Skip to main content

पहिली आठवण अन पहिला क्षण

लेखक शीतल जोशी यांनी गुरुवार, 05/11/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहिली आठवण अन पहिला क्षण पहिला दिवस, प्रत्येक वेळी हा पहिला दिवस फार संस्मरणीय असतो ना!!! शाळेतला पहिला दिवस तसा नाही आठवणार आता, पण थोडे काही दिवस आठवत आहेत, अगदी सुरवातीला जेव्हा लहान गट मध्ये गेले तेव्हाचा युनिफोर्म चा रंग आठवतो आहे, पण गम्मत अशी कि लहानगट मधेच शाळा बदलेली आणि सांगलीला नव्या शाळेत घातले त्यावेळचे म्हणजे म्हणजे कोणत्या रंगाची waterbag होती आणि कंपास box हे मात्र आठवतंय.

नवकविता - ट्रॅफिक जॅम

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 05/11/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D विडंबन वगैरे समजू नये. मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे. प्लीज रिस्पेक्ट दॅट.

असे कधी घडत नसते!

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी गुरुवार, 05/11/2015 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही लिफ्ट दिलेली व्यक्ति तुमचा गळा आवळू लागते श्वास कोंडतो डोळेबाहेर येतात शरीर सुटण्यासाठी धडपडू लागते त्याचा चेहरा क्रूर होतो अन् पकड़ घट्ट होवू लागते त्याला ढ़कलण्यास पुढे केलेल्या हातास पण काहीही न सापडते अधिकच घाबरता मग तुम्ही जगण्याची आशा मालवू लागते इतक्यात तुम्हाला अचानक कशी कोण जाणे जाग येते दचकून उठता मान चाचपडता काही नाही!

एक आजोबा मिशी काढून...

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 05/11/2015 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
लहानग्या चिंतामणी उर्फ चिंटू च्या घरात लगबग होती.. दिवाळी साठी खुपा दिवसाने सारे जमले होते.. धाकटा शशी काका व शशी आत्या..थोरली यमु आत्या..अन वत्सला आत्या बाबा सदाशिव व आई सविता... दुपारची जेवणे झाली अन गप्पांचा फड रंगला होता... आज्जी आराम खुर्चीत बसून कौतुकाने मुलांच्या गप्पा ऐकत होती.. . तेव्हढ्यात खिडकीतून गुपचुप उडी मारून आजोबा आत आले..दीर्घ श्वास घेतला.. अन पुणेरी जोडे टॉक टॉक वाजवत आत आले... डोक्यावर पुणेरी पगडी ...हातात काठी.. मिशा..

ति, तेव अण म्या..

लेखक आनंद कांबीकर यांनी गुरुवार, 05/11/2015 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
सगळी मागल्या वर्सातुन फुढं आलेली, म्या एकटाच् नवा. त्याहीच्यात मिसळा मनलं त् म्या खेड्यातला, सुतच् जमाना. वर्गात कई उल्हासच् राइला नवता, पर एकदा तिला हसताना पाइलं अन् सगळा अंगच् नाचू लागला. ति साऱ्या नसाहितातून व्हावू लागली. मागल्या बाकावर बसून, हाताचा कोपाकरुण बोटाच्या सांदीतून तिला टापू लागलो. ति गदगदून हसायची न् म्या खुश व्हायचो. मजाच मजा यायाची. एकदा ति खेटुण गेली अन् म्या अंगाला माराइचा फवाराच् ईकत आणला. दिसभर एकटाच तिच्या मागणं फिरायचु. कदीच्याला बी तिच्यावरच् नजर लावून बसायचो. ति रोज चोरून मह्याकडच् बघायची पर हळू हळू ध्यानात आलं, ति माह्या शेजारी बसणाऱ्या विश्याला चोरून पायची.

शिक्षणाच्या आई चा घो !

लेखक मीउमेश यांनी बुधवार, 04/11/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मुलीच्या शाळेतून फोन आला. आमच्या चिऊताई च्या टिचर नी आम्हा उभयतांना शाळेत बोलावले होते. शनिवारी शाळेला सुटी होती तरी आम्हाला बोलावले. मी जरा आमच्या कन्ये बद्दल सांगतो, येत्या शुक्रवारी ३ वर्षाची होइल. सौभाग्यवती खूपच काळजी करू लागली. काय झालं असेल, मुलीने काही पराक्रम तर नाही केला शाळेत. ( पूर्वी एकदा असंच एकदा शाळेतून बोलावणं आलं होतं , आमच्या कन्येने टिचर च्या कानाखाली गणपती काढला होता … ती कहाणी नंतर कधी तरी ) दोन दिवस सौभाग्यवती नीट झोपली नाही. सारखी काळजी. एकदाचा तो दिवस उगवला. आम्ही शाळेत पोहोचलो.