Fire

जव्हेरगंज जनातलं, मनातलं
पटरीवर रेल्वे भोंगा वाजवत हळुहळु निघाली, धाड.....धुड....धाड.....धुड..... रिजर्वेशन नाही मिळालं, जायचं अचानक ठरलं. आम्ही पांढरपेशे, वरच्या शीटावर, पण जनरल बोगीत. बिस्लरी घेतलीय, वरचा फ्यान चालतोय, डब्यात गर्दीच गर्दी. आमचे मित्र सहपरिवार, मीही सुटाबुटातला, वरच्या शीटावर तिघचं. बाकीची खाली, खेटून खेटून बसलेली, प्रवास लांबचा. टवाळक्या, टपल्या, आणि गप्पा. पुढच्या स्टेशनला गाडी थांबली, एक दाढीदारी पुरुष, लटांबर घेऊन आमच्याच बोगीत. बायको न पोरं खालच्या शीटांच्या मधी, बाकीच्यांचे पाय आखडते. मोठ्या पोरीला वरती बसण्याची खुण, खुण कसली हुकुमचं, तिला नव्हे आम्हाला. चुळबुळ करत थोडी जागा दिली, शिडीवर चढत कडेला बसली. दाढीधारी पुरुषाचा मोलाचा सल्ला, तिला, " अगर किसीने हात भी लगाया, तो सीधे कान के निचे खीच देना". आम्ही सुन्न, सहपरिवार थोबाडीत दिल्यासारखा अलिप्त. मित्र हळुच कानात करवदला " आता घी, शेTT ". मी मुग गिळुन गप्प. आम्ही पांढरपेशे, इज्जतदार, राडा करणे आम्हाला शोभत नाही, सहपरिवार सोबत असताना नाहीच नाही. रेल्वेने आता तुफान वेग घेतलाय, धडाक् धुडूक्, धडाक् धुडूक्, धडाक् धुडूक्......
वर्गीकरण
लेखनप्रकार

11 टिप्पण्या 4,221 दृश्ये

Comments

चाणक्य नवीन

मित्र काय करवदला तेच कळलं नाही. 'आता घी, शे ाा' म्हणजे?

जव्हेरगंज नवीन

In reply to by टवाळ कार्टा

काब्रे., यापेक्षा खतरनाक शब्द वापरले गेलेत मिपावर.. (उदा. टाळतो लवलवती पाती, कोणता तांब्या घेऊ हाती फेम) ;-)