या निमित्ताने आमचे परम आदरणिय मित्र रा.रा. श्री श्री परीकथेतील राजकुमार रावजी साहेबजी महाराज यांचे चरणी जाहीरपणे नम्रतेची विणंती त्यांनी त्यांच्या भन्नाट चे पुढील भाग लवकरात लवकर प्रसिध्द करावे व आम्हा सर्व पामरांना उपकॄत करावे. या मालिकेतिल शेवटचा भाग त्यांनी दी. 27/01/2011 रोजी प्रसिध्द केला होता.
मालिका पुर्ण झाली की त्यांचा लकडीपुलावर सुप्रसिध्द अभिनेत्री राखी सावंत यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येईल.
(आता धावत सगळे भाग येतात की नाही ते बघाच)
वरील सगळे मानसपुत्र आपल्याला या मालिकेत एकत्र भेटणार होते असे आम्हाला अधि़कॄत रीत्या कळले होते
श्रा मो काका,
प.रा. ने मालिका पुर्ण केली नाही तर तुम्ही लेखणी हातात घ्या. तुम्ही जर मालिका पुर्ण केलीत तर तुमचा पण सत्कार करु लकडी पुलावर.
आम्हाला वाचायला मिळाले की आम्ही त्यातच खुश.
हे सुशि कोण?
देवा, हाच दिवस बघण्यासाठी ठेवले होतेस का रे मला ह्या भूतलावर?
अरे मराठी माणसा,
आयडी चेंज कर. 'मराठी माणूस' हा आयडी धारण करतोस आणि असला तद्दन हुकलेला प्रश्न विचारतोस?
मला कोणीतरी एक लार्ज भरा रे.
- (चिडलेला मराठी) सोकाजी
शिवाजी महाराज, संत चोखा मेळा, थोरले माधवराव पेशवे आणि राम गणेश गडकरी या प्रभृतींनाही 'सुशि' म्हणजे कोण, हे ठाऊक नसण्याची शक्यता दाट वाटते. (फार कशाला, मलाही ठाऊक नाही.)(माझे एक वेळ सोडा, पण निदान) ही मंडळी (तरी) (वानगीदाखल) 'मराठी माणूस' या नामाभिधानास पात्र नाहीत, असा आपला दावा आहे काय?
(त्या परिस्थितीत, 'मराठी माणूस' नसूनही ही मंडळी महाराष्ट्रात राहत होती, आणि (अनुक्रमे) राज्यकारभार, संतगिरी आणि अभंगलेखन, (पुन्हा) राज्यकारभार आणि काही फुटकळ नाट्यलेखन आणि विनोदी लेखन या क्षेत्रांत त्यांनी (प्रत्येकी) किमान एका तरी होतकरू 'मराठी माणसा'ची रोजगाराची संधी हडपली, असे खेदाने म्हणावेसे वाटते. 'मराठी माणसा'चा कैवार घेण्याचा दावा करणार्या संघटना याकडे लक्ष देतील काय?)
शिवाजी महाराज, संत चोखा मेळा, थोरले माधवराव पेशवे आणि राम गणेश गडकरी ह्यांचा काळात जर कदाचित सुशि असता तर ह्या प्रभृतींनाही 'सुशि' म्हणजे कोण हे ठाऊक असते.
असो, तरीही आपल्या भावनांना ठेच पोहोचली असल्यास (सुशि माहित नसल्यामुळे) सुशिचा आत्माही हळहळला असेल.
(कदाचित, कारण फारच कनवाळू होता तो ;) )
चियर्स :beer:
- (सुशिप्रेमी) सोकाजी
सुशि नाव माहीत आहे. पण त्यांचं लेखन अजिबात आवडत नाही. त्यामुळे "माहीत नाही" हा पर्याय पण हवा होता. असो...
अवांतरः
...भावनांना ठेच पोहोचली
हे असलं हिंदाळलेलं मराठी वाचून आत्मा हळहळला... :(
"चार तारखांत संपवतो मी हि केस. सगळे पुरावे हजर आहेत, ब्रम्हदेव जरी खाली आला तरी आरोपी सुटणे शक्यच नाहीत !"
"मला ब्रम्हदेवाची काळजी नाहीये दीक्षित... ह्या तिघांची केस बॅरिस्टर अमर विश्वासने घेतली आहे."
कमिशनर साहेबांचे वाक्य पूर्णं झाले आणि छातीत आलेली कळ दाबत दाबत दीक्षित ऑफिस बाहेर पळाले.
(क्रमशः) श्री परीकथेतील राजकुमार याचे शेवटचे श्ब्ध...........आह्मी वाट पाह्तोय बॅरिस्टर अमर विश्वास कधि येतोय ?
प्रतिक्रिया
सगळेच ....
+१
In reply to सगळेच .... by मी-सौरभ
सहमत
या निमित्ताने आमचे परम मित्र
धाग्याचा लाभ
In reply to या निमित्ताने आमचे परम मित्र by ज्ञानोबाचे पैजार
तुम्हीही लाभ घेतलात तर आमची हरकत नाही
In reply to धाग्याचा लाभ by श्रावण मोडक
तेच तर..
In reply to या निमित्ताने आमचे परम मित्र by ज्ञानोबाचे पैजार
+1
In reply to तेच तर.. by गवि
लिहितो लिहितो हा धागा बघुन
In reply to +1 by सोत्रि
?
हे राम....
In reply to ? by मराठी_माणूस
?
In reply to हे राम.... by सोत्रि
हम्म...
In reply to ? by मराठी_माणूस
धन्यवाद
In reply to हम्म... by सोत्रि
???
In reply to हे राम.... by सोत्रि
हे म्हणजे कै च्या कै आहे...
In reply to ??? by पंगा
भावनांना ठेच पोहोचली
In reply to हे म्हणजे कै च्या कै आहे... by सोत्रि
सगळेच मानसपुत्र आवडतात पण
सुशि.
श्री परीकथेतील राजकुमार याचे
In reply to सुशि. by दाद
सगळेच..