लेखकराजेश घासकडवीयांनी बुधवार, 21/09/2011 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळ इतक्यात कशी झाली,
काही कळलंच नाही.
आत्ता आत्ता डोक्यावर दिसणारा सूर्य
उतरला क्षितिजाकडे कधी? कळलंच नाही.
आणि अचानक अंधार झाला,
मिणमिणत्या पणत्यांनी जेमतेम दिसणारा, थरथरणारा
केविलवाण्या, धूसर सावल्या हलवणारा
एकएक करून त्याही विझल्या.
लेखकपाषाणभेदयांनी बुधवार, 21/09/2011 05:00 या दिवशी प्रकाशित केले.
चुकीचे मोबाईल रिचार्ज
गट्टू अन गिट्टी जात होते एकाच कॉलेजात
तेथेच जुळले त्यांचे; गुंतले दोघे एकमेकात
गट्टू स्वभावाने वांड होता गावात सोडलेला सांड होता
याच्याशी भांड त्याच्याशी भांड असले उद्योग करत होता
गिट्टीला तो खुपच सोज्वळ भासे
कच्च्या लिंबाप्रमाणे कोवळा वाटे
कॉपी केल्याने कॉलेजमधून रस्टीकेट झाला
अपेक्षेप्रमाणे गट्टू एस.वाय.ला फेल झाला
मनापासून प्रेम होते त्याचे गिट्टीवर
ती न भेटली तर जीव होई खालीवर
इकडे गट्टूच्या बापाने त्याला घराबाहेर काढला
काहीतरी कामधंदा कर तरच घरी ये म्हणाला
काय करावे काय करा
लेखकमुक्तसुनीतयांनी बुधवार, 21/09/2011 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच माधुरी दीक्षितला लिहिलेलं अनावृत्त पत्र आणि त्यावरून झालेली चर्चा वाचली. काही जणांनी असा सूर लावला की माधुरी दीक्षित ही काही फार मोठी अभिनेत्री नव्हे. इतरांनी त्या विरोधात नि बाजून मतं मांडली.
हे सगळं वाचताना असे विचार मनात येत होते की, माधुरी दीक्षित म्हणा किंवा अन्य अशा स्वरूपाच्या एकेकाळच्या किंवा आताच्या लोकप्रिय नटनट्यांबद्दलची चर्चा वाचताना आपण यामधे मनाने गुंतत नाही आहोत. उदाहरणार्थ या प्रकरणी ही व्यक्ती चांगली अभिनेत्री आहे की नाही हा प्रश्नच मला महत्त्वाचा वाटेनासा होता.
लेखकपाषाणभेदयांनी बुधवार, 21/09/2011 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
सदाचार नाही हा तर आहे
भ्रष्ट आचार भ्रष्ट आचार
काम करण्यासाठी कुणी ऑफीसात येतो,
ऑफिसर कारकुनाची विनवणी करतो
आज ये उद्या ये म्हणून वेळ फुक्कट जातो,
पैसे घेवूनच मग कामं तो करतो
असल्या कामासाठी लाच खाणं झाला शिष्टाचार शिष्टाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
गोरगरीबाचे कामं तुम्ही लवकर कराना,
चिल्यापिल्यांचे तुम्ही आशिर्वाद घ्याना
माणसातली माणूसकी आता जागवाना
पैसे मागण्याचा खेळ आता संपवाना
सदाचार, सुनीती, निष्ठा यांचा करा प्रचार, करा प्रचार
हटव
लेखकपाषाणभेदयांनी बुधवार, 21/09/2011 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
(मालकीणोपदेश)
संदर्भ
"लिहावे की न लिहावे, उडेल की न उडेल, रुचेल की न रुचेल, संपादेल की नसंपादेल हाच मोठा प्रश्न आहे"
- पाषाण भेद-फियर (करू नको)
(वरील जगप्रसिद्ध वक्तव्य असणारा गहन प्रश्न आमच्याही मनात आला पण गावातील आजकालचे नवनवीन Items पाहून ती भीती कमी झाली.)
काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी बृ-स्पतीवारात माझ्या क्लायंट्सना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला बृ-स्पतीवार परिसराची एक चक्कर पुरेशी असते.
लेखकसोत्रियांनी मंगळवार, 20/09/2011 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय माधुरीस,
तु तेज़ाबमधुन आलीस, वादळासारखी, आणि 1-2-3-4 च्या तालावर सर्वांना वेड लावलसं. मला मात्र 'कह दो के तुम हो मेरे वरना...' ह्या गाण्यात मांडीवर थाप मारुन अनिल कपुरला आर्ततेनं साद घालणारी तु प्रचंड भावलीस आणि चरचर काळीज कापत काळजात खोल रुतुन बसलीस. अजुनही ते गाणे आणि त्यातली तुझी ती थाप काळजात कालवाकालव करते.