Skip to main content

आठवणींच्या जंगलात

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/07/2022 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे.

अलक - वारी

लेखक मालविका यांनी शनिवार, 02/07/2022 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
अलक १ भरपूर कष्टातून वर आलेला तो. लक्ष्मी आणि सरवस्ती दोघींचा वरदहस्त असलेला तो तरीही जरा अस्वस्थच असायचा. पाहिजे ते समाधान मिळेना. शेवटी कंटाळून मानसोपचार तज्ञ् गाठला. सगळं गाऱ्हाणं ऐकून झाल्यावर तज्ज्ञांनी हसून त्याला वारीला जायचा सल्ला दिला. त्याचा विश्वास बसेना तरीही त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी तो निघाला. त्या लाखो लोकांमधला एक झाला. त्यांच्यासारखाच पेहराव, त्यांच्यातच मिळून मिसळून वागताना तो स्वतःला विसरला. त्यांच्याबरोबर भजन म्हणत, अभंग गात त्यानेहि ताल धरला. इतर वारकर्यांबरोबर टाळ वाजवून नाचताना तो भान हरपला आणि मग त्याला जाणवलं. हेच तर हवं होत आपल्याला.

तो पाऊस निराळा असतो..!

लेखक राघव यांनी शनिवार, 02/07/2022 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाकडे बघून आलेले हे विचार.. शेवटी आपण सर्व अनुभव मनानेच जगतो. हा मनातला पाऊस कितीतरी वेगवेगळ्या रुपांत जाणवतो. रुपं अनेक आहेत, त्यातली काही मांडण्याचा एक प्रयत्न. :-) रखरखत्या रेताड धरेचा येतो वर्षाकाळ.. मुरमाड मनाच्या मशागतीला मायेचा फाळ.. तो रुततो, खुपतो, नांगरट धरतो, आनंदे वर्षतो.. तो पाऊस निराळा असतो.. मनामनांतील भाव-धारणा जेणे अंगारती.. स्वराज्य विचारे उभ्या ठाकती, लक्ष-लक्ष ज्योती.. राष्ट्रभावना जागृत धरतो, मनगटांत वळतो.. तो पाऊस निराळा असतो.. राष्ट्र उभारावया प्रकटते पुरुषार्थाला साद.. कोटी-कोटी आहुती, गर्जती, प्रणवाचा नाद.. तो त्याग वर्षतो, सिंचतो, घडवतो.. राष्ट्र उद्धारतो..

विठू माउली

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 01/07/2022 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
रखुमाई विठ्ठलावर होती थोडी नाराज ठरवले तिने फार बोलायचे नाही आज ठरले होते आधी ते वेळ मला देणार मग जाऊन भक्तांना दर्शन ते देणार भक्त आपले सारखे काही ना काही मागतात विचार न करता हे देऊन सगळे टाकतात आधीच मला ठेवली यांनी स्वतःपासून दूर आषाढीला येईल आता भक्तांचा मोठा पूर लांबूनच मी यांच्यावर लक्ष ठेवून असते कोण येतंय कोण जातंय सगळं बघत बसते हे सुद्धा दिवसभर उभे राहून दमतात मिटल्या डोळ्यांनी सुद्धा जग सगळं पाहतात कधी एकदा हात खाली घेईन असं त्यांना होत पण भक्तांकडेच मन यांचं सारखं ओढ घेत आषाढीच्या आधी जरा विसावू त्यांना म्हटलं दोन घटका चार शब्द बोलावं जरा वाटलं पण आता यांना

यह मेरा काम नही है

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/07/2022 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे सचिन यहा आना तो." अनिल ने मला त्याच्या कॅबीनमध्ये बोलावले. अनिल म्हणजे डाटा सेंटरचा हेड मॅनेजर होता. स्वभावाने अगदीच मोकळा नसला तरी एक माणूस म्हणून तो ठिक होता. एखादी गोष्ट, नवी टेक्नॉलॉजी माहीत करून आपल्या डेटा सेंटर मध्ये कशी आणता येईल याबाबत तो नेहमी विचार करत असे. आता त्याने मला कसल्यातरी कामाला बोलावले होते. तसेही मी काही महत्वाचे काम करत नव्हतो. "तुम्हे कल शाम को नगर जाना पडेगा. यह अपना पहेलाही प्रोजेक्ट है. वहा जाके कॉम्पूटर को नेटवर्क मे लाना यह काम है." - अनिल. "मतलब वहा जाकर कॉम्पूटर इंटॉल करना वगैरा काम है क्या?", मी प्रश्न केला. हा लगभग वही है. नगर अर्बन बॅंक है.

अतृप्त ओळी

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 29/06/2022 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मसमरूप दिसतात ओळी आत्मस्वरूप असतात ओळी . इथे नदीचा दिसतो काठ तिथे संथ प्रवाह पार लावतात ओळी . निराळ्या वेदनेच्या एकाच गावी दिसता दिसतो आम्ही सहप्रवासी कुठे दूर अंधारात हरवले गाव माझे दिसे मी उगाचच तिथला निवासी असे शब्द साधे येतात साथी कविता त्यातुन वाहते प्रपाती . उरी अंतरी घाव नाजूक खोल वरी दिसते केवळ शांत ज्योती ! आम्ही नाही ऐसे कवी ज्यास म्हणती जशी वेदना ती , तसे शब्द हाती. मनाचेच सारे इथे मांडयाचे .. न पूर्ती मिळे त्यातूनी .. काय त्याचे? असा मी ही अतृप्त अतृप्त आहे . . माझ्या स्वभावी मूळचा शाप आहे .

लढवय्या

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 28/06/2022 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी लढवय्या सैनिक आहे चतुरस्र ही सेना माझी राजकुमार मी बाबांचा हे साम्राज्य ही माझेच आहे मी फोन उचलला नाही मी भेटही दिली नाही इंद्रापदा करता सुद्धा कधी दंगा केला नाही काकांनी मज समजावले सिंहासन,बाळा तुझेच आहे सुखेनैव राज्य कर तू आता मी तुझ्याच बरोबर आहे सर्वत्र सुखशांती आहे काकांनी मज सांगीतले जा बाळा तू झोपी मी जागा आहे उघडले खडकन डोळे मग सैरभैर मी झालो सेनेने बंड केले, हे मज कुणी सांगीतलेही नाही मग लढता लढता काका दुर निघूनी गेले कधी अभिमन्यू झाला माझा हे मलाच उमगले नाही मी लढवय्या सैनिक आहे चतुरस्र ही सेना माझी...... २८-६-२०२२ कृपया हल्के घ्या, मनोरंजनाव्यतिरिक्त याच्या मागे कुठलाच उद

फोटोवारी-२०२२

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 27/06/2022 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी माझा एक मित्र दरवर्षी आळंदी ते पुणे वारी करतो आणि मी दरवर्षी त्याला "येतो" म्हणुन आळशीपणा करुन जात नाही. पण यावर्षी जमवुच असे ठरवले आणि माउलींच्या कृपेने ते साधलेसुद्धा. तर यावर्षीच्या वारीची काही क्षणचित्रे देतो आहे. सकाळी ६ वाजता मनपाला भेटायचे ठरले होते. पी एम पीची नेहमीप्रमाणेच प्रवाशांविषयी अनास्था.

(दळण नसलेल्या गिरणीवर)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 27/06/2022 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा http://misalpav.com/node/50380 कर्नलसाहेबांची त्रिवार क्षमा मागून *दळण नसलेल्या गिरणीवर* जेंव्हा कोणीतरी पीठ पाडतं मग त्या पिठावरच्या सरळ रेषाच कंटाळून नागमोडी होऊन जातात टोमणे आणि कुचकट बोलणे जेव्हा नित्याच होतं तेव्हा वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं बदललेला गिरणी चालक आणि त्याच्या भूलथापांचा मारा सततची कुचंबणा, अन अवहेलना आणि नको नकोसे असमान वाटप वाटेवर नाराजी पसरवते भिजलेला सैनिक,त्याचा दबलेला आवाज पुन्हा एकदा गर्जना करतो अन नाराज वाटेवरल

वळण नसलेल्या वाटेवर

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 27/06/2022 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
*वळण नसलेल्या सरळ वाटेवर* जेंव्हा कोणीतरी खास भेटतं मग सरळ रेषेतलं आयुष्य नागमोडी होऊन जातं वादळ आणी पाऊस मग नित्याच होतं पण वादळा पूर्वीची शांतता सोसण मात्र असह्य होतं सोसाट्याचा वारा ,गारांचा मारा संतत श्रावणधार, रस्ता चिबं होतो आणी हवाहवासा गारवा वाटेवर पसरतो भिजलेला रस्ता,दाटलेली हिरवळ पुन्हा एकदा कुशीत येते अन वाटेवरली मरगळ त्वरीत निघून जाते आसेच कुणीतरी खास भेटावे प्रत्येकाला वाटते मग नागमोडी वाट सुद्धा सरळ भासते २७-६-२०२२