मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भास..

राघव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गंधासवे श्वास पुलकीत होती.. उरी मोगर्‍याचे उसासे.. नव्याने! "आषाढ येईल लवकर तसाही.." निवळत्या धरेला दिलासे नव्याने! नको तेच पुन्हा-पुन्हा का दिसावे? (कशाला जुने दु:ख सलते नव्याने?) जाणिव नाही कशी जाणिवेला.. अवचित पुन्हा भास होती नव्याने! पणतीस नाही तमा काळोखाची.. तमाचीच काया उजळते नव्याने! अरे..कल्पनांचे खुजे विश्व माझे.. शब्दांस स्वरसाज चढती नव्याने राघव

वाचने 4005 वाचनखूण प्रतिक्रिया 15

अत्रुप्त आत्मा 21/06/2011 - 21:47
मार डाला...शेवटची २ कडवी तर अतीशय सुंदर... होती रहे शायरी,पढते रहेंगे हम कभी कभी मिलता है, ऐसा दर्दो गम

अनामिक 21/06/2011 - 22:26
पणतीस नाही तमा काळोखाची.. तमाचीच काया उजळते नव्याने! व्वा! सुंदर गझल. राघव - बर्‍याच दिवसांनी टाकलीय कविता/ग़झल. अजून येऊ द्यात.

राजेश घासकडवी 21/06/2011 - 22:47
एकच अनुभव नव्याने येण्याचे अनेक पैलू छान हाताळले आहेत. 'तमा' वरचा श्लेष आवडला. अवांतर: कवितेची विडंबनं होणार राव... 'जुन्या दारवेचे नव्या बाटलीतुन पुन्हा पेग भरले जरासे नव्याने' वगैरे...

मिसळलेला काव्यप्रेमी 22/06/2011 - 14:12
सुंदर गझल!! कोणते वृत्त?
तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. पण ही गझल नाही.. धाटणी जरी थोडी तशी असली तरीही रूढार्थानं गझल म्हणणे योग्य नाही. :) बाकी वृत्त वगैरे मला खरोखरच कळत नाहीत. त्यामुळे त्याबद्दल जाणकारच सांगू शकतील. राघव

दत्ता काळे 23/06/2011 - 18:13
फार सुंदर पणतीस नाही तमा काळोखाची.. तमाचीच काया उजळते नव्याने! व्वा व्वा

चतुरंग 23/06/2011 - 18:40
भासे गजल परि आहे कविता ओळींमधून मोद देते नव्याने! -रंगा

पद्मश्री चित्रे 24/06/2011 - 15:58
खूप दिवसांनी इथे आले, तुमची कविता लगेच वाचली.. छान आहे.. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती गझल नाही आणि मला वाटतं कुठले वृत्त पण नाही . पण छान आहे रचना..