अलिकडेच माधुरी दीक्षितला लिहिलेलं अनावृत्त पत्र आणि त्यावरून झालेली चर्चा वाचली. काही जणांनी असा सूर लावला की माधुरी दीक्षित ही काही फार मोठी अभिनेत्री नव्हे. इतरांनी त्या विरोधात नि बाजून मतं मांडली.
हे सगळं वाचताना असे विचार मनात येत होते की, माधुरी दीक्षित म्हणा किंवा अन्य अशा स्वरूपाच्या एकेकाळच्या किंवा आताच्या लोकप्रिय नटनट्यांबद्दलची चर्चा वाचताना आपण यामधे मनाने गुंतत नाही आहोत. उदाहरणार्थ या प्रकरणी ही व्यक्ती चांगली अभिनेत्री आहे की नाही हा प्रश्नच मला महत्त्वाचा वाटेनासा होता. अधिक विचार करताना असं जाणवलं की या व्यक्तीचे किंवा अशा प्रकारच्या व्यक्तींचे "फॅन" असण्याचे आपले दिवस ( कधी काळी असलेच तर ) आता संपल्यात जमा आहेत. आता याला लोक मिडलाईफ प्रवृत्तीही म्हणू शकतील. मुद्दा असा आहे की, सचिन तेंडुलकर म्हणा किंवा माधुरी दीक्षित म्हणा किंवा अमुक कुणी लोकप्रिय व्यक्ती, या लौकिकार्थाने "दैवत" किंवा "दिल की धडकन" असतील. पण कदाचित या मोठमोठ्या सितार्यांपलिकडे ज्याची त्याची दैवतं असतील/असू शकतील. किंबहुना या व्यक्ती अशा असतील की ज्यांचं काम प्रेरणादायक वाटू शकेल परंतु "मला पहा फुलं वहा" अशा प्रकारच्या गोष्टी त्याना स्वतःलाही पसंत पडणार नाहीत.
या पार्श्वभूमीवर सुचलेले प्रश्न चर्चाप्रस्ताव म्हणून मांडतो.
सितार्यांपलिकडे , ग्लॅमर/पैसा या गोष्टींपलिकडच्या क्षेत्रांमधली तुमची आदरस्थानं आहेत काय ? असल्यास कोण ? कुठल्या क्षेत्रांत ? का ?
एखाद्या अभिनेत्या/अभिनेत्री/खेळाडू बद्दलच्या प्रेमापेक्षा या अशा स्वरूपाच्या व्यक्तींबद्दलच्या भावनांमधे काही मूल्यात्मक फरक जाणवतो का ? असल्यास काय ?
विविध क्षेत्रांतील व्यक्तींबद्दल वाटणार्या प्रेमाची/आकर्षणाची/आदराची/स्फूर्तीची भावना या स्वरूपाच्या गोष्टींमधे काही उतरंड असते असं तुम्हाला वाटतं का ? असल्यास त्याचे निकष काय आहेत ?
ज्या व्यक्तींना तुम्ही तुमचे आयडॉल मानता त्यांचं काम तुम्ही जवळून पाह्यलं आहे का ? त्या कामाचं महत्त्व, त्याचं मर्म तुम्हाला काय जाणवलं ? इतरांना याबद्दल काही सांगू शकाल काय ?
वाचने
10201
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
बुद्धीमान
.
या चर्चाविषयाबद्दल धन्यवाद
प्रतिसाद आवडला
In reply to या चर्चाविषयाबद्दल धन्यवाद by ऋषिकेश
याचमुळे प्रश्न विचारला होता
In reply to प्रतिसाद आवडला by नगरीनिरंजन
की यात एका व्यक्तीपेक्षा
In reply to याचमुळे प्रश्न विचारला होता by गवि
प्रभाव !!
In reply to याचमुळे प्रश्न विचारला होता by गवि
आ द र्श
अत्यंत उत्कृष्ट मुद्दा
प्रश्न
उत्तम चर्चाविषय!
चांगला विषय
मस्त विषय ...
आदरस्थानं
जाणीव
In reply to आदरस्थानं by ढब्बू पैसा
आयडॉल्स
माझे आयडॉल
उत्क्रांती, अंतःप्रेरणा इ.
प्रतिसाद आवडला
In reply to उत्क्रांती, अंतःप्रेरणा इ. by नंदन
आय लव्ह मिपा...
In reply to उत्क्रांती, अंतःप्रेरणा इ. by नंदन
>>>सितार्यांपलिकडे ,
प्र.का.टा.आ.
हम्म
प्रतिसाद नेहेमीप्रमाणेच आवडला
In reply to हम्म by चित्रा
उत्तम चर्चाविषय
माझे दोन
प्रतिसाद
देणार्याने देत जावे...
माझे आयडॉल्स
माधुरी .. आई ग..
असेच
In reply to माधुरी .. आई ग.. by सुवर्णमयी
आदर्श....
मोठ्या लोकांच्या गोष्टी वाचून
माझे काही विस्कळीत विचार
चांगला चर्चाप्रस्ताव, मननीय प्रतिसाद
भाबडे सत्य
आयडॉल्स आणि आयडीयल्स