Skip to main content

स्वप्नातले गाव !!!

लेखक किल्लेदार यांनी शुक्रवार, 30/06/2023 05:37 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबरची सकाळ, शहर कॅलगरी. रात्री पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण एकदम कुंद-धुकट होते. कोंबडं झाकलं तरी उगवायचं काही राहत नाही अशी म्हण आहे पण कॅनडात हिवाळा असला तर कोंबडं झाकायचीही गरज भासत नाही. सप्टेंबर मध्ये मात्र हे अपेक्षित नव्हते. धुक्यातून वाट काढत बस शहरातून बाहेर पडली तरीसुद्धा धुक्याचा वेढा काही फुटला नाही. मोजके अनोळखी प्रवासी आणि बसच्या काचांवर लागलेला धुक्याचा पडदा यामुळे आतल्या आत विचार करू लागलो. मी इथे का आणि कसा आलो. खिशात चार सुट्ट्या आणि चार पैसे खुळखुळले की माळ्यावरच्या अडगळीत टाकून दिलेल्या इच्छा खाली डोकावतात. त्यातलीच ही एक.

(न्हाऊन ये त्वरेने)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 30/06/2023 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज लै दिसांनी मिपावर आलो अन समोरच प्राचीताईची कविता दिसली मग काय हात शिवशिवायला लागले प्राचीताई नेहमी प्रमाणे या बालकाला उदार अंतःकरणाने क्षमा करतीलच... चाल "ए दिल मुझे बता दे" लैच फिट बसते, नाहीतर "मेरे ढोलना सुन" थोडीफार ओढाताण करुन, किंवा "दाटून कंठ येतो" किंवा "तु सप्तसुर माझे" च्या चालीवर म्हणावी, दिवसातुन सहा वेळा असे १०८ दिवस उच्चरवात रोज गायल्यास सातजन्माची पापे समूळ धुतली जातील.

सार्थक जीवन

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 29/06/2023 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन सार्थकी लावायचे म्हणजे पोहणे न शिकताच पुराने फुगलेली एखादी महानदी पार करणे. पुढे काय संघर्ष/सवलत वाट्याला येणार, याची कल्पना न देता आत्म्यांच्या सतत ढासळणाऱ्या कड्यावरून आपले जीव या प्रवाहात फेकले जातात. काहींना पहिलाच तडाखा एवढा जबरदस्त बसतो, की उपजत शारीरिक मर्यादांमुळे 'अपंग' म्हणून जन्माला आलेले हे जीव कसे जगणार याची 'समर्थ' जीवांना काळजी लागते. एकदा या जगण्याच्या लोंढ्यात माणूस गटांगळ्या खाऊ लागला, की मग प्रत्येकातले सुप्त अपंगत्व बाहेर येते. ज्यांना दुर्दैवाने एखादा अवयव/ज्ञानेंद्रिय नाही असे जीव त्यांच्या परीने जगण्याची कला शिकून जीवन लीलया सार्थकी लावतात.

पंढरीची वारी

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 29/06/2023 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून पांडुरंगाची सेवा सहज,बालपणापासून करता येते हे एक भाग्याचीच गोष्ट आहे.

वार्तालाप : रेड्यामुखी वेदवाणी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 29/06/2023 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
रेड्यामुखी वेदवाणी विद्या जगण्याची ओवी ज्ञानीयाची. आपण सर्वांनी ही कथा ऐकलीच असेल. संत ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार केला आणि रेडा वेद गायन करू लागला. आपण सर्वांना माहीत असेलच रेडा माणसाची बोली बोलू शकत नाही. मग या कथे मागचे सत्य काय? ज्या लोकांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्या बाबत हिंदीत एक म्हण प्रसिद्ध आहे "काला अक्षर भैस बराबर". माऊलीच्या काळात फारच कमी लोकांना लिहिता वाचता येत होते. संस्कृत भाषा तर हजारोंतून एखाद दुसर्‍या माणसाला. दुसरीकडे आपले सर्व धर्मग्रंथ वेद, उपनिषद, पुराण, भगवद्गीता इत्यादि देव भाषेत अर्थात संस्कृत मध्ये होते.

एकादशीची पहाट

लेखक बाजीगर यांनी गुरुवार, 29/06/2023 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
एकादशीची पहाट विठ्ठलाकडे पाठ फोटोफ्रेम मधे आठ पांडूरंगा ।। दर्शन घडू दे पाऊस पडू दे भक्ती जडू दे चरणाशी ।। वारकरी दहा लाख कोरोना चा ना धाक असेच आम्हा राख विठूराया।। टाळ मृदंग गजर दिंड्या पताका हजर नाचे,गाये, बाजीगर जन्मोजन्मी।।

भोग

लेखक अवतार यांनी मंगळवार, 27/06/2023 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरीचा ठाव माझ्या अजून मी घेतोच आहे अनंत जन्मांचे हे देणे अजून मी देतोच आहे वृक्ष छाया तापलेल्या धरणीला देतोच आहे पोळलेल्या हृदयावर मी ती छाया घेतोच आहे धीर देऊन भ्यालेल्यांना मीही तरी भितोच आहे अमृताच्या प्याल्यातूनही विष मी पितोच आहे इतरांची मी कीवच करतो परंतु मीही तोच आहे आयुष्याची शाई संपली तरीही मी लिहितोच आहे मरणाची मी वाट पाहतो तरीही मी मरतोच आहे जिंकिले जरी षड्रिपू तरी अजून मी हरतोच आहे खेळापासून सावल्यांच्या मैलन मैल पळतोच आहे सावली जरी माझी पडली परंतु मी जळतोच आहे थकलेल्या पाऊलवाटांवर परत मी फ़िरतोच आहे तरीही त्या अंतरात माझ्या अजून मी शिरतोच आहे पुष्कळ झाले पुरे करा अजून म

मातीचे पाय

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 27/06/2023 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
पायांना स्पर्शून आले ते हात मळाले होते लख्ख उमगले तेव्हा ते पाय मातीचे होते मी केवळ पाहत होतो पायांच्या खालची धूळ ती ललाटास लावावी हे एकच माथी खूळ मी इथवर पाहून आलो पाऊलखुणा विरणाऱ्या आधी खुणावत, मागून कपटी विकट हसणाऱ्या आता, पुन्हा चालावे पुढे, की परत फिरावे? सोस ना-लायक पायांचे पुसून अवघे टाकावे? प्रेमळ शब्दांची ओल मनात झिरपत नाही व्हावे नतमस्तक ऐसे पायही दिसत नाही ते सारेच निघून गेले जे पाय धरावे सुचले मातीचे पाय मातकट मागे माझ्यासह उरले - संदीप भानुदास चांदणे ( रविवार, २५/०६/२०२३)

तुका आकाशाएवढा (ऐसी अक्षरे ...मेळवीन-११)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 27/06/2023 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
मेघदूत पुस्तक जवळच्या पुस्तकांच्या दुकानात मिळते का?हे पाहायला गेले.मेघदूत उपलब्ध नव्हते.पण पुस्तकांची मांदियाळी पाहून भारावून गेले,नजर गेली गोनीदांच्या पुस्तकांकडे ...त्यात दिसले ‘तुका आकाशाएवढा’ हे पुस्तक.वारीही जवळ येत होती,या पुस्तकानिमित्त विठ्ठल नामही स्मरणात राहील,तेव्हा पुस्तक घेतले.तारीख होती एक जून ..गोनीदांचा स्मृतीदिन !दुग्धशर्करा योग जुळून आला.तुका आकाशाएवढा याचे पहिली आवृत्ती १९८१ साली प्रसिद्ध झाली होती. तुकोबांचे बालपणीचे मित्र संतू तेली जनागडे यांनी मित्रा बरोबरीचे बहुमुल्य क्षण आठवणीच्या रुपात सांगितले आहे असे लेखण यात आहे.