Skip to main content

मिसळपाव

लेखक अभिजीत राजवाडे यांनी मंगळवार, 16/08/2011 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
खोबरे मृदु प्रेमाचे अन मिर्ची्चा घाव आहे. आयुष्य तरी हे काय, एक मिसळपाव आहे. सोडुनी गेली होती त्या जुन्या पिंपळाखाली तिथेच भेटशील मजला हे मला ठाव आहे धरतीचा कंप होऊनी ते डोंगर मिटुनी गेले सांगावे लागले मजला, इथेच गाव आहे ज्याने प्रदुषित केले त्यालाही तोय दिधले गंगेकडेही कडेही माझ्या आई्चा स्वभाव आहे खोटे पसरते आहे मजला अजुन आस आहे अजुन माझ्या शरिराला माझे्च नाव आहे

प्रिंट मिडिया अण्णाच्या विरोधात का आहे?

लेखक संपत यांनी मंगळवार, 16/08/2011 02:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिंट मिडिया सध्या सातत्याने अण्णाच्या विरोधी लिखाण करतो आहे (इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या तुलनेत). उदाहरणार्थ आजच्या सर्व पेपरमध्ये अण्णाच्या चळवळीवर पातळी सोडून टीका आली आहे(अमेरिकेचे हस्तक, जातीयवादी). ह्याचे कारण माझ्या मते प्रिंट मिडीयाचे राजकारण्यांची असलेले घट्ट आर्थिक संबंध.आपल्याला काय वाटते?

जन गण मन च्या निमित्ताने

लेखक विकास यांनी मंगळवार, 16/08/2011 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारताच्या स्वातंत्र्यदीना निमित्त तसेच रविन्द्रनाथ टागोरांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सरकारने पुढाकार घेऊन केलेले आपल्या राष्ट्रगीताच्या पाचही कडव्यांचे सुंदर सादरीकरण ऐकायला मिळाले. आपण जर पाहीले नसेल तर ते अवश्य पहावेत! घटनेप्रमाणे केवळ पहीली दोन कडवीच राष्ट्रगीत आहे.

काय हे मनिष तिवारी-जी!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 15/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा हजारे यांच्यासाख्या ज्येष्ठ आणि त्यागी व्यक्तीला संबोधताना "तुम", तुम्हारा" सारखे एकेरी सर्वनाम वापरणार्‍याचे कुणीही समर्थन करणार नाहीं. पण काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असलेल्या मनिष तिवारी यांनी पूजनीय अण्णांना असे एकेरीत संबोधले. त्याबद्दल त्यांचा त्रिवार निषेध! ('साहेब'चा 'जी' केला आहे!)

सैरभैर .......

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 15/08/2011 06:06 या दिवशी प्रकाशित केले.
काचेतुन बाहेर लॉन वर एक कावळा दिसतोय. कावळाच असावा. तीच चालण्याची ऐट, तेच मान वाकडी करुन निरखुन पहाण, तोच अलर्टनेस . खरच कावळ्या सारख तरतरीत पाखरु नाही दुसर! पण मग हा पांढरा रंग? मला हसुच फुटल. कावळ्याची अन बगळ्याची गोष्ट आठवली. त्यात बगळ्या सारख गोर होण्यासाठी नदीवर जाउन साबू लावून, घासून घासून अंग पांढर करायच्या प्रयत्नात रक्तबंबाळ झालेला कावळा आठवला. याला माहित असेल का ही गोष्ट? नुसता साता समुद्रा पल्याडचा नव्हे तर दक्षिण गोलार्धातला कावळा हा! आपल्या भारतीय संस्कृतीच माप याला लावुन चालेल काय? च ... काय हे ? कुठून कुठ ?

दामिनी

लेखक मराठे यांनी सोमवार, 15/08/2011 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या दिवसभर घरात खूपच गरम होत होतं. टिव्ही वरून संध्याकाळी थोडा पाउस असेल असं सांगत होते पण सात साडेसात पर्यंत आकाशात कसल्याही संशयास्पद हालचाली दिसेनात. घरात उकडत होतं म्हणून बाहेर ग्यालरीत येउन बसलो. थोडावेळ गेला नसेल तोच वारा सुरू झाला आणि बघता बघता आकाश भरून आलं. हा हा म्हणता विजांचा कडकडाट सूरू झाला आणि दणदणीत शॉवरबाथ घेतल्यासारखा पाऊस सुरू झाला.

बहरणारा ऋतू संपत आलाय ...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 15/08/2011 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
झाडांनी दखल घेतलीय बहरणारा ऋतू संपत आल्याची कशी जाणीव होते झाडाना ..? या बर्फाळ हवेची श्वास गुदमरू लागल्याची पाने पिवळी होऊ लागलीत आता कधीपण सुरु होईल पानगळ झाडांनी सर्व तयारी केलीय काळीज घट्ट करून पानाना निरोप देण्याची निष्पर्ण होऊन जातील सर्व झाडे कालच कितीतरी पाने गळून गेली नि आज सकाळी खच्चून सडा पडला पानांचा ... काष्ट शिल्प तशी झाडे ओकीबोकी ...!! त्यांच्या जाण्याच्या जाणीवेने दिशाही झाकोळून गेल्या ढगाचा कल्लोळ आभाळात आणि झाडे केविलवाणी ..... गळत्या पानाना कुशीत घेऊन फक्त मुकी मुकी झाडांनी मन घट्ट करून तयारी केलीय कधीपासून आपल्या पानाना निरोप देण्याची......! तो ह्या प
काव्यरस

कॉकटेल लाउंज : अनारीटा

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 15/08/2011 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
मोहितो...व्हिस्की गाथा...लिक्युर गाथा... व्हाइट रशिअन... झणझणीत मरीआइ... 'कॉकटेल लाउंज' मालिकेतील आजचे कॉकटेल आहे अनारीटा