Skip to main content

नृत्यांगना मिताली...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 12/07/2011 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक जिवाभावाची मैत्रिण सोनाली भट. म्हणजे पूर्वाश्रमीची सोनाली भट, आताची डॉ सोनाली मुखर्जी. मेडिकलला असताना सधन मुखर्जी नावाच्या एका सज्जन मासेखाऊ बंगाल्याच्या पिरेमात पडली आणि त्याच्याशी लगीन केलं.. गेल्या काही वर्षांपासून सधन-सोनाली सिंगापुरला स्थायिक झाले आहेत. मिताली ही त्यांची मुलगी. तात्यामामाचा हा छोटेखानी लेख हा खास तिचं कौतुक करण्याकरता...! वयाच्या अक्षरश: अडीचव्या वर्षापासूनच मितालीचे पाय थिरकू लागले. एक नैसगिक देवदत्त लय होती त्या पदन्यासात. सधन-सोनाली तेव्हा मुंबैतच राहायचे. त्यामुळे लगेचंच त्यांनी मितालीमधल्या या गुणांना पूर्ण वाव द्यायचं ठरवलं.

धग

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 12/07/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भावनांची धग; मी जाणीवपूर्वक कमी करतो आहे;.. जेणेकरून त्यांची झळ; तुला कधीच अस्वस्थ करणार नाही......... ..........
काव्यरस

धग

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 12/07/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भावनांची धग; मी जाणीवपूर्वक कमी करतो आहे;.. जेणेकरून त्यांची झळ; तुला कधीच अस्वस्थ करणार नाही......... ..........
काव्यरस

मराठीतील पहिली गझल

लेखक शरद यांनी मंगळवार, 12/07/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतली पहिली गझल डॉ. बिरुटेसरांनी सांगितले म्हणून मध्वमुनिश्वर व अमृतराय यांची एकदमच ओळख करून देण्याचा विचार होता. पण त्या आधी अमृतराय यांचा एक विशेष नमुद करावासा वाटतो. हा मराठीतला पहिला गझलकार. इतके दिवस हा मान मोरोपंत पंडितांना दिला जात होता. त्यांची " रसने न राघवाच्या थोडी यशात गोडी " ही पहिली गझल मानली जात होती. त्यावरून छंद-- रसना जाती असे नावही पडले. पण अमृतराय (१६५८-१७५३) हा मोरोपंतांना (१७२९-१७९४) ज्येष्ठ असल्याने त्याची " जगव्यापका हरीला नाहीं कसें म्हणावे " हीच मराठीतली पहिली ज्ञात गझल म्हणावयास पाहिजे. मला स्वत:ला या छंद, जातीत काही फारसा रस नाही.

ओशो भाष्य " कबीर बाणी"

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 12/07/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
जही घट प्रीती न प्रेमरस , पुनि रसना नहि राम ते नर इस संसार मे, उपजि भये बेकाम || " नेहमी शोधत राहायचे की आपल्या हॄदयामध्ये प्रेमरस ओत्तप्रोत भरलेला आहे की नाही आणि समजा भरलेला नसेल, आणि लक्षात आले की आतमध्ये वाळवंट आहे, तेथे पाउस पडणार नाही. तेव्हा त्वरा करा, अहंकार बाजूला करण्याची..!! तेच ध्यान आहे , हीच प्रार्थना आहे! अहंकाराला बाजूला सारण्याची कला म्हणजे योग , तोच खरा धर्म...!! अहंकार आणि विचार सोडले तर तुमच्या हृदयात प्रेमरस भरू लागेल. बाहेर पाउस बरसतच असतो..

कुणाला कुणाचे कशाला हवे

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 12/07/2011 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाला कुणाचे कशाला हवे
- - -
जळाला तळ्याचे कशाला हवे मनाला जनाचे कशाला हवे
.
कुठे काय झाले कधी अन् कसे कुणाला कुणाचे कशाला हवे
.
दुखवट्यामध्येही मुखवटे बरे रडे काळजाचे कशाला हवे
.
चिता चंदनाची ढिगाने फुले मढे माणसाचे कशाला हवे

पिवळा खडक राष्ट्रीय उद्यान (येलो स्टोन)

लेखक निमिष ध. यांनी मंगळवार, 12/07/2011 04:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बर्याच दिवसांपासून गाजत होते की पिवळा खडक राष्ट्रीय उद्यानात (येलो स्टोन) जायचे. अखेर संयुक्त राज्यांच्या स्वातंत्र्य दिवसाचा (४ जुलै ) चा मुहूर्त निघाला. आणि जवळ जवळ दीड महिना आधी आरक्षण करून (तंबू ठोकायला पण आरक्षण !!) निघालो. आता प्रवास वगैरे काही सांगत बसत नाही फक्त काही मित्राचा (अमोल बेदरकर) कॅमेरा वापरून काढलेले छायाचित्र (प्रकाशचित्र) टाकण्याचा प्रयत्न करतो. कॅमेरा आहे canon t3 रेबेल - २ लेन्स वापरल्या होत्या. एक मिळणारी आणि दुसरी लांबची. सुरवात झाली बेअर टूथ खिंडीच्या रस्त्यांनी. आता अर्धा उन्हाळा (इकडचा) संपला तरी इकडे बर्फ.