ब्रिटीश सरकार विरुद्ध अधून मधून एखादी आंदोलनाची लाट उसळून जायची , मग काही दिवसांनी सगळं पूर्वपदावर येत होतं . कालपर्यंत अगदी उत्साहात असलेले कार्यकर्ते निराश होत होते . एकदा आंदोलनाचं लोण ओसरलं की मग पुन्हा आपल्या आयुष्याची जुळवाजुळव करत होते .
निराशा झटकून परत उत्साहानी जमवा जमव करणारे विरळेच , तसे लोकं संख्येनी फार कमी होते .
त्यातलाच माझा मित्र होता विश्वास . लहानपणा पासूनचा शेजारी , वर्गमित्र , बालमित्र .
लहान असताना मी पण एका आंदोलनात भाग घेतला होता , सरकारी कचेरीवर पिकेटिंग होतं , आम्ही मुलांनी त्यात मोठ्या उत्साहानी भाग घेतला होता .