Skip to main content

उपासाचे कबाब!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 20/10/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रीचे नऊ दिवस उपास माझा नवरा गेली कित्येक वर्षे करतो.. पहिल्या २-३ माळा झाल्या की मग दूध, फळांवरून हळूहळू गाडी सा. खि., बटाट्याचा,रताळ्याचा किस, उपासाच्या भाजणीची थालिपिठ यावर येऊन ठेपते. काहीतरी वेगळे हवे आणि जास्त स्टार्ची,ऑयली नको अशी 'आखूडशिंगी बहुदुधी' डिश हवी असते. ह्यावर्षी ह्या मोडवर आल्यावर त्याने माझं डोकं न खाता चल जरा इंडियन स्टोअर मध्ये जाऊ असा विचार मांडला. तेथे गेल्यावर हा सुरण शोधू लागला. आता आम्ही काही राणीच्या देशात राहत नाही, ना उसगावात..

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेशमधून प्रस्थान

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 20/10/2015 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अधुरी एक कहाणी

लेखक मीउमेश यांनी मंगळवार, 20/10/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अश्या बर्याच प्रेमकहाण्या सुरु होण्या आधीच संपून जातात . अशीच एक गम्मत माझ्या आयुष्यातली मी एका कंपनी मध्ये नवीन कामाला लागलो होतो . मला लहान पणा पासून साउथ च्या मुली खूप आवडायच्या. काळ्या सावल्या, छान चंदनाचा आडवा टिक्का, अबोलीचे भरपूर गजरे , बारीक पण रेखीव काजळ आणी मुख्य म्हणजे मोकळे सोडलेले केस ( वेणी असली तरी छानच दिसतात) असो तर एक तामिळ मुलगी मला आवडू लागली, मी मुद्दाम तिच्या भोवती घुटमळू लागलो, ती दुसर्या विभागात काम करायची . तरी पण मी काही तरी काम काढून तिच्या dEPARTMENT मध्ये जात असे. आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही पण , नजरानजर रोज व्हायची.

चकती वाचे

लेखक निनाद यांनी मंगळवार, 20/10/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनंतवर्ती अनभिसंहित अनमोल माहिती चकती वाचे अनापरीवर्तक अनालेखित पंक्ती अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती अन्योन्य धारिता क्षीणनकारी अन्वस्ती अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे तरी भीती अपच्छेद अपरा अनुरूपता असे अवनति अनुवाद असे अप्रारुपी शोधू तरी किती अवरक्त विदा अवरोधितात का भिंती अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती (पैसा ताईंनी आठवण करून दिली... त्यामुळे भोगा आय मिन वाचा! :) )

नवरात्र जल जागर : माळ आठवी

लेखक नाखु यांनी मंगळवार, 20/10/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी...

ति

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 20/10/2015 05:47 या दिवशी प्रकाशित केले.
तो तरुण व्यावसायिक होता..स्मार्ट आत्मविश्वासाने भरलेला. व्यवसाय मस्त चालला होता.. त्या निमित्ताने ब्यांकेत ये जा असायची.. त्याचे खाते पहाणारा त्याचा मित्रच होता.. ब्यांकेत ति पण नवीनच आलेली होती.. सुंदर म्हणता येणार नाही पण आकर्षक व्यक्तिमत्त्व..अती साधी राहणी.. चेहे~यावर गूढ गंभीर भाव..स्वतःचाच विचारात व विश्वात बुडून गेलेली..थोडी उदास..काही तरी शोधतेय ति.. त्याला ति आवडली..मित्रास विचारले अन तो म्हणाला..ति होय कावेरी जोशी.फारशी कुणात मिसळत नाही खूप अबोल व फटकून वागणारी आहे... तो विचार करायचा..काय नेमके हरवले असेल तिचे? वा निसटले असेल?.इतकी छान दिसते पण अशी काकू बाई सारखी का राहते?

श्रीरामाचा मित्र - भद्र - रामायणातले एक महत्वपूर्ण पात्र

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 19/10/2015 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांड मधील ४३व्या सर्गात श्रीरामांची त्यांच्या मित्रांसोबत होणार्या चर्चेचे वर्णन आहे. त्यात श्रीरामांचा मित्र भद्र सीता विषयी प्रजेचे मत बेधडकपणे श्रीरामांसमोर मांडतो. आपल्या मित्राचे बोलणे ऐकून श्रीरामाला आपल्या प्रिय पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. रामकथेला कलाटणी देण्यात भद्राचे महत्वपूर्ण स्थान असूनही, अधिकांश लोकांना भद्राचे नाव माहित नाही. म्हणतात न, राजाला मित्र नसतात. राजा अवतीभोवती वावरतात फक्त, चाटुकार, चारण, भाट आणि विदूषक. राजावर स्तुतिसुमने उधळून, निरनिराळ्या क्लुप्त्या करून राजाला प्रसन्न करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट.

Fire

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 19/10/2015 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
पटरीवर रेल्वे भोंगा वाजवत हळुहळु निघाली, धाड.....धुड....धाड.....धुड..... रिजर्वेशन नाही मिळालं, जायचं अचानक ठरलं. आम्ही पांढरपेशे, वरच्या शीटावर, पण जनरल बोगीत. बिस्लरी घेतलीय, वरचा फ्यान चालतोय, डब्यात गर्दीच गर्दी. आमचे मित्र सहपरिवार, मीही सुटाबुटातला, वरच्या शीटावर तिघचं. बाकीची खाली, खेटून खेटून बसलेली, प्रवास लांबचा. टवाळक्या, टपल्या, आणि गप्पा. पुढच्या स्टेशनला गाडी थांबली, एक दाढीदारी पुरुष, लटांबर घेऊन आमच्याच बोगीत. बायको न पोरं खालच्या शीटांच्या मधी, बाकीच्यांचे पाय आखडते. मोठ्या पोरीला वरती बसण्याची खुण, खुण कसली हुकुमचं, तिला नव्हे आम्हाला.

सत्य घटना

लेखक आनंद कांबीकर यांनी सोमवार, 19/10/2015 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
सिंहगड ने पुण्यातुन निघालो.नेहमी प्रमाणे ट्रेन तुडुंब भरलेली. दरवाज्या जवळच्या पैसेज मधे श्वास घेत उभा होतो. समोर एक मुलगा,साधारणता विशितला, स्वताच्याच् बॅग वर बसला होता. खेड्यातला असावा आणि मुंबईला कुठेतरी कामाला असावा. त्याच्या जवळ तळहातात मावनार नाही असा फ़ोन होता. तसा तो काहीखुप महागडा वगैरे नव्हता. म्हणजे चीन च्ं मॉडल असावं. लोनावला क्रॉस केल्यावर एक विक्रेता आला. त्यामुलाने मोबाइल साठी स्क्रीन गार्ड विकत घेतले. विक्रेता ९० ला वगैरे म्हणतहोता पन घासाघिस करुण त्याने ते ७० ला घेतले. आपले अगोदरचे काढून फेकून दिले. नविन मधे ७० ला तिन मिळाले होते. एक घेतले फ़ोन वर बसवले.

कंट्रोल रूम

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 19/10/2015 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
( या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!) ०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-० "नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?" "हॅलो, पुलिस, अहो आमच्या हिथे बाहेरच्या नळावर, त्या परजापतीबाई आणि सराटेबाई ह्यांच्यात जोरात भांडण चालूयेत, लवकर पुलिस पाठवा नाहीतर आता त्यांच्यात बादली, हंडं-कळशांनी मारामारी सुरू हुयल, अजून थोड्या वेळाने माहित नाही कशानं मारामारी करतेल!" "कुठून बोलताय तुम्ही" "घरात्न... आपलं ते...