[शतशब्दकथा स्पर्धा] माझिया प्रियाला प्रित कळेना----
ती एक स्वप्नाळू, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी सामान्य मुलगी. करिअर, अभ्यास यापेक्षाही चारचौघांसारखा घर, संसार, आपण आणि आपली माणसं यातच आपला आनंद मानणारी.
एक दिवस तिच्या स्वप्नातला राजकुमार तिच्या आयुष्यात येतो. पण... अगदी तिच्या विरुद्ध स्वभावाचा. शांत, भिडस्त आणि अभ्यासू. फक्त अभ्यास आणि करियर यांचा विचार करणारा. आपल्या मनातल्या भावना, विचार कधीही बोलून व्यक्त न करणारा. प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायालाच हवी का? असा प्रतिप्रश्न करणारा.
मिसळपाव