Skip to main content

हिरवा चाफा

लेखक जागु यांनी गुरुवार, 23/06/2011 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
हिरवी पालवी, हिरवी राई, हिरवागार परिसर, हिरवी पाने, गवत हेच ऐकायची आपल्याला सवय असते. पण हिरवे फुल म्हणजे जरा हटकेच. अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. हिरवा चाफा ह्या नावकडे लक्ष केंद्रित केल की वेगळच फिल होत. लहानपणी मोठे झाड होते आमच्या घरी. फुल कधी दिसायचे नाही पण वास आला की समजायचे चाफा फुलला मग शोधायला जायचे. कुठल्यातरी पानाआई हे दिसायचे. मग काढून घरी आणुन त्याचा वास घेत बसायच. तसा त्याचा वास घेण्याची गरज लागत नाही. ज्या जागी ठेउ त्या परीसरावर हे फुल आपला सुगंध दरवळून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देतो. हिरव्या रंगामुळे झाडावर हे हिरव फुल लपाछुपीच खेळत असत.

निरागस चेहेर्‍याआडचे धर्मांतर

लेखक आंसमा शख्स यांनी गुरुवार, 23/06/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही संस्था फार मोठ्या असतात. त्यांची पोहोच ही मोठी असते. कायदेशीर आणि बेकायदेशीर अशी अनेक हत्यारे त्यांच्याकडे असतात. अशा संस्थांविषयी लिखाण करतांना कसे करावे हा मोठा पेच आहे. कारण मी एक सामान्य माणूस आहे. मला अचानकपणे रहस्यमय रित्या गायब व्हायचे नाही. किंवा माझा अचानक अपघाती मृत्युही घडायला नको आहे. अशा परिस्थितीत मी एखाद्या बलाढ्य संस्थेच्या धर्मांतराच्या कामाच्या स्वरूपाचे अवलोकन कसे करणार? वल्ड विजन या संस्थेच्या स्वरूपाबद्दल माहिती देणारे काही लेखन मी केले होते. ते माझा हेतु फक्त पॉलिटिकली करेक्ट स्वरूपात लेखन करण्याचा होता.

तो पूर पावसाचा -

लेखक विदेश यांनी बुधवार, 22/06/2011 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
तो पूर पावसाचा डोळ्यांत साठलेला प्रेमात भंगता मी डोळ्यांत दाटलेला |१| आकाश भार झेले लाखो पतंग उडता माझा पतंग दिसतो तो खूप फाटलेला |२| लाभात खूप आता व्यवहार येथ झाले व्यवहार नेमका का माझाच घाटलेला |३| माझ्या मनांत घुसले तव वार पापण्यांचे जखमी कसा ग सांगू आनंद वाटलेला |४| रस्ते अनेक दिसती ओसाड चालता मी वाटयास मात्र माझ्या गर्दी झपाटलेला |५|

क्रांतितीर्थ

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 22/06/2011 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वदेशहिताकरिता स्वप्राणाची पर्वा न करिता कोट्यावधी पुण्यवान लोक समरांगणी धारातीर्थांचे ठिकाणी पतन पावतात तेव्हा स्वदेशहित होते, फुकट होत नाही. एवढी अक्कल या आधुनिक विद्वांनाना नसावी ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. -- दामोदर हरी चापेकर २२ जून १८९७, बरोबर ११४ वर्षांपुर्वी याच दिवशी प्लेगच्या साथीमध्ये जनतेवर अनन्वित अत्याचार करणारा इंग्रज अधिकारी रँड याचा क्रांतीवीर चापेकर बंधूंनी - दामोदर हरी चापेकर व बाळकृष्ण हरी चापेकर यांनी गणेशखिंडीनजीक वध केला. या दोघांना द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे अटक झाली.

कांसा बेटावरचा पद्मदुर्ग..

लेखक हेम यांनी बुधवार, 22/06/2011 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
२- ३ वर्षांपूर्वी कुठल्यातरी ट्रेकवेळी विनयने खटकी पडल्यागत एक भन्नाट ऑफर दिली. मोजक्या मंडळींना घेऊन सहसा न होणारे सागरी किल्ले करायचे आहेत. खांदेरी-उंदेरी, पद्मदुर्ग उर्फ कांसा आणि सुवर्णदुर्ग. या सर्व किल्ल्यांवर जाण्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट जमवावी लागणार होती ती म्हणजे स्थानिक नावाड्यांशी संपर्क नि परवानगी. हे काम विनयने इतर सोबत्यांच्या मदतीने उत्तमपैकी हाताळलं. इतर किल्ल्यांप्रमाणे हे किल्ले सहजपणे होणारे नव्हेत त्यामुळे कितीही महत्त्वाची कामे असली तरी ती बाजूला सारायला हवी होती.

राहुल व सोनिया यांची बदनामी ?

लेखक तर्री यांनी मंगळवार, 21/06/2011 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात चे. पु वर एक " विडिओ " पहाण्यात आला. त्यामध्ये राहुल गांधी / सोनिया गांधींची यथेच्च बदनामी करण्यात आली आहे. २ ऊदाहरणे १.सोनिया गांधीचे खोटे प्रतिज्ञा पत्र : आपण "केंब्रिज " विद्यापिठाच्या स्नातक असल्याचे प्रतिज्ञा पत्र खोटे आहे . वास्तविक त्या मात्र ५ वी पास आहेत. २. राहुल गांधी ना अमेरिके मध्ये अटक : बेकायदा / बेहिशेबी $१६०,००० जवळ बाळगल्या बद्द्ल राहुल गांधी ना अमेरिके मध्ये एफ्.बी.आय. ने ९ तास ताब्यात घेतले होते . ते त्यानंतर आज पर्यंत अमेरिके मध्ये गेलेले नाहित. हे खरे असेल की निव्वळ प्रचारकी / बदनामी ?

भास..

लेखक राघव यांनी मंगळवार, 21/06/2011 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
गंधासवे श्वास पुलकीत होती.. उरी मोगर्‍याचे उसासे.. नव्याने! "आषाढ येईल लवकर तसाही.." निवळत्या धरेला दिलासे नव्याने! नको तेच पुन्हा-पुन्हा का दिसावे? (कशाला जुने दु:ख सलते नव्याने?) जाणिव नाही कशी जाणिवेला.. अवचित पुन्हा भास होती नव्याने! पणतीस नाही तमा काळोखाची.. तमाचीच काया उजळते नव्याने! अरे..कल्पनांचे खुजे विश्व माझे.. शब्दांस स्वरसाज चढती नव्याने राघव