मुम्बईतील मिपाकर
मिपा परीवार बर्याच गावांत आहे. पुण्यातील लोक एकमेकाना बरेचदा भेटत असतात.
एखाद्या गावात गेलो तर आवर्जून तेथील मिपाकराना शक्यतो भेटण्याचा प्रयत्न करतात.
मी दिल्लीत होतो त्यावेळेस गुरगावच्या इरसाल भाउनी जे आगत्य दाखवले त्याला तोड नाही.
कोणी आपल्या घरचा पाहुणा आला आहे इतक्या अगत्याने त्याने माझे स्वागत केले.
मिपाकर मोठ्या संख्येने पुणे आणि मुंबई मध्ये आहेत.
पुण्यातील मिपाकर बहुतेक एकमेकाना व्यक्तीशः ओळखतात. मात्र मुंबईतील मिपाकराना हे वेळेअभावी शक्य होत नसावे.
मिसळपाव