Skip to main content

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 06/03/2023 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
✪ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा ✪ हिरव्यागार निसर्गातील रस्ते ✪ भीमा आणि गाणगापूर ✪ अशी राईड = अपूर्व आनंद ✪ अशा प्रवासात आपली स्वत:सोबत होणारी खरी भेट ✪ कलबुर्गीमध्ये श्री बसवराजजींसोबत भेट ✪ ६ दिवसांमध्ये ५३८ किमी सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी) सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- च

पुण्याहून - काश्मीर टूर (मदत करा)

लेखक नजदीककुमार जवळकर यांनी सोमवार, 06/03/2023 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! पुण्याहून - काश्मीर टूर करायचं ठरत आहे. प्रवासी : मी,बायको, मुलगी (१३), मुलगा (७) मार्च शेवटी किंव्हा मे, शक्यतो मार्च ग्रुप टूर चालेल वीणा वर्ल्ड फार महाग वाटतं आहे साधारण ५९,०००/- (एकाचे), मुलगा लहान म्हणून ४८,००० ह्यात विमान - हॉटेल - फिरणे -खाणे सर्व आले. साधारण ६ दिवसाचा टूर ठिकाणं - श्रीनगर, पेहेलगाम , गुलमर्ग, सोनमर्ग कृपया मार्गदर्शन करा. बरेच मिपाकर गेले असतील. काही links, tour operator असतील तर कळवा. इतरत्र माहिती असेल तर अवश्य कळवा. भटकंती मध्ये Access Deny येत आहे म्हणून इथे पोस्ट करतोय. धन्यवाद !

रापण.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 06/03/2023 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी -प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे. - तारर्कर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर भटकंतीचा आनंद घेतला.तेव्हां एक वेगळाच अनुभव आला. रापण,कोकणात कोळ्यांचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय. यावेळेस बघायला मिळाला.जाळ्यात अडकलेल्या जलचरांची अवस्था बघून वरील गझल आठवली.काही ओळी सुचल्या त्या पंक्तीबद्ध करायचा प्रयत्न केला.याचे श्रेय मी गझलकारांना देईन. गझलकार अंत्यत संवेदनशील,प्रतिभावान.

" जू "

लेखक देवू यांनी सोमवार, 06/03/2023 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १ सोसायटीतील एका वयस्कर सदस्याचे निधन झाले होते. पुरुष मंडळी अंत्यसंस्काराची तयारी करत असताना महिलांनी त्याच्या पत्नीला बाहेर आणले. तिची वेणी घातली, त्यात गजरा माळवला, हातात हिरवा चुडा भरून, कुंकू लावले. पतीच्या पार्थिवाच्या पाया पडल्यावर तिला पाटावर बसवले. बायकांमध्ये कुजबूज सुरु झाली. कोणीतरी शेजारील सोसायटीतील " नानींचे " नाव सुचवले. नानी आपले स्थूल शरीर सांभाळत गर्दीतून वाट काढत येत होत्या. त्यांना वाट करून दिली जात होती. नानींना आधार द्यायला दोघी तिघी पुढे सरसावल्या. त्यांना पुढे घेऊन येताना त्यातील एकजण नानींच्या कानात काहीतरी कुजबुजली . नानींनी मान डोलावली.

बंदूक भाग २

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 05/03/2023 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
घरी आलो तर आईनं तोंडाचा पट्टा सुरु केला. " कुठं गेला होतास, तुला घर दार हाय कि नाय, उन्हा-तान्हातून दिवसभर उंडगत असतोस, थांब तुझ्या तंगड्याच तोडून ठेवता, जनमभर पोसायला झालं तरी चालल, डोक्याला ताप तरी राहणार नाय." ती बोलत असलेला एक शब्दही आपल्याला ऐकू येत नाही, अशा अविर्भावात मी हात पाय धुवून जेवायला बसलो. जेवण उरकल्यावर खाटेवर शहाण्या मुलासारखा बसून राहिलो. थोड्या वेळानं आईच लक्ष नसल्याचं पाहून सटकलो. संज्याच घर वाटेत असल्यानं, तो घरी आहे का पाहावं? म्हणून त्याच्याकडे गेलो, तर तो जेवायला बसलेला. ओट्यावर कुणीतरी पायापासून डोक्यापर्यंत अंगावर घेऊन झोपलं होतं.

बंदूक भाग १.

लेखक Deepak Pawar यांनी शुक्रवार, 03/03/2023 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच पावसाळा संपून जिकडे तिकडे आनंदाचे वारे वाहू लागले.शेतकऱ्याची तर नुसती धांदल उडाली होती. कुणाची भात कापणी सुरु होती.कुणी नाचणीची कणसं वेचत होतं, तर कुणी कापून आणलेल्या धान्याच्या अडव्या घालत होतं. गुरं पोट टम्म भरेपर्यंत चरत होती. नुकत्याच कापून झालेल्या शेतात; कणसातून पडलेले दाणे टिपण्यात पाखरं मग्न होती. त्याची तर मजाच-मजा. धान्य टिपणारी पाखरं बघणं तर त्याहून मजेदार.म्हणजे ती दाणे टिपताना दोन-तीन दाणे टिपणार, मान वर करून आजूबाजूला टकामका बघणार,परत दोन-तीन दाणे टिपणार परत मान वर करून टकामका बघणार. काही धोका नसे पर्यंत हे न थकता सुरूच राहणार.

मक्याचे लॉलीपॉप

लेखक Bhakti यांनी शुक्रवार, 03/03/2023 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
खमंग थालिपीठ पाहून मलाही वेगळे थालिपीठ बनवायची इच्छा झाली.लुसलुशीत दाणे असलेले मक्याचे कणीस दुर्लक्षामुळे कोरडे व्हायला लागले होते.मक्याचे पीठ त्याच्या कार्ब ,फायबर मुळे अनेक पाककृतीमध्ये वापरले जाते.थालिपीठ तर बनवायचे होते पण लेक कालपासूनच म्हणत होती वेगळ खायचं आहे.तेव्हा लॉलीपॉप हा प्रकार कधीच केला नाही तो करावा म्हटलं. साहित्य: g दोन वाट्या उकडलेले मक्याचे दाणे एक वाटी उकडलेले मटार दोन उकडलेले बटाटे मिरची,लसूण,आलं,जिरे,कोथिंबीर वाटण दोन चमचे तिखट,चाट मसाला,गरम मसाला चवीपुरते मीठ दोन चम

वांग्याचे थालीपीठ आणि भरीत!

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 02/03/2023 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : कर्नल साहेबांचा 'थालीपीठ-एक मराठमोळा पदार्थ' हा धागा आणि त्यावरचा गविंचा हा प्रतिसाद! दोन-तीन महिन्यांतून करावी लागणारी फार्मच्या रेग्युलर मेंटेनन्सची कामे तिन-चार दिवस चालणार असल्याने नेहमीप्रमाणे शुक्रवारी न येता ह्यावेळी मंगळवारी संध्याकाळीच पेण मुक्कामी येऊन थडकलो.

शशक- निवडणूक ३

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 02/03/2023 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग निवडणूक निवडणूक २ साहेब, नुसतेच काय शाहु,फुले,आंबेडकरांची नावे घ्यायची? यावेळी वॉर्डात बहुजन समाजाचा उमेदवार पाहीजे बघा लोकांना.आपले नाना कसे वाटतात? अरे बाबा निवडुन यायला मतांची बेरीज बघावी लागते. शिवाय तुझा ऊमेदवार पार्टीफंड किती देणार? पार्टीफंडाची काळजी नाही साहेब.तो पाहीजे तेव्हढा उभा करु . पण मतांसाठी जरा अडचण आहे बघा. अरे तेच तर महत्वाचे आहे, आधीच नोटाचे फलक लागलेत तुझ्या वॉर्डात.

स्टीमपंक चॅटरबॉक्स

लेखक भागो यांनी बुधवार, 01/03/2023 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
स्टीमपंक चॅटरबॉक्स डॉक्टर ननवरे बंगल्याच्या बागेत काहीतरी अचाट प्रयोग करत होते. त्यांनी जुन्या बाजारातून बरच काही लोखंडी सामान विकत आणले होते. त्यात काय नव्हते? त्यांत निरनिराळ्या गेजचे लोखंडी पत्रे होते, एम-५ पासून एम-३० पर्यंतचे बोल्ट होते, ओपन एंड, रिंग, सॉकेट, बॉक्स,आणि शेवटी अॅड्जस्टीबल असे स्पॅनरचे अनेक प्रकार. स्टील वायर्स. चेन्स, कप्प्या. बेअरीन्ग्स, पिस्टन आणि मॅचिंग सिलींडर, क्रॅंकशाफ्ट, क्रॅंकेस. आता मी कशाकशाची नावे लिहू डॉक्टरांनी मला ह्या सगळ्या स्टोरचा इन्चार्ज केलं. आणि हुद्दा दिला: भांडारगृह प्रमुख!