ... जाळत जाती, खोलवर मज, तुझ्या आठवणी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... जुनीच वाट, जुन्याच खुणा, का छळती पुन्हा उमगेना ... फिरवी पाठ, ओळखीची लाट, वागणूक निराळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... साठवले बळ, फाडले उर, पण का? न फुटले सूर उमगेना ... फिरोनी आलो, त्याच समेवर, का? न पडली टाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ... मज काय भाळी उमगेना ...
काव्यरस

माहिती हवी आहे - भाड्याच्या घराबाबत

लेखक स्पा यांनी मंगळवार, 01/03/2011 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही आमच्या सध्याच्या घरात भाड्याने गेली २४ वर्षे राहत आहोत आता बिल्डर्स , मालकाला ती जागा डेवलप करण्याची ऑफर देत आहे तर मालक तडक घर खाली करण्याची नोटीस देऊ शकतो का? कि आम्हाला जागा रिकामी करण्यासाठी तो काही पैसे देईल ? का नवीन बिल्डींग तयार झाल्यावर त्या जागेवर आमचा (थोडा का होईना ) क्लेम राहील ? आम्ही लेवेन मोन्थ लिव लायसन्स या पद्धतीवर राहत नाहीयोत कृपया फारच निकडीचे असल्याने खरडफळ्याचा वापर न करता धागा सुरु केल्याबद्दल क्षमस्व. मला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होताच हा धागा अप्रकाशीत करण्यास हरकत नक्कीच नसेल.

लोकल ,दगड,आणि एक जीव

लेखक अँग्री बर्ड यांनी मंगळवार, 01/03/2011 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याचदा बातमी ऐकतो नाही का की सायंकाळी रेल्वे ने घरी परत येणाऱ्या प्रवाश्यांवर दगड बसून गंभीर जखमी झाले,दवाखान्यात वेळीच न पोचल्यामुळे मृत्यू वा दवाखान्याचा हलगर्जीपणा,डॉक्टर ची दिरंगाई , कर्मचाऱ्यांची टंचाई इत्यादी मुद्दे त्याला जळूसारखे चिकटून येतात आपण ते निर्विकार चेहऱ्याने वाचतो ,चहा संपला की पेपर भिरकावून "कामाला जायला पाहिजे बाबा,टाईम काढून चालणार नाय " असं म्हणत इयरफोन्स कानात कोंबून निघून जातो..एवढा कोडगेपणा का अंगी रुतला ?हे रोजच झालं म्हणून? बहुदा प्रत्येक मुंबईकर ही बातमी न बघता लिहून काढू शकतो ,फक्त जखमी व्यक्तीच नावं बदलेल ,आम्ही म्हणू "आयला हे सरकार आणि रेल्वे पोलीस चुतीया आह

मराठी भाषा जग/वाढवण्याचा सोप्पा उपाय....

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 01/03/2011 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी....! मराठी दिन 'साजरा' झाला. काही प्रश्न डोक्यात आणि उत्तरे सापडेनात. मराठी ही अभिव्यक्तीची भाषा म्हणून आपण वापरतो. विचारांची देवाण घेवाण करण्याचे माध्यम. मराठी हीच मुख्य भाषा असण्याचे मराठी माणसापोटी जन्मलो हे एक मुख्य कारण. त्याहून मुख्य म्हणजे मराठी वातावरणात वाढलो. (सांगली, दादर, पुणे येथील बरेच अमराठी शुद्ध मराठी बोलताना पाहिलेत) अपवादात्मक अगदीच काही लोक आवड, प्रेम यापोटी मराठी अंगिकारतात. यामध्ये आपले कर्तृत्व काय? आपण 'लाभले आम्हास 'भाग्य' म्हणत खुश.
विशेष

गाभार्‍यातील शिव शंभो ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 01/03/2011 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्या छोट्याश्या अरुंद गल्लीत जुन्या पुराण्या वाड्यात मध्यभागी खोलवर उतरत गेलेल्या त्या पायर्या आत शंकराचा गाभारा मिट्ट काळोख . मिणमिणता दिवा टिपुकल्या प्रकाशाची काळोखाला साथ मामा शिवशंभो करीत वाजवायचा ती छोटीशी घण्टा किणकिण नाद उडवून जायची काळोखाची पाखरे अंधाराला भोके पाडीत घुमायचा नाद गोल चौफेर भीती वाटायची मला मी गप्प घाबरून .. मामाचा नाद घुमायचा शी ssss व शsss भो ...!! माझे कान गच्च .....!!! खूप वर्षांनी गावी गेलो गल्लीत गेलो उध्वस्त झालेला वाडा नि चकाचक नवी ईमारत उत्तम बांधणीची भळभळून प्रकाशाची शंकराचा गाभारा सुंदर मार्बलचा प्रकाशाने ओघळलेला सुशिक्षित वा
काव्यरस

व्हेज फ्राईड राईस आणी पनीर चिली

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 01/03/2011 05:31 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य व्हेज फ्राईड राईस: २ कप बासमती तांदूळ स्वछ धुवून गरम पाण्यात भिजवणे १ कप पातळ उभा चिरलेला कोबी १ कप पातळ उभा चिरलेला गाजर १ कप पातळ उभी चिरलेली भोपळी /ढोबळी / ढब्बू / शिमला मिर्ची :) १ कप बारीक चिरलेली फरसबी १/२ कप कांद्याची पात चिरुन १ छोटा कांदा व पातीचा कांदा चिरुन १ १/२ टेबल्स्पून आलं-लसूण पेस्ट किंवा भरड वाटलेले १ हिरवी मिर्ची उभी चिरलेली २ टेबल्स्पून सोया सॉस २ टेबल्स्पून टोमॅटो सॉस १ टेब