Skip to main content

'ट्रेसी चॅपमन'

लेखक प्रास यांनी गुरुवार, 03/03/2011 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
खूप वर्षांपूर्वी टीव्ही वर पाहिलेला एक 'ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड'चा प्रोग्राम अचानक आठवला.

हरवली पोर माझी कविता नावाची !

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 03/03/2011 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ही कविता काव्य विभागात दिलेली होती(http://www.misalpav.com/node/1708). पण कविता टाकल्यानंतर आणि पैसा जीं शी बोलण्या नंतर असे वाटले की या कवितेला अजुनही बोली भाषेत उत्तरे देता येतील, असेच काव्य पुढे लिहिता येइल .. ज्यांना ज्यांना त्यांच्या बोली भाषेत उत्तरे देता येतील त्यांनी तसे प्रयत्न केल्यास छान वाटेल .. थिम : कवी आनि कविता यांच्यामधील संवाद .. सोबतीला खरे खुरे बाप्-मुलगी यांचे मन ही त्यामध्ये दिसले पाहिजे ... ---
कविता १ : काय सांगु कहानी या वेड्या बापाची हरवली पोर माझी कविता नावाची !
विशेष

मृत्युशय्येवर ....

लेखक विश्वेश यांनी गुरुवार, 03/03/2011 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
अजून किती राती काढू सखे अश्या झुरत .... झुरत ? घे तुझे हे साठवलेले सगळे क्षण साभार .... परत आता नाही उरले त्राण ... आठवणीत रमायला आता नाही उरले प्राण ... ओवाळून टाकायला उरले फ़क़्त वास्तव भेसूर, अन उरला रितेपणा सरल्या सगळ्या इच्छा, अन सरला जीतेपणा नका तीर्थ ओतू .. नका ठेऊ तुळस, वेळ आली जाण्याची अशीच निरंतर राहूदे चव, तिच्या हातच्या पाण्याची
काव्यरस

फेसबुकचा चेहरा

लेखक स्वैर परी यांनी गुरुवार, 03/03/2011 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर भटकणे हा माझा आवडता उद्योग. त्यातही संगणक सुरु केला कि पहिले काम म्हणजे मिपा आणि ई-सकाळ उघडणे. आज ई-सकाळ मध्ये आलेला हा लेख आवडला. म्हणुन त्याचा दुवा इथे डकवीत आहे. विषय कदचित आधी देखील काढुन झाला असेल, परंतु सहज एकदा वाचावा असा हा लेख वाटला. :)

देवा ...

लेखक विश्वेश यांनी गुरुवार, 03/03/2011 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
आस्तिकतेची भीती बाळगून ओढून ताणून नास्तिक मी खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ... समाजातले स्थान टिकविण्या चढतो तुझी पायरी चुकवीत डोळा मग तुझ्यावरच करतो मनसोक्त शायरी ... तुझ्या पुढ्यात मनातली हुरहूर अन चिंता वाढत जात नकळतच मग, शरीर जोडते हात अन मन सोडते हात ... पितोही मग ओंजळीतून मी तुझ्या चरणीचे तीर्थ दाटून येतो घशाशी तेव्हा अवघा जगण्याचा अर्थ ... भक्तांच्या गर्दीमधल्या नास्तिकतेच्या ढोंगाचे प्रतिक मी खरे तर तुला भेटण्या अत्यंत आतुर अन अगतिक मी ...