Skip to main content

अंतीम क्षण (गझल)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 22/06/2011 या दिवशी प्रकाशित केले.
हि माझी पहिलीवहिली गझल!! परिपूर्ण नाहीये पण गझल म्हणता येईल इतपत गणित जमले आहे. { वृत्त – आनंदकंद || गण - गागालगा लगागा गागालगा लगागा} अंतीम क्षण सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले वारे तसेच होते जाळून जे जळाले केसांतल्या फुलांची गंधीत माळ आहे पाठीवरून त्यांचे संपृक्त हे गळाले आहेत हे मनाचे सारेच 'कां' अतृप्त डोळ्यातल्या जळाला ओठात हे कळाले सारे कसे सुखाचे रेशीमगान गाती मी छेडता तराणे अश्रूच का ढळाले बोलून घे तरीही त्यांना असो निराशा मार्गात ते अडूनी सांगा कसे वळाले गोळा करीत आलो संगे सवंगडी मी अंतीम या क्षणाला सारे कुठे पळाले |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०६/२०११)
लेखनविषय:

वाचने 2243
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

वृत्त सांभाळुन लिहीणारा म्हण्जे महाडिक टिचर चा विद्याथ्री कि काय ?

आवडली.
सारे तुझेच होते झोळीत जे मिळाले वारे तसेच होते जाळून जे जळाले
याचा अर्थ नीट समजला नाही.
केसांतल्या फुलांची गंधीत माळ आहे पाठीवरून त्यांचे संपृक्त हे गळाले
इथे देखील दुसर्‍या ओळीचा अर्थ नीट समजला नाही. 'संपृक्त' हे तर विशेषण आहे ना?

अक्षरशः पारणे फेडणारे लीखाण.....

वृत्तात लिहीण्याचा प्रयत्न अत्यंत स्पृहणीय आहे. पहिल्या दोन द्विपदींमध्ये अर्थ कळत नाही आणि काही काही ठिकाणी वृत्तासाठी शब्दांची मोडतोड झाली आहे उदा. ढळले ऐवजी ढळाले. हे टाळले असते तर अप्रतिम गझल झाली असती. वृत्त आणि आशय दोन्ही व्यवस्थित सांभाळण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत हे पाहून छान वाटले. प्रकाशित करण्याची घाई न करता वारंवार संस्करण केल्यास उत्तम कविता निर्माण होतील अशी खात्री आहे.

काही कल्पना छान आहेत. वर निरंजन म्हणतात तसे आणिक संस्कार झाले पाहिजेत. आपणच आपल्या कल्पनांवर अन्याय केल्यासारखे कधी होवू नये. पु.ले.शु. :) राघव

सर्व मार्गदर्शक सूचनांची नोंद घेतली आहे. सर्वांचे खुप खुप धन्यवाद!!