Skip to main content

मुम्बईतील मिपाकर

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 01/08/2011 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवार बर्‍याच गावांत आहे. पुण्यातील लोक एकमेकाना बरेचदा भेटत असतात. एखाद्या गावात गेलो तर आवर्जून तेथील मिपाकराना शक्यतो भेटण्याचा प्रयत्न करतात. मी दिल्लीत होतो त्यावेळेस गुरगावच्या इरसाल भाउनी जे आगत्य दाखवले त्याला तोड नाही. कोणी आपल्या घरचा पाहुणा आला आहे इतक्या अगत्याने त्याने माझे स्वागत केले. मिपाकर मोठ्या संख्येने पुणे आणि मुंबई मध्ये आहेत. पुण्यातील मिपाकर बहुतेक एकमेकाना व्यक्तीशः ओळखतात. मात्र मुंबईतील मिपाकराना हे वेळेअभावी शक्य होत नसावे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना विनम्र अभिवादन.

लेखक सुकामेवा यांनी सोमवार, 01/08/2011 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.

सिंघम - परीक्षण

लेखक फारएन्ड यांनी रविवार, 31/07/2011 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
बाजीराव सिंघम लै पावरफुल आहे. तो नुसता स्क्रीनवर एन्ट्री मारतो तेव्हा ढोल वाजतात. मारामारी करायला जातो तेव्हा वीररसातील श्लोक मागे वाजतात. तो त्याच्या गाडीला किक मारतो तेव्हा सिंहगर्जना होते. पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो.

"चौफुला - २०११ काव्य जुने-शब्द नवे" अहवाल

लेखक प्राजु यांनी रविवार, 31/07/2011 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
बृहन महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथील द्वैवार्षिक अधिवेशनात 'चौफुला - २०११ काव्य जुने - शब्द नवे' हा मराठी कवितांचा कार्यक्रम दि २३ जुलै २०११ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमात अमेरिका आणि कॅनडा येथील १२ प्रथितयश कवी-कवयित्रींनी आपल्या सर्वोत्कृष्ठ अशा प्रत्येकी २ कविता सादर केल्या. कार्यक्रमाची सुरुवात बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष्या सौ माधुरी जोशी यांच्या स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली.

कसला नवरा पाहिजे तुला

लेखक धन्या यांनी रविवार, 31/07/2011 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
अनिवासी भारतीय मुलगा जावई म्हणून मिळतोय म्हटल्यावर मागचा पुढचा काहीच विचार न करता लोक कसे आपल्या मुलीचे कसे झटपट लग्न त्या एनाराय मुलाबरोबर लावून देतात आणि त्यानंतर कशा समस्या निर्माण होऊ शकतात यावर छान भाष्य करणारा लेख वाचून मला दोन वर्षांपूर्वीचा माझा अनुभव आठवला. अमेरिकेला मला डेप्युटेशनवर जाऊन पुर्ण वर्ष झालं होतं. कंपनीच्या नियमानूसार अकरा महिन्यांनंतर एक महिना सुट्टी मिळते. भारतात येण्याजाण्याचा खर्च कंपनीचा. मीही आत खुप झालं म्हणून वर्ष पुर्ण होताच एक महिन्याची सुट्टी घेतली आणि भारतात आलो.

( मावळे बुडाले कामी )

लेखक अर्धवट यांनी रविवार, 31/07/2011 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
शरदीनितैंच्या कविता आम्हाला नेहेमीच आवडतात, त्यातल्याच लेटेष्ट बावळे बुडाले धामी यावरून प्रेरणा घेउन.. मावळे बुडाले कामी //एक // धडक उरावर तप्त पर्वणी नर्मपणिचे उन्नत चरणी मिकामुकातील संथ चुंबनी मंतरले सावंतासदनी //दोन// अल्प त्यावरी भर्जर त्राता राहुलभजनी विचित्रवस्त्रा भर्कन शोधा मोडीत मूढा त्रिकोणमग्रूर तुरंतखोला //तीन// भंगअपेक्षा नाकफेंदरी स्वयंवराची हावहावरी बंधननक्षी उभयापक्षी प्रसिद्धीकिडा चावलवक्षी धाडीशिकंजी प्रयासखोटा वसकन उघडा मिरवीसर्वा मिपास्थळावर कशास बोधा कविताकर्मी फुटला माथा.

अर्धवट राहिलेलं प्रेम

लेखक प्रिया ब यांनी रविवार, 31/07/2011 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भावना तुझ्या पर्यंत कधी पोचल्याच नाहीत न व्यक्त केलेलं ते प्रेम तुला कधी जाणवलच नाही अस्पष्ट मारलेली तुला हाक कधी ऐकू आलीच नाही मनाने केलेला स्पर्श तुला कधी भासलाच नाही मैत्रीच्या पुढे जावं अशी मनोमन प्रार्थना करत होते पण तुला दुखवायचं नव्हतं म्हणून मागे सरत होते तुला सांगण्याचे अनेक निष्फळ प्रयत्न मी केले मला नीट सांगता आलं नाही आणि तुलाही कधी नाही हे कळले तुझ्या जीवनात येईल कुणीतरी नवी नसेल माझ्या मनात तिच्याबद्दल अढी नाही करणार मी तिचा हेवा पण एक सामान्य मुलगी म्हणून एवढंच म्हणेन "हे सगळं स्वीकार करायची शक्ती दे मला देवा!!!" भवतालचं सगळंच वातावरण उदास वाटत आहे आपले एकत्र असलेले

फकरूद्दीनची व्यथा

लेखक प्यासा यांनी रविवार, 31/07/2011 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली पोलिसांनी ऑगस्ट २०१० मध्ये ओखला मार्केट येथे फकरुद्दीन ह्या किशोरवयीन मुलास अटक केली होती.त्याच्यावर एटीएम कार्ड अन २०० रुपये चोरी केल्याचे आरोप फिर्यादीने दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी महोदयांनी त्याला तिहार जेलमध्ये पाठविले.त्याला जामीन नाकारण्यात आला.९ महिन्यांनी त्याला १० हजार रु.चा जामीन मंजूर झाला.पण तेव्हढे पैसे तो भरू... शकत नसल्याने तो परत तिहारमध्ये रवाना झाला.२०० रु.चोरीची अधिकतम शिक्षा ३ महिने इतकी आहे . मुद्दा हा आहे की.पोलीस अन न्यायाधीशांनी फक्रुद्दीनला १ वर्षे जेलमध्ये का अन कशाच्या आधारे ठेवले?

बावळे बुडाले धामी

लेखक शरदिनी यांनी रविवार, 31/07/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
बावळे बुडाले धामी //एक // धडक उजागर पत्र अर्पणी गर्भवतीचे प्राक्तन चरणी माजघरातील संथ कीर्तनी हंबरले बावळेच सदनी //दोन// सप्त चरदरी भर्जर घाता चंदनरजनी विशिल्पवस्त्रा सर्जनशोधा मोडीत काढा त्रिकोणमुक्रर मृदंगढोला //तीन// भंगअपेक्षा भाळशेंदरी उपेक्षितांची उकल हावरी गोंदणनक्षी पत्तनसाक्षी निर्मितक्रीडा घायलवक्षी कोडीकलेजी प्रयासबोटा फसगत निबिडा हिरवीपर्वा अन्वयव्यर्था कशास शोधा कविताजखमी अलभ्यबाधा //चार// स्वीकृततारण पिंजणपाशी आकंठलसलस निर्मितदेशी अवतरणातून आत्ममैथुनी भोगभोगितो अनुभवकवनी बावळे बुडाल
काव्यरस